आज भारताच्या युवा शक्तीसाठी एक महत्वाची संधी आहे. गेल्या आठ वर्षात देशात जे रोजगार आणि स्वयंरोजगार अभियान सुरु आहे त्यात आज एक आणखी दुवा जोडला जात आहे.यामुळे याकडे तरुणांचे लक्ष लागले आहे. यामध्ये तरुणांना रोजगार मिळणार आहे. स्वातंत्र्याची 75 वर्षे लक्षात घेऊन केंद्र सरकार 75 हजार युवकांना एका कार्यक्रमाअंतर्गत नियुक्ती पत्र देत आहे.
भारत सरकारने अशा प्रकारचा रोजगार मेळावा सुरु केला आहे. येत्या महिन्यांमध्ये अशाच प्रकारे लाखो युवकांना भारत सरकारकडून वेळो-वेळी नियुक्ती पत्रे सोपवली जातील. एनडीए शासित राज्ये आणि केंद्रशासित प्रदेश आणि भाजपा सरकारेही आपल्या राज्यात अशा प्रकारे रोजगार मेळावे आयोजित करत आहेत.
पंतप्रधान नरेंद्र मोदी रोजगार मेळ्याअंतर्गत 22 नोव्हेंबर रोजी सकाळी 10:30 वाजता व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे सुमारे ७५,000 नवीन भरती झालेल्या अर्जदारांना नियुक्ती पत्र प्रदान करतील. या नवनियुक्त व्यक्तींनाही पंतप्रधान यावेळी संबोधित करतील. रोजगार मेळा हा रोजगार निर्मितीला सर्वोच्च प्राधान्य देण्याच्या पंतप्रधानांच्या वचनबद्धतेची पूर्तता करण्याच्या दिशेने एक पाऊल आहे.
रोजगार मेळावा पुढील रोजगार निर्मितीसाठी उत्प्रेरक म्हणून काम करेल आणि तरुणांना त्यांच्या सक्षमीकरणासाठी आणि राष्ट्रीय विकासात थेट सहभागासाठी अर्थपूर्ण संधी प्रदान करेल अशी अपेक्षा आहे. यापूर्वी ऑक्टोबरमध्ये रोजगार मेळाव्यात ७५,००० हून अधिक नव्याने भरती झालेल्या लोकांना नियुक्तीपत्रे देण्यात आली होती.
नियुक्ती पत्रांच्या भौतिक प्रती देशातील ४५ ठिकाणी (गुजरात आणि हिमाचल प्रदेश वगळता) नवनियुक्त व्यक्तींना सुपूर्द केल्या जातील. यापूर्वी भरती केलेल्या पदांच्या श्रेणींव्यतिरिक्त, शिक्षक, व्याख्याता, परिचारिका, नर्सिंग अधिकारी, डॉक्टर, फार्मासिस्ट, रेडिओग्राफर आणि इतर तांत्रिक आणि पॅरामेडिकल पदांसाठी देखील भरती केली जात आहे.
आम्हाला तुमची वीज नको आणि आमच्या शेतात तुमचा खांब नको! शेतकऱ्यांनी महावितरणला आणले जाग्यावर..
गृह मंत्रालय विविध केंद्रीय सशस्त्र पोलीस दलांमध्ये (CAPF) मोठ्या प्रमाणात पदांची भरती करत आहे. पंतप्रधान कर्मयोगी प्रमुख मॉड्यूलचेही लोकार्पण करतील. हे मॉड्यूल विविध सरकारी विभागांमधील सर्व नवीन भरतीसाठी एक ऑनलाइन अभिमुखता अभ्यासक्रम आहे. या कोर्समध्ये सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आचारसंहिता, कामाच्या ठिकाणी नैतिकता आणि सचोटी, मानव संसाधन धोरणे आणि इतर फायदे आणि भत्ते यांचा समावेश आहे.
त्यांना धोरणांशी जुळवून घेण्यास आणि नवीन भूमिकांमध्ये सहजतेने संक्रमण करण्यास मदत करतील. त्यांना त्यांचे ज्ञान, कौशल्ये आणि क्षमता वाढवण्यासाठी igotkarmayogi.gov.in प्लॅटफॉर्मवर इतर अभ्यासक्रम एक्सप्लोर करण्याची संधी देखील मिळेल. यामुळे ही एक चांगली मोठी संधी आहे.
महत्वाच्या बातम्या;
इंडोनेशियामध्ये भूकंपाचा कहर, 162 ठार शेकडो जखमी..
Vst शक्ती MT 932DI ट्रॅक्टर लहान शेतकऱ्यांसाठी एक चमत्कार, शेतकऱ्यांना होतोय फायदा..
ब्रेकिंग!नियमित वीजबिल भरणाऱ्या शेतकऱ्यांबाबत देवेंद्र फडणवीस यांची मोठी घोषणा
Share your comments