Epfo त्याच्या सदस्यांना कायम चांगल्या प्रकारचा योजनांच्या माध्यमातून संरक्षण देत असते. कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटना तिच्या सदस्यांना आणि सदस्यांच्या कुटुंबीयांना सात लाख रुपयांचे विमा संरक्षण प्रदान करते. कर्मचारी भविष्य निर्वाह निधी सदस्यांच्या निवृत्तीनंतर त्यांना पेन्शनचा लाभ देते हे आपल्याला माहिती आहे. परंतु जर सदस्याचा मृत्यू झाल्यास कौटुंबिक पेन्शन आणि विम्याचा लाभ हा सदस्याच्या कुटुंबियांना देण्यात येतो. हा लाभ विमा संरक्षणाच्या स्वरुपात देखील दिला जातो.
नक्की वाचा:Scheme:महावितरणची 'ही' योजना आहे खूप फायदेशीर,वीज बिलामध्ये करता येते मोठी बचत
कर्मचारी डिपॉझिट लिंक्ड इन्शुरन्स योजना नेमकी काय आहे?
कर्मचारी डिपॉझिट लिंक्ड इन्शुरन्स योजनेच्या माध्यमातून कर्मचारी भविष्य निर्वाह निधी सदस्यांना याचा लाभ देते. यापूर्वीहे विमा संरक्षण अडीच लाख रुपये होते परंतु आता ते सात लाख रुपयांपर्यंत वाढविण्यात आले आहे.
यासाठी कर्मचारी भविष्य निर्वाह निधीने त्यांच्या सर्व सदस्यांना इ नॉमिनेशन दाखल करण्यास सांगितले असून जेणेकरून या योजनेचा लाभ सदस्य आणि त्यांच्या कुटुंबांना मिळणे शक्य होईल. नॉमिनेशन केल्याने कुटुंबातील योग्य व्यक्तीला त्याचा लाभ मिळू शकेल.
या प्रमाणे दाखल करा तुमचे ऑनलाईन इ नोमिनेशन
1- तुम्हाला जर डिजिटल पद्धतीने नॉमिनेशन करायचे असेल तर त्यासाठी कर्मचारी भविष्य निर्वाह निधीच्या संकेतस्थळावरील 'जोकर सर्विस'या पर्यायावर क्लिक करावे.
2- त्यानंतर 'फॉर एम्पलॉइज' या पर्यायावर क्लिक करावे व निर्देशित केल्यानंतर तुम्हाला तुमचा यूएन/ ऑनलाइन सेवा या पर्यायावर क्लिक करावे लागेल.
3-त्यानंतर सदस्याला अधिकृत सदस्य ई सेवा पोर्टल वर रिडायरेक्ट केले जाईल. या ठिकाणी सदस्याला त्यांचा युएएन आणि पासवर्ड वापरून लॉगीन करता येईल.
4-लोगिन केल्यानंतर ड्रॉप-डाऊन मेन्यू मधील मॅनेज टॅबवर जावे आणि त्या ठिकाणी नॉमिनेशन हा पर्याय निवडून त्या ठिकाणी 'होय' हा पर्याय निवडावाआणि त्या ठिकाणी फॅमिली डिक्लेरेशन अपडेट करावे.
5- त्यानंतर 'ॲड फॅमिली डिटेल्स' वर क्लिक करावे आणि नॉमिनेशन तपशील निवडा. यामधून तुम्ही शेअर करायची एकूण रक्कम घोषित करू शकता. यानंतर सेव ईपीएफ नामांकन वर क्लिक करावे.
6-त्यानंतर पुढील पेज वर गेल्यानंतर ई साइन पर्यायावर क्लिक करावे. त्यानंतर तुमच्या आधार कार्ड ची लिंक असलेल्या मोबाईल नंबर वर ओटीपी येईल व ओटीपी भरल्यानंतर तुमची प्रोसेस पूर्ण होईल.
Share your comments