भारतात पेट्रोल दरवाढ ही एक चिंतेची बाब आहे; आणि म्हणुनच ही बातमी कामाला जाणाऱ्या कास्तकारांसाठी आणि शेतकरी वर्गासाठी नक्कीच समाधानाची ठरेलं.
इलेक्ट्रिक मोबिलिटीला प्रोत्साहन देण्यासाठी आपल्या देशातील अनेक राज्य सरकारे इलेक्ट्रिक व्हेइकल (EV) धोरण राबवत आहेत. या धोरणांचा सर्वात मोठा परिणाम इलेक्ट्रिक वाहनांच्या किमतींवर दिसून येत आहे.
आता देशातील आघाडीची इलेक्ट्रिक वाहन उत्पादक कंपनी अथर एनर्जीने नुकतीच घोषित केलेल्या महाराष्ट्र EV धोरण 2021 नंतर महाराष्ट्रात आपल्या कंपनीची इलेक्ट्रिक स्कूटर Ather 450 Plus ची नवीन किंमत जाहीर केली आहे.
ट्विटरवर कंपनीच्या सीईओने मानले महाराष्ट्र सरकारचे आभार
कंपनीच्या सीईओने ट्विट करून सर्वप्रथम सरकारला धन्यवाद दिला. आणि नंतर कंपनीच्या सीईओने सोशल नेटवर्किंग साईट ट्विटरवर घोषणा केली की नवीन EV सबसिडी पॉलिसीमुळे आथर 450 प्लसची किंमत आता महाराष्ट्रात 24,000 रुपयांनी कमी झाली आहे. म्हणजेच जी Ather 450 Plus आधी 1.28 लाख रुपये, एक्स-शोरूम, मुंबई येथे उपलब्ध होती, ह्या नवीन पॉलिसीमुळे या इलेक्ट्रिक स्कूटरची किंमत सुमारे 20 टक्क्यांनी कमी झाली आहे. Ather 450 Plus ची किंमत आता 1.03 लाख रुपये, एक्स-शोरूम, मुंबई येथे आहे. या इलेक्ट्रिक स्कूटरची किंमत इतर भारतीय राज्यांच्या तुलनेत महाराष्ट्रात सर्वात कमी आहे.
करा एक वेळेस चार्जिंग आणि 70 किलोमीटर मनसोक्त चालवा
Ather 450 Plus इलेक्ट्रिक स्कूटरबद्दल बोलायचे झाले तर कंपनीने त्यात 2.4kWh क्षमतेचा बॅटरी पॅक वापरले आहे. ही इलेक्ट्रिक मोटर 5.4 kW ची पॉवर आणि 22 Nm ची टॉर्क जनरेट करते. कंपनीचा दावा आहे की ही स्कूटर 0 ते 40 किलोमीटर प्रति तास वेग फक्त 3.9 सेकंदात पकडू शकते.
एकदा चार्जिंग केल्यावर, ही स्कूटर 70 किमी पर्यंत चालते. स्कूटरला रेग्युलर चार्जरने चार्ज करण्यासाठी 5 तास 45 मिनिटे लागतात. असे असले तरी, कंपनीने आपल्या टॉप मॉडेल Ather 450X च्या किंमती अद्याप जाहीर केल्या नाहीत.आशा आहे की त्याच्याही किमती कंपनी लवकरच जाहीर करेल.
Share your comments