Edible Oil Price Cut : देशात वाढती महागाई पाहता सर्वसामान्य लोकांचे आर्थिक बजेट कोसळले आहे. वाढत्या इंधनाच्या किमतींनी (Fuel Rates) सर्वसामान्य लोकांचे हाल होत आहेत. तसेच काही दिवसांपूर्वी खाद्यतेल (edible oil) आणि गॅसच्याही किमती वाढवण्यात आल्या होत्या. मात्र आता सर्वसामान्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. खाद्यतेलाच्या किमती घसरल्या आहेत.
सरकारच्या प्रयत्नांनंतर खाद्यतेलाच्या किमती कमी होत आहेत. गेल्या काही दिवसांत तेल कंपन्यांकडूनही (Oil companies) दर कमी करण्याची घोषणा करण्यात आली होती. आता पुन्हा एकदा फॉर्च्युन ब्रँड (Fortune brand) अंतर्गत उत्पादन विकणारी खाद्य तेल कंपनी अदानी विल्मारने (Adani Wilmar) आंतरराष्ट्रीय तेलाच्या किमती कमी झाल्यानंतर दर कमी करण्याचे सांगितले आहे. खाद्यतेलाच्या दरात प्रतिलिटर 30 रुपयांनी कपात करण्याची घोषणा कंपनीकडून करण्यात आली आहे.
सोयाबीन तेलात सर्वात मोठी कपात
सोयाबीन तेलाच्या दरात सर्वात मोठी कपात करण्यात आली आहे. नवीन किमतीसह माल लवकरच बाजारात येईल. यापूर्वी, धारा ब्रँड अंतर्गत खाद्यतेल विकणाऱ्या मदर डेअरीने सोयाबीन आणि राईस ब्रान ऑइलच्या किमतीत 14 रुपयांनी कपात केली होती. खाद्यतेलाच्या किमतींवर चर्चा करण्यासाठी अन्न मंत्रालयाने ६ जुलै रोजी बैठक बोलावली होती. यादरम्यान सर्व खाद्यतेल कंपन्यांना जागतिक स्तरावर दरात झालेल्या घसरणीचा फायदा ग्राहकांपर्यंत पोहोचवण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या.
Weather Update : या राज्यांमध्ये मुसळधार पावसाचा इशारा; IMD ने जारी केला अलर्ट, जाणून घ्या हवामान
कपातीचा लाभ ग्राहकांना होणार
एका निवेदनात कंपनीने म्हटले आहे की, "जागतिक दरात झालेली घट आणि खाद्यतेलाच्या किमतीतील कपातीचे फायदे ग्राहकांपर्यंत पोहोचवण्याचे सरकारचे प्रयत्न पाहता, अदानी विल्मरने खाद्यतेलाच्या किमती आणखी कमी केल्या आहेत." गेल्या महिन्यातही दर कमी करण्यात आले होते. कंपन्यांच्या या निर्णयामुळे सर्वसामान्य लोकांना थोडा का होईना दिलासा मिळणार आहे.
EPF Investment: पीएफचे पैसे तुम्हाला करोडपती बनवतील; कसे ते पहा...
सोयाबीन तेल 165 रुपये प्रति लिटर
फॉर्च्युन सोयाबीन तेलाची किंमत 195 रुपये प्रति लिटरवरून 165 रुपये प्रति लीटर झाली आहे. सूर्यफूल तेलाची किंमत 210 रुपये प्रति लीटरवरून 199 रुपये प्रति लीटर झाली आहे. मोहरीच्या तेलाची कमाल किरकोळ किंमत 195 रुपये प्रति लिटरवरून 190 रुपये प्रति लीटर इतकी कमी करण्यात आली आहे.
फॉर्च्युन राईस ब्रान ऑइलची किंमत 225 रुपये प्रति लीटरवरून 210 रुपये प्रति लीटर करण्यात आली आहे. अदानी विल्मरचे व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी अंगशु मलिक म्हणाले, "आम्ही जागतिक स्तरावर किमतीतील कपातीचे फायदे ग्राहकांपर्यंत पोहोचवले आहेत आणि नवीन माल लवकरच बाजारात पोहोचेल."
महत्वाच्या बातम्या :
7th Pay Commission: कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर! महागाई भत्ता वाढणार, जाणून घ्या किती होणार फायदा
PM Kisan Yojana : चुकूनही करू नका या गोष्टी अन्यथा खात्यात येणार नाही PM किसान सन्मान निधीचा 12 वा हप्ता
Share your comments