आज दिनांक 07 ऑगस्ट 2022 वार रविवार. या आठवड्यात होणारे महत्त्वाचे ग्रह (planet) बदल म्हणजे दिनांक 10 ऑगस्ट रोजी रात्री नऊ वाजून अठरा मिनिटांनी मंगळ वृषभ या शुक्राच्या राशीत प्रवेश करेल.
मंगळ राहू (Mars Rahu) अंगारक योग समाप्त होईल. तसंच शुक्र दिनांक 08 रोजी कर्क राशीत प्रवेश करेल. सूर्य कर्क राशीत तर बुध सिंह राशीत असेल. गुरू मीन आणि शनी मकरेत वक्री अवस्थेत असतील.
काही विपदा जसे की युद्धसदृश स्थिती, मोठे अपघात, राजकीय अस्थिरता निर्माण होईल. सर्वांनी सामाजिक (Social) स्तरावरदेखील जपून राहण्याचा काळ आहे. राहू मेष तर केतू तूळ राशीत असतील. या आठवड्यात रक्षाबंधन आहे.
दिनांक 11 रोजी नारळी पौर्णिमा सकाळी दहानंतर आहे. सर्व बंधू भगिनींना मंगल शुभेच्छा. पाहूया या सप्ताहात काय घटना घडणार आहेत. साप्ताहिक राशी भविष्य लग्नानुसार आहे.
मेष दशमस्थान म्हणजे कर्म स्थान, पितृ स्थान. वक्री शनी वडीलांसंबंधी समस्या निर्माण करेल. कार्यालयीन, घरगुती संदर्भात येणाऱ्या अडचणीचे वेळीच निवारण करा. गाफील राहू नका.
हितशत्रू निर्माण होतील. विरुद्ध कारवाया करतील. मात्र मंगळ व गुरुकृपा यातून तुम्हाला मार्ग दाखवेल. चतुर्थात येणारा शुक्र वाहन, घर यासंबंधी काही घटना घडतील.
दुरुस्ती वर फार खर्च होईल. आर्थिक स्थितीकडे लक्ष असू द्या. सप्ताह उत्तम. वृषभ भाग्य स्थानात होणारे वक्री शनी भ्रमण धार्मिक आस्था निर्माण करत आहे.
ऊसतोडणी यंत्राला मोठी मागणी; शेतकऱ्यांचा कल ऊसतोडणी यंत्राकडे..
अचानक भाग्योदय होईल. शनी-चंद्र युती जरी धोकादायक असली तरी तुम्हाला काही बाबतीत शुभ फळ देईल. घरात धार्मिक कार्य होतील. संतानसंबंधी काही प्रगती होईल.
राशीत येणारा मंगळ सावधगिरीचा इशारा देत आहे. आर्थिक बाजू बळकट होईल. प्रवासात सावध रहा. सप्ताह उत्तम.
मिथुन अष्टम स्थानात होणारी वक्री शनी-चंद्र युती ही धोकादायक आहे. काळजी घ्या. अचानक घडणाऱ्या घटनापासून सावध राहा. वाहन जपून चालवा.
मोठे आर्थिक निर्णय होतील. संतती, आईवडील आणि जोडीदार यांची काळजी वाटेल. शनी जप, दान करा. व्यय मंगळ खर्च वाढवेल.
सप्ताह सांभाळून राहण्याचा आहे. कर्क राशी स्वामी चंद्र शनीसोबत सप्ताहाच्या मध्यावर असेल. शुक्र, सूर्य, बुधासोबत असल्याने मानसिक ताणतणाव राहिल. विवाहाचे योग येतील.
गुरू बल उत्तम आहे. आर्थिक स्थिती मजबूत होईल. डोळ्यांची काळजी घ्या. एकूण सगळ्या बाजूने जपून रहा.
हाडाची स्नायूंची दुखणी निघतील. सप्ताह मध्यम. सिंह राशीच्या अष्टमात गुरू काही चिंता निर्माण करेल. आत्मविश्वास आणि पराक्रमात वाढ होईल.
दशम मंगळ कार्यालयात उत्तम संधी आणेल. शत्रू पिडा होईल. मात्र विजय तुमचाच होईल. कार्यक्षेत्रात बदल होण्याची शक्यता आहे.
घरात देखील काही बदल होतील सप्ताह मध्यम आहे. कन्या पंचम स्थानात होणारी वक्री शनी-चंद्र युती ही संतानसंबंधी विशेष घटना घडवेल. काळजी लागून राहिल. विशेष करून गर्भवती स्त्रियांनी जपून राहावं.
Agriculture Cultivation: ऑगस्टमध्ये करा 'या' शेतीची लागवड; मिळेल दुप्पट उत्पन्न
मुलांना कुठेही अनावश्यक धाडस करू देऊ नये. शैक्षणिक क्षेत्रात प्रगती होईल पण काही अडचणी देखील येतील. मारुती स्तोत्र पाठ करावा. सप्ताह मिश्र फळ देईल.
तूळ सुख स्थानात येणारे शनी महाराज वास्तू योग आणतील. मात्र घरात होणाऱ्या खर्चामुळे त्रस्त होऊन जाल. वाहन काळजीपूर्वक चालवा. नवीन वाहन घेत असाल तर नीट तपासणी करून घ्या.
आर्थिक आणि शारीरिक बाजू जपा. दशम शुक्र लाभदायक ठरेल. अचानक घडणाऱ्या घटनांपासून सावध राहा. प्रवास योग येतील.
सप्ताह मध्यम. वृश्चिक राशी स्वामी मंगळ वृषभ राशीत आहे. तुमच्या ऊर्जेत आणि पराक्रमात अचानक वाढ होईल. मात्र फार धाडस नकोच.
शनी वक्री आहे. प्रवास योग येतील. बहीणभावंडांशी जपून वागा. कलह टाळा.
त्यांना काही समस्या निर्माण होईल. घरामध्ये अनेक सुधारणा कराल. सप्ताह चांगला. धनु राशी स्वामी गुरू चतुर्थ स्थानात असून, कुटुंब स्थानात शनी आहे.
घरात काही समस्या तसंच कठोर बोलण्यातून होणारे वाद विवाद टाळा. कोणाचंही मन दुखावू नका. आर्थिक व्यवहार स्वच्छ ठेवा. कुठेही अडकणार नाही असं बघा.
अपघात घडू शकतात. सावध राहा. सप्ताह मिश्र आहे. मकर राशीतील शनी ग्रह मानसिक उद्विग्नता निर्माण करेल.
अकस्मात घटना घडतील. संतती आणि आई वडील तुम्हाला टेन्शन देतील. प्रकृती सांभाळा. मात्र मंगळ तुमच्यात एक तेज निर्माण करेल.
प्रभावशाली बोलणं होईल. जोडीदाराला शुभ काळ आहे. मात्र घरामध्ये कलह टाळा. रक्त विकार असणाऱ्यांनी सावध राहा.
सप्ताह एकूण मिश्र फळ देईल. कुंभ सावध राहण्याचा काळ आहे. अचानक येणारे परदेशसंबंधी योग चकित करतील. कायदा आणि सरकारी काम यात सावध राहा.
कुठेही अडकणार नाही याची खबरदारी घ्या. प्रकृती जपा. व्यय स्थानातील ग्रह विनाकारण कटकटी मागे लावतील. गुरू आर्थिक पाठबळ देईल.
सप्ताह मध्यम. मीन शनी-चंद्र मकर राशीत संतती चिंता निर्माण करील. गुरू प्रगतीचे अनेक मार्ग दाखवेल. अनेक ठिकाणाहून लाभ होतील.
महत्वाच्या बातम्या
शेतकऱ्यांना 'ही' शेती ठरतेय अत्यंत फायदेशीर; कमी गुंतवणुकीत घेतायत लाखोंची कमाई
Mixed Fisheries: मिश्र मत्स्यपालन तंत्राचा लावला शोध; शेतकरी यातून घेतोय लाखोंमध्ये उत्पन्न, जाणून घ्या..
Cotton Crop: कापूस पिकावर 'या' किडींचा प्रादुर्भाव; त्वरित करा उपाय अन्यथा होईल मोठे नुकसान
Share your comments