कुठलाही व्यवसाय करायचा हे जेव्हा ठरवले जाते किंवा नुसता डोक्यात व्यवसाय करण्याचा विचार जरी येतो तेव्हा सगळ्यात महत्वाची गोष्ट डोळ्यासमोर किंवा मनात येते ती म्हणजे लागणारे भांडवल ही होय. त्यासाठी विविध प्रकारच्या योजनांच्या माध्यमातून तसेच स्वतःकडील काही पैशांचा वापर करून भांडवल उभे केले जाते. परंतु या लेखामध्ये आपण असा काही महत्त्वपूर्ण पर्याय जाणून घेणार आहोत तिच्या माध्यमातून तुम्ही एक पैसा नसताना देखील व्यवसाय उभारू शकतात.
महत्वपूर्ण पर्याय
1- क्राउड फंडिंग- क्राउड फंडिंग म्हणजे जसे आपण एखाद्या सार्वजनिक उत्सवांसाठी वर्गणी गोळा करतो व त्या माध्यमातून जमा झालेल्या पैशातून उत्सव साजरे करतो. हीच संकल्पना उद्योग उभारण्यासाठी देखील गुंतवणूक करण्यासाठी उपयोगात आणली जाते त्यालाच आपण थोड्या आधुनिक भाषेत क्राउड फंडिंग असे म्हणतो.
समजा तुम्ही या पर्यायाच्या माध्यमातून साठ लोकांकडून पाच हजार रुपये घेतले तरी तीन लाख रुपयांचा निधी जमा होतो. तसेच ही रक्कम परत करणे देखील अगदी सोपे असते अशा पद्धतीने क्राउड फंडिंग च्या माध्यमातून छोटी गुंतवणूक उभी करुन व्यवसाय उभा राहतो.
नक्की वाचा:Agri Bussiness:शेतीसोबत 'हा' व्यवसाय करा आणि कमवा महिन्यासाठी लाखो रुपये
क्राउड फंडिंग चा इक्विटी बेस प्रकार
क्राउड फंडिंगच्या या प्रकारांमध्ये तुम्ही ज्या व्यवसायासाठी फंडिंग करतात त्या व्यवसायाचे ठराविक मालकी प्रत्येक गुंतवणूकदाराला मिळते.
दुसरा प्रकार आहे रिवार्ड बेस्ड क्राउड फंडिंग
या प्रकारामध्ये प्रत्येकाने जितके पैसे गुंतवले आहेत त्या किमतीचे किंवा त्याहून अधिक लाभ संबंधित गुंतवणूकदाराला दिले जातात.
तसे पाहायला गेले तर क्राउड फंडिंग ही संकल्पना आपल्याकडे हव्या त्या प्रमाणात अजून देखील सुरू झाली नाही. परंतु आता बर्याच ठिकाणी उद्योजक या पद्धतीने व्यवसाय सहज रीत्या सुरु करत आहे.
Share your comments