Corona Update : कोरोना (Corona) पुन्हा एकदा डोकं वर काढायला सुरुवात केली आहे. कोरोना संसर्गाच्या रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. गेल्या 24 तासांत कोरोनाच्या (Covid-19) 4270 नव्या रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. तर 15 रुग्णांनी आपला जीव गमावला आहे.
भारतात कोरोना (Corona) संसर्गात पुन्हा एकदा वाढ होत असल्याचं दिसून येत आहे. राज्यातील कोरोनाची रुग्णसंख्या हळूहळू वाढताना दिसत आहे. कोरोनाच्या ऍक्टिव्ह रुग्णांची संख्या 24,052 इतकी आहे. तर रिकव्हरी रेट 98.73 टक्के इतका आहे.
राज्य सरकारचा मोठा निर्णय; 'या' योजनेंतर्गत मिळणार 50 हजार रुपये, जाणून घ्या सविस्तर...
कोरोनाच्या रुग्णसंख्येने काल (शनिवारी) सलग दुसऱ्या दिवशी हजाराचा टप्पा ओलांडला आहे. काल राज्यात 1357 नव्या रुग्णांची नोंद झाली. तर 595 रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. सर्वाधिक रुग्ण हे मुंबई शहरातील असून मुंबईत आज 889 रुग्णांची नोंद झाली आहे.
आता नसबंदी करा आणि मिळवा 'इतके' पैसे; सरकारचा मोठा निर्णय
राज्याच्या संपूर्ण मे महिन्यातील 9,185 प्रकरणांपैकी 50% पेक्षा जास्त रुग्णसंख्या अधिक दर्शवत आहे. याच पार्श्वभूमीवर मुंबई महापालिका सतर्क (BMC) झाली आहे. आणि आता उपययोजना करण्यास सुरुवात केली आहे. अशातच मुंबईत (Mumbai) चौथी लाट येणार तर नाही ना? अशी शंका तज्ज्ञांकडून व्यक्त केली जात आहे.
शेतकरी पुत्राचा नादच खुळा..! संकटावर मात करत शेतकरी पुत्र झाला 'आयएएस'
Share your comments