1. बातम्या

आता नसबंदी करा आणि मिळवा 'इतके' पैसे; सरकारचा मोठा निर्णय

मुंबई : गोरगरिबांच्या हितासाठी महाविकास आघाडी सरकार अनेक योजना राबवत आहे. महाराष्ट्र सरकारने आता ‘माझी कन्या भाग्यश्री’ ही योजना सुरू केली आहे. ही योजना मुलींचे कमी झालेले प्रमाण वाढवण्यासाठी आणिमहिलांच्या शिक्षणाला चालना देण्यासठी राबवण्यात येत आहे.

Uddhav Thackeray

Uddhav Thackeray

मुंबई : गोरगरिबांच्या हितासाठी महाविकास आघाडी सरकार अनेक योजना राबवत आहे. महाराष्ट्र सरकारने आता ‘माझी कन्या भाग्यश्री’ ही योजना सुरू केली आहे. ही योजना मुलींचे कमी झालेले प्रमाण वाढवण्यासाठी आणि महिलांच्या शिक्षणाला चालना देण्यासठी राबवण्यात येत आहे.

‘माझी कन्या भाग्यश्री’ ही योजना

‘माझी कन्या भाग्यश्री’ योजनेंतर्गत राज्यातील ज्या पालकांनी मुलीच्या जन्मानंतर 1 वर्षाच्या आत नसबंदी केली. त्यांना शासनाकडून 50,000 रुपये रक्कम दिली जाईल. आणि दुसऱ्या मुलीच्या जन्मानंतर कुटुंब नियोजनाचा अवलंब केला, तर नसबंदी केल्यानंतर दोन्ही मुलींच्या नावावर सरकार २५-२५ हजार रुपये सरकार देणार आहे.

शेतकरी पुत्राचा नादच खुळा..! संकटावर मात करत शेतकरी पुत्र झाला 'आयएएस'

‘माझी कन्या भाग्यश्री’ ही योजनेच्या अटी

१. या योजनेचा फायदा एका कुटुंबातील दोन मुलींना दिला जाईल.
२. महाराष्ट्रातील जास्तीत जास्त कुटुंबाना या योजनेचा लाभ मिळावा म्हणून सरकारने कुटुंबाच्या वार्षिक उत्प्नानाची मर्यादा १ लाख रुपयांवरून ७.५ लाख रुपये केले आहे.

ऊसाची एफआरपी वाढविण्याबाबत कॅबिनेट नोट जारी; शेतकऱ्यांना मिळणार मोठा दिलासा

आवश्यक कागदपत्रे

1. अर्जदाराचे आधारकार्ड
2. आईचे किंवा मुलीचे बँक खाते पासबुक
3. उत्पनाचा दाखला
4. पासपोर्ट फोटो
5. मोबाईल नंबर

अर्ज करण्याची पद्धत

अर्ज करण्यासाठी महाराष्ट्र सरकारच्या www.maharashtra.gov.in या अधिकृत वेबसाइटला भेट दया. नंतर भाग्यश्री योजनेचा फॉर्म डाउनलोड करा. फॉर्ममध्ये विचारलेली सर्व माहिती काळजीपूर्वक भरा. आणि योजनेचा लाभ घ्या. 

English Summary: Now sterilize and get money, big decision of the government Published on: 03 June 2022, 05:22 IST

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters