1. इतर बातम्या

सावधान! आज आर्थिक स्थिती बिघडण्याची शक्यता; जाणून घ्या तुमचे आजचे राशीभविष्य

मेष राशीच्या लोकांचे रखडलेलं काम पूर्ण होईल. पैसे मिळवण्यासाठी कष्ट वाढवण्याची गरज भासेल. मनात नकारात्मक विचारांना थारा देऊ नका. लांब पल्ल्याचा प्रवास टाळा. कौटुंबिक जीवनात संघर्ष असेल. लकी नंबर: 5 लकी कलर: Orange

रूपाली उत्तम कदम
रूपाली उत्तम कदम
horoscope today

horoscope today

मेष

मेष राशीच्या लोकांचे रखडलेलं काम पूर्ण होईल. पैसे मिळवण्यासाठी कष्ट वाढवण्याची गरज भासेल. मनात नकारात्मक विचारांना थारा देऊ नका. लांब पल्ल्याचा प्रवास टाळा. कौटुंबिक जीवनात संघर्ष असेल. लकी नंबर: 5 लकी कलर: Orange

वृषभ

वृषभ राशीच्या लोकांचे अचानक खर्च वाढतील. त्यामुळे आर्थिक परिस्थिती बिघडण्याची शक्यता आहे. खूप दूरवरून एखादी चांगली बातमी मिळेल. नातेवाईकांशी मतभेद होतील. आरोग्याबद्दल काळजी करण्याचं कारण असेल. प्रेमजीवनात नवा आनंद मिळेल. लकी नंबर: 9 लकी कलर: Red

मिथुन

मिथुन राशीची लोकांची दीर्घ काळापासून असलेल्या मानसिक चिंता दूर होईल. तुम्ही पूर्ण उत्साहाने काम कराल. प्रॉपर्टीशी संबंधित निर्णय शहाणपणाने, विचारपूर्वक घ्या. तरच नफा मिळणं शक्य आहे, अन्यथा तोटा सोसावा लागेल. कुटुंबाकडून पाठिंबा मिळेल. लकी नंबर : 3 लकी कलर : Badami

कर्क

कर्क राशीच्या लोकांचे सोयी सुविधांवरचे खर्च वाढतील. त्यामुळे एखाद्या व्यक्तीला कर्जही घ्यावं लागू शकतं. अनोळखी व्यक्तींना भेटाल.अपूर्ण राहिलेलं काम पूर्ण होईल. आरोग्याची काळजी घ्यावी लागेल. कामाच्या ठिकाणी वरिष्ठांकडून काही लाभ होतील. लकी नंबर : 4 लकी कलर : White

सिंह

आर्थिक लाभाची मोठी क्षमता आहे. तुम्हाला मिळणारा आदर आणखी वाढेल. तुम्ही तुमच्या क्षेत्रात केलेले प्रयत्न यशस्वी होतील. रागामुळे तोटा होईल. कुटुंबासमवेत वेळ व्यतीत केल्यास मनःशांती मिळेल. लकी नंबर: 10 लकी कलर : Light Red

कन्या

कन्या राशीच्या लोकांच्या करिअरमध्ये प्रगतीच्या संधी आहेत. तुमची कौशल्यं आणखी वृद्धिंगत करण्याची वेळ आली आहे. आरोग्य उत्तम असेल. प्रियकर/प्रेयसीबद्दल मनात काही तरी शंका निर्माण होईल. लकी नंबर : 3 लकी कलर : Orange

राज्यातील बाजार समित्यांमध्ये किती मिळतोय सोयाबीनला भाव? जाणून घ्या

तूळ

तूळ राशीच्या लोकांना नशीब साथ देईल. पैसे मिळवण्यासाठी केलेले प्रयत्न यशस्वी होतील. स्थलांतर फायद्याचं ठरेल. नातेवाईकांसोबतचे नातेसंबंध दृढ होतील. लकी नंबर : 7 लकी कलर : Saffron

वृश्चिक

शिक्षणाशी संबंधित कामं फायद्याची ठरतील. कोणाही बरोबर मतभेद असू शकतील. बोलण्यात मृदूपणा ठेवा. घाईगडबडीत निर्णय घेणं टाळा. पैसे मिळवण्यासाठी तुम्हाला खास प्रयत्न करावे लागतील. लकी नंबर : 1 लकी कलर : Sindoori

धनू

पूर्ण उत्साहाने काम कराल. कामाच्या ठिकाणी यश मिळेल. जास्त अंतराचे प्रवास टाळा. कोणताही महत्त्वाचा निर्णय घेण्यात उशीर करू नका. उशीर करून तुम्ही नफ्याची संधी हुकवाल. लकी नंबर : 10 लकी कलर : Maroon

शेतकरी मित्रांनो वासरांची वाढ 'या' कारणाने खुंटते; घ्या अशी काळजी

मकर

आज करिअरच्या दृष्टीने खास दिवस असेल. एखादं स्पेशल डील फायनल होईल. त्यातून आर्थिक फायदा होईल. प्रियकर-प्रेयसीमधला भावनिक बंध मजबूत होईल. आरोग्याकडे दुर्लक्ष करू नका. लकी नंबर : 5 लकी कलर : Cream

कुंभ

कुंभ राशीची लोक नव्या योजनांकडे लक्ष देतील आणि त्या भविष्यात फायद्याच्या ठरतील. आज कोणत्याही कायदेशीर वादात यश मिळेल. वैवाहिक नातेसंबंधात आनंदी असाल. लकी नंबर : 8 लकी कलर : Violet

मीन

आज कौटुंबिक जीवनात अस्थिरता असेल. आई-वडिलांशी तात्त्विक मतभेद असतील. प्रेमप्रकरणांसाठी काळ चांगला आहे. नोकरदार व्यक्ती आपल्या कष्टांनी वरिष्ठांचं समाधान करू शकतील. लकी नंबर : 8 लकी कलर : Green

महत्वाच्या बातम्या 
शेतकऱ्यांसाठी किसान विकास पत्र योजना ठरतेय अत्यंत फायदेशीर; गुंतवणूकदारांचे पैसे होतात दुप्पट
कांदा उत्पादक शेतकरी संकटात; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी घेतला 'हा' निर्णय
महत्वाचे! PM आवास योजनेअंतर्गत घर मिळाले नसेल तर 'या' नंबरवर करा कॉल

English Summary: Chances economic deterioration today your horoscope today Published on: 15 September 2022, 06:00 IST

Like this article?

Hey! I am रूपाली उत्तम कदम. Did you liked this article and have suggestions to improve this article? Mail me your suggestions and feedback.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters