1. सरकारी योजना

शेतकऱ्यांनो 'या' योजनेतून दरमहा मिळवा 3 हजार रुपये; सरकार देतंय पेन्शन

केंद्र व राज्य सरकार शेतकऱ्यांसाठी नवनवीन योजना राबवत असते. यामध्ये पीएम किसान मानधन योजनेचा समावेश होतो. या योजनेद्वारे शेतकऱ्यांना वयाची 60 वर्ष पूर्ण झाल्यानंतर मोदी सरकारकडून पेन्शन दिली जाते.

रूपाली उत्तम कदम
रूपाली उत्तम कदम
Farmers 3 thousand

Farmers 3 thousand

केंद्र व राज्य सरकार (Central and State Govt) शेतकऱ्यांसाठी नवनवीन योजना राबवत असते. यामध्ये पीएम किसान मानधन योजनेचा समावेश होतो. या योजनेद्वारे शेतकऱ्यांना वयाची 60 वर्ष पूर्ण झाल्यानंतर मोदी सरकारकडून पेन्शन दिली जाते.

PM किसान मानधन ही योजना लहान आणि अल्पभूधारक शेतकऱ्यांना मासिक पेन्शन (Monthly Pension) देणारी योजना आहे. ज्यामध्ये वयाच्या 60 वर्षांनंतर 3000 रुपये म्हणजेच 36000 रुपये वार्षिक पेन्शन शेतकऱ्यांना प्रत्येक महिन्याला दिली जाते.

18 ते 40 वर्षे वयोगटातील शेतकरी (farmers) या योजनेत नोंदणी करू शकतात. माहितीनुसार शेतकऱ्यांना त्यांच्या वयानुसार या योजनेत मासिक योगदान द्यावे लागेल. वयोमानानुसार शेतकऱ्यांना दरमहा 55 ते 200 रुपये जमा करावे लागतात. मात्र या योजनेचा लाभ घेण्यासाठी नोंदणी करावी लागेल.

'या' वनस्पतीची लागवड करून मिळवा भरघोस उत्पन्न; केंद्र सरकारही करतंय मदत

नोंदणी अशाप्रकारे करा

1) पीएम किसान मानधन योजनेसाठी प्रथम जवळच्या कॉमन सर्व्हिस (Common Service) सेंटरमध्ये जावा.
2) वार्षिक उत्पन्न आणि तुमच्या जमिनीशी संबंधित सर्व कागदपत्रे सादर करणे गरजेचे आहे.
3) यासोबतच पैसे घेण्यासाठी तुमच्या बँक खात्याची माहिती द्या.
4) त्यानंतर तेथे सापडलेला अर्ज तुमच्या आधार कार्डसोबत लिंक करा.

गुंठा, एकर, हेक्टरमध्ये शेत जमिनीची मोजणी कशाप्रकारे करतात? जाणून घ्या

5) यानंतर तुम्हाला पेन्शन नंबर आणि पेन्शन कार्ड (pension card) दिले जाईल. या योजनेबद्दल अधिक माहितीसाठी, तुम्ही १८००-२६७-६८८८ या टोल फ्री क्रमांकावरही संपर्क साधू शकता.
6) याशिवाय या योजनेत सहभागी होण्यासाठी तुम्ही ऑनलाइन अर्जही करू शकता. यासाठी तुम्हाला अधिकृत वेबसाइट maandhan.in ला भेट द्यावी लागेल.
7) या ठिकाणी योजनेचा फॉर्म भरून मागवलेल्या कागदपत्रांची माहिती भरावी लागेल. त्यानंतर हा फॉर्म जमा करावा लागेल. यानंतर पेन्शन क्रमांक आणि पेन्शन कार्ड उपलब्ध होईल.

महत्वाच्या बातम्या 
LIC ची नवीन योजना लाँच; फक्त 5 हजार रुपयांमध्ये जबरदस्त फायदे आणि बोनसही
आजचा संपूर्ण दिवस ठरणार फायद्याचा; जाणून घ्या आजचे राशीभविष्य
मसाले, औषधे आणि चहामध्ये वापरल्या जाणार्‍या 'या' पिकाची लागवड करा आणि व्हा करोडपती

English Summary: Farmers 3 thousand rupees month scheme Government pension Published on: 15 September 2022, 10:41 IST

Like this article?

Hey! I am रूपाली उत्तम कदम. Did you liked this article and have suggestions to improve this article? Mail me your suggestions and feedback.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters