1. ऑटोमोबाईल

Tvs Bike: मोबाईलच्या किंमतीत खरेदी करा टिव्हिएसची ही दमदार बाईक; जाणुन घ्या या ऑफरविषयी

नवी मुंबई: TVS ही भारतातील एक अग्रगण्य मोटोकॉर्प कंपनी म्हणुन ओळखली जाते. कंपनीची TVS स्पोर्ट्स ही भारतीय बाजारपेठेत उपलब्ध बजेट सेगमेंटमधील स्पोर्टीलुकवाली दमदार बाइक आहे. कंपनीने या बाइकमध्ये अधिक मायलेज आणि आकर्षक डिझाइन दिले आहे. ही बाईक ₹60,130 एक्स-शोरूमच्या सुरुवातीच्या किंमतीसह बाजारात उपलब्ध आहे.

अजय वसंत शिंदे
अजय वसंत शिंदे
TVS Sport

TVS Sport

नवी मुंबई: TVS ही भारतातील एक अग्रगण्य मोटोकॉर्प कंपनी म्हणुन ओळखली जाते. कंपनीची TVS स्पोर्ट्स ही भारतीय बाजारपेठेत उपलब्ध बजेट सेगमेंटमधील स्पोर्टीलुकवाली दमदार बाइक आहे. कंपनीने या बाइकमध्ये अधिक मायलेज आणि आकर्षक डिझाइन दिले आहे. ही बाईक ₹60,130 एक्स-शोरूमच्या सुरुवातीच्या किंमतीसह बाजारात उपलब्ध आहे.

कंपनीने या बाईकचे टॉप व्हेरियंट ₹ 66,493 च्या किमतीत बाजारात आणले आहे. जर तुमचे बजेट यापेक्षा कमी असेल, तर आम्ही तुम्हाला सांगू इच्छितो की अनेक ऑनलाइन सेकंड हॅन्ड बाईक खरेदी विक्री करणाऱ्या वेबसाइट्स या बाइकवर आकर्षक डील देत आहेत.

OLX वेबसाइटवर ऑफर:

जर तुम्हाला TVS स्पोर्ट्स ही सेकंड हॅन्ड बाईक खरेदी करायची असेल तर आपण OLX वेबसाइटवर दिलेल्या आकर्षक डीलचा एकदा अवश्य विचार करू शकता. बाईकचे 2014 चे मॉडेल या वेबसाइटवर विक्रीसाठी उपलब्ध करून देण्यात आले आहे. कंपनीने या बाईकची किंमत 18,000 रुपये ठेवली आहे. या ऑनलाइन वेबसाइटवर फायनान्स प्लॅन उपलब्ध नाही.

बाइकदेखो वेबसाइटवर ऑफर:

तुम्ही BIKEDEKHO वेबसाइटवर दिलेल्या आकर्षक डीलचा देखील एकदा अवश्य विचार करू शकता. TVS स्पोर्ट्स ही 2015 मॉडेल बाईक या वेबसाइटवर विक्रीसाठी उपलब्ध करून देण्यात आली आहे. कंपनीने या बाईकची किंमत ₹ 20,000 ठेवली आहे. या ऑनलाइन वेबसाइटवर वित्त सुविधा उपलब्ध नाही.

ड्रूम वेबसाइटवर ऑफर:

तुम्ही टीव्हीएस स्पोर्ट्स बाईक DROOM वेबसाइटवर दिलेल्या आकर्षक डीलसह खरेदी करू शकता. बाइकचे 2015 मॉडेल या वेबसाइटवर विक्रीसाठी उपलब्ध करून देण्यात आले आहे. कंपनीने या बाईकची किंमत ₹ 20,000 ठेवली आहे. आर्थिक सुविधेचा लाभही या ऑनलाइन वेबसाइटवर उपलब्ध आहे.

TVS स्पोर्ट्स बाइकचे फिचर्स:

TVS स्पोर्ट्स बाईकमध्ये कंपनीने सिंगल सिलिंडर 109.7 सीसी इंजिन प्रदान केले आहे. हे इंजिन 8.7 Nm पीक टॉर्कसह 8.29 PS कमाल पॉवर निर्माण करण्यास सक्षम आहे. कंपनीने हे इंजिन 4 स्पीड गिअरबॉक्ससोबत पेअर केले आहे. या बाईकच्या मायलेजबद्दल कंपनीचा दावा आहे की TVS स्पोर्ट्स बाईक 76.4 किलोमीटर प्रति लीटर मायलेज देण्यास सक्षम आहे. हे मायलेज ARAI ने प्रमाणित केले आहे.

English Summary: Tvs Bike: Buy this powerful TVS bike at a mobile price; Learn about this offer Published on: 29 May 2022, 02:29 IST

Like this article?

Hey! I am अजय वसंत शिंदे. Did you liked this article and have suggestions to improve this article? Mail me your suggestions and feedback.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters