स्वतःचे घर असावे हे प्रत्येकाचे स्वप्न असते. परंतु घर बांधणेही सद्यपरिस्थितीत सोपी गोष्ट राहिली नसून सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर मी बाब गेली आहे. कारण आपल्याला माहित आहेच कि घर बांधण्यासाठी लागणाऱ्या स्टील,सिमेंट, वाळू तसेच विटांपासून असणाऱ्या साहित्याचे दर प्रचंड प्रमाणात वाढल्यामुळे घर बांधणे ही गोष्ट खूप अवघड होऊन बसले आहे.
नक्की वाचा:धक्कादायक! शेती विकूनही कर्ज संपेना; एकाच साडीला पती-पत्नीने गळफास घेऊन केली आत्महत्या
परंतु जर आता कुणाला घर बांधायचे असेल तर त्यांच्यासाठी ही बातमी खूप आनंदाची व महत्त्वपूर्ण असून घर बांधण्यासाठी आवश्यक असलेले सिमेंट आणि बारच्या किमतीमध्ये कमालीची घसरण झाली आहे. यामागे असलेल्या कारणांचा विचार केला तर सरकारने उचलली काही ठोस पावले आणि मान्सून मुळे मागणी नसल्यामुळे ही घसरण झाली आहे.
नक्की वाचा:Gadkari Announcement:छोटे गुंतवणूकदार देखील होतील मालामाल,असा आहे नितीन गडकरींचा प्लॅन
न्यूज 18 लोकमतच्या बातमीनुसार आपण विचार केला तर बारची किरकोळ किंमत 65 हजार रुपये प्रतिटन झाली असून एप्रिल मध्ये ती 75 हजार रुपये प्रतिटन होती.
म्हणजे तब्बल दहा हजार प्रतिटन घसरण झाली आहे. तसेच काही ब्रांडेड बारची किंमत एक लाख रुपये प्रतिटन होती ती आता तब्बल प्रतिटन 15 हजाराने घसरून 85 हजार प्रती टनांपर्यंत आले आहे.
सिमेंटचे दरही घसरले
जर आपण सिमेंटच्या दराचा विचार केला तर एप्रिल महिन्यामध्ये 50 किलोची बॅगने चारशे पन्नास रुपयांचा टप्पा ओलांडला होता परंतु ती आता थेट पन्नास रुपयांनी घसरून चारशे रुपयांपर्यंत मिळत आहे. तसेच टाइल्स, विटांच्या दरदेखील कमी झाले आहेत.
Share your comments