Business Idea: देशातील युवावर्ग आता नोकरींऐवजी व्यवसाय करण्यात अधिक रस दाखवत असल्याचे चित्र बघायला मिळत आहे. अशा परिस्थितीत जर तुम्ही सुद्धा व्यवसाय करण्याच्या तयारीत असाल किंवा नोकरी सोबतच अतिरिक्त उत्पन्न कमवायचे असेल तर आज आम्ही तुमच्यासाठी एक बिझनेस आयडिया घेऊन आलो आहोत.
मित्रांनो जस की आपणास ठाऊकच आहे अलीकडेच, सरकारने देशात सर्व प्रकारच्या एकल वापराच्या प्लास्टिक सामग्रीवर बंदी घातली आहे. या निर्णयानंतर प्लास्टिकच्या वस्तू बनवणाऱ्या अनेक कारखान्यांनाही टाळे ठोकण्यात आले आहेत. अशा परिस्थितीत जर तुम्ही पेपर कप आणि पेपर प्लेट्सचा व्यवसाय सुरू केला तर तुम्हाला यातून खूप फायदा होणार आहे.
व्यवसाय कसा सुरू करायचा ते जाणून घ्या
हा व्यवसाय सुरू करण्यासाठी तुम्हाला जास्त गुंतवणूक करण्याची गरज नाही. तुम्हाला फक्त एक मशीन लागेल आणि या मशीनसोबत तुम्हाला 500 स्क्वेअर फूट जागा किंवा गाळा लागेल. हा व्यवसाय सुरू करण्यासाठी तुम्ही सरकारची मदत घेऊ शकता कारण सरकार मुद्रा कर्ज योजनेच्या माध्यमातून व्यवसायिकांना कर्ज उपलब्ध करून देत आहे.
या योजनेत, तुम्हाला तुमच्या स्वतःच्या वतीने फक्त 25% गुंतवणूक करावी लागेल. याशिवाय कर्मचारी ठेवल्यास महिन्याला सुमारे 30 ते 35 हजार रुपये मोजावे लागतात. एकूणच, जर आपण एकूण खर्चाबद्दल बोललो, तर हा नवीन व्यवसाय सुरू करण्यासाठी तुमचा एकूण खर्च 3 ते 4 लाखांपर्यंत असू शकतो.
तथापि, इतका खर्च केल्यानंतर, तुमचा नफा यापेक्षा जास्त असू शकतो कारण जर तुम्ही वर्षभरात एकूण 300 दिवस काम करत राहिला, तर अशा परिस्थितीत तुम्ही 2.20 कोटी पेपर कप तयार करू शकता आणि जर ते 30 पैसे प्रति कप प्रमाणे विकले तर त्यातून तुमची 60 लाखांची उलाढाल होणार आहे.
निश्चितचं हा व्यवसाय व्यवसाय सुरू करू इच्छिणाऱ्या व्यक्तींसाठी मोठा फायद्याचा ठरणार आहे. कमी खर्चात लाखों रुपये कमवायचे असतील तर पेपर कप अँड पेपर प्लेटचा व्यवसाय तुमच्यासाठी एक बेस्ट ऑप्शन ठरु शकतो.
Share your comments