1. इतर बातम्या

Business Idea: एका खोलीत सुरु करा हा व्यवसाय, 2 लाखाचे 20 लाख मिळतील

Business Idea: आज आम्ही तुम्हाला अशी बिजनेस आयडिया देत आहोत, जो सुरू करताच तुमची लॉटरी लागणार आहे. हा असा व्यवसाय आहे ज्यामध्ये खूप कमी खर्च आणि कमाई बंपर आहे. आम्ही तुम्हाला फ्रोझन पीस अर्थात फ्रोजन मटर बिझनेसबद्दल सांगणार आहोत. या व्यवसायात तुम्हाला भरपूर कमाई होणार आहे.

अजय वसंत शिंदे
अजय वसंत शिंदे
business idea 2022

business idea 2022

Business Idea: आज आम्ही तुम्हाला अशी बिजनेस आयडिया देत आहोत, जो सुरू करताच तुमची लॉटरी लागणार आहे. हा असा व्यवसाय आहे ज्यामध्ये खूप कमी खर्च आणि कमाई बंपर आहे. आम्ही तुम्हाला फ्रोझन पीस अर्थात फ्रोजन मटर बिझनेसबद्दल सांगणार आहोत. या व्यवसायात तुम्हाला भरपूर कमाई होणार आहे.

मित्रांनो हा व्यवसाय सुरू करण्यासाठी तुम्हाला वाटाण्याची आवश्यकता लागणार आहे. तुम्ही शेतकऱ्यांकडून वाटाणे खरेदी करून तुमचा व्यवसाय सुरू करू शकता. वाटाण्याला वर्षभर मागणी असते पण वाटाणा हिवाळ्यातच मिळतो. यामुळे पावसाळ्यात आणि उन्हाळ्यात फ्रोजन मटरची मागणी वाढते. यामुळे हा व्यवसाय निश्चितच फायद्याचा सौदा ठरणार आहे.

तुम्हाला जर हा व्यवसाय सुरु करायचा असेल तर सर्व प्रथम या व्यवसायासाठी भरपूर वाटाणे खरेदी करावे लागणार आहेत. तुम्हाला किती मटार लागतील ते तुम्ही किती मोठा व्यवसाय करू इच्छिता यावर अवलंबून असेल. तुम्हाला मार्केट रिसर्च करावे लागेल आणि तुम्ही एका वर्षात किती फ्रोझन मटर विकू शकता याची कल्पना मिळवावी लागेल.

व्यवसाय एका खोलीत देखील सुरू केला जाऊ शकतो:

हा व्यवसाय तुम्ही तुमच्या घरातून किंवा छोट्या खोलीतून छोट्या प्रमाणावर सुरू करू शकता, परंतु मोठ्या प्रमाणावर व्यवसाय सुरू करण्यासाठी तुम्हाला 4000 चौरस फूट जागा लागेल. लहान प्रमाणात व्यवसाय करून दहा रुपये किलो दराने वाटाणे खरेदी केले तर दोन किलो मटारमध्ये एक किलो मटार निघेल.

म्हणजेच, हिरवे वाटाण्यासाठी तुम्हाला वीस रुपये मोजावे लागतील आणि त्यावर प्रक्रिया केल्यानंतर, तुम्ही ते सहजपणे 120 रुपये किलोपर्यंत विकू शकता. दुसरीकडे, जर तुम्ही ते थेट किरकोळ विक्रेत्यांना विकले तर तुम्ही 180 ते 200 रुपये किलोने विकू शकता. तुम्ही ते थेट जवळच्या दुकाने, रेस्टॉरंट, ढाबे किंवा मॉल्स इत्यादींच्या स्टोअरमध्ये पुरवू शकता.

सुरुवात कशी करावी?

तुम्ही तुमच्या घरातील एका छोट्या खोलीतून फ्रोजन मटारचा व्यवसाय सुरू करू शकता. मात्र, मोठ्या प्रमाणावर व्यवसाय करायचा असेल तर 4 हजार ते 5 हजार चौरस फूट जागा आवश्यक आहे.

त्याच वेळी, लहान प्रमाणात व्यवसाय सुरू करताना हिरवे वाटाणे सोलण्यासाठी काही मजुरांची आवश्यकता असेल. मोठ्या प्रमाणावर तुम्हाला वाटाणा सोलण्याची मशीनची आवश्यकता असेल. तसेच काही परवाने देखील आवश्यक असतील.

किती होणार कमाई 

फ्रोझन मटारचा व्यवसाय सुरू केल्यास किमान 50 ते 80 टक्के नफा मिळू शकतो. हिरवा वाटाणा शेतकऱ्यांकडून 10 रुपये किलो या दराने खरेदी करता येतो. यामध्ये दोन किलो मटारमध्ये सुमारे 1 किलो फ्रोजन मटर बाहेर येते.

जर तुम्हाला मटारची किंमत बाजारात 20 रुपये किलोवरून मिळत असेल, तर तुम्ही या वाटाण्यांवर प्रक्रिया करून मोठ्या प्रमाणात 120 रुपये किलो दराने विकू शकता. त्याच वेळी, जर तुम्ही फ्रोझन मटारचे पॅकेट थेट किरकोळ दुकानदारांना विकले तर तुम्हाला प्रति किलो पॅक 200 रुपये नफा मिळू शकतो.

फ्रोजन मटर कसे बनवतात हे जाणून घ्या?

फ्रोझन मटार बनवण्यासाठी, मटार प्रथम सोलले जातात. यानंतर मटार सुमारे 90 अंश सेंटीग्रेड तापमानात उकळले जातात.नंतर मटारचे दाणे 3-5 अंश सेंटीग्रेड पर्यंत थंड पाण्यात टाकले जातात, त्यामुळे त्यात सापडणारे बॅक्टेरिया मरतात. यानंतर, पुढील काम हे मटार 40 अंशांपर्यंत तापमानात ठेवणे आहे. जेणेकरून मटारमध्ये बर्फ गोठतो. मग मटार वेगवेगळ्या वजनाच्या पॅकेटमध्ये पॅक करून बाजारात पोहोचतात.

फ्रोझन मटार व्यवसाय मजबूत नफा देतो:

जर तुम्ही फ्रोझन मटारचा व्यवसाय केलात तर तुम्हाला भरपूर नफा मिळू शकतो. याद्वारे तुम्हाला 50 ते 80 टक्के नफा मिळू शकतो. उद्योग स्तरावरही तुम्ही 25 ते 30 टक्के नफा मिळवू शकता. जर तुम्ही माल थेट किरकोळ विक्रेत्याला विकला तर तो 200 रुपये प्रति किलोपर्यंत विकू शकता, जो आज तुम्ही फक्त 20 रुपयांना खरेदी कराल. अर्थातच तुम्ही तर थेट किरकोळ विक्रेत्यास तुमचा माल विकला तर तुम्हाला दोन लाखाचे वीस लाख मिळतील.

English Summary: business idea invest 2 lakh and earn 20 lakh Published on: 05 July 2022, 09:10 IST

Like this article?

Hey! I am अजय वसंत शिंदे. Did you liked this article and have suggestions to improve this article? Mail me your suggestions and feedback.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters