Bull Cart Race: शेतकऱ्यांच्या मनोरंजनाचा भाग म्हणजे बैलगाडा शर्यत होय अशी भावना अनेक शेतकरी व्यक्त करत असतात. त्यामुळेच गेल्या काही वर्षांपासून शेतकऱ्यांसह बैलगाडा हौशी बैलगाडा शर्यतीवरील बंदी हटवण्यासाठी प्रयत्न करत होते. जेव्हा सर्वोच्च न्यायालायने बैलगाडा शर्यतींवरील बंदी उठवली तेव्हा पश्चिम महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात बैलगाडा शर्यतींचे आयोजन केले गेले. नुकतीच देशातील सर्वात मोठी बैलगाडा शर्यत ही पुणे जिल्ह्यात भरवण्यात आली होती.
त्यानंतर कर्जत येथे बैलगाडा शर्यतीचे आयोजन करण्यात आले होते. आता प्रत्येक भागात बैलगाडी शर्यत भरवण्यात येत आहे. मात्र या शर्यतीदरम्यान बैलांवर बरेच अत्याचार झालेले आपण पहिले आहेत म्हणून या शर्यतींवर बंदी घालण्यात आली होती. मात्र बैलगाडी शर्यत प्रेमींनी यावरील बंदी हटवण्यासाठी बरेच प्रयत्न केले.
मात्र परवानगी देऊन वर्षही झाले नाही तोच बैलांवरील दुष्कृत्यांना सुरुवात झाली आहे. बैलांना शॉक देणे, काठीचा वापर करणे, दुचाकीने गाडी ढकलणे, शेपटीचे चावे असे एक ना अनेक प्रकार सुरु झाले आहेत. मात्र या शर्यतीत कडक पोलीस बंदोबस्त तसेच छायाचित्रण असतानाही हे प्रकार घडत असल्याने यात प्रशासनचा सहभाग असल्याची शंका निर्माण झाली आहे.
आगोदर ऊस पेटवला आता सोडतायेत गुरे; अतिरिक्त उसाचा राडा काही संपेना
बैलांना पळविण्यासाठी शॉक देणारी चार्जिंगची बॅटरीचा सर्वाधिक वापर केला जात आहे. ही बॅटरी हजार-बाराशे रुपयांपर्यंत येते. या बॅटरीची मागणी वाढल्याने इतर ठिकाणीही त्याची निर्मिती सुरु झाली आहे. सध्या म्हैसाळ (ता. मिरज) या भागात त्याची निर्मिती होत असल्याचे समोर आले आहे. बऱ्याचदा छोटी बैलगाडी शर्यत असेल तर पोलिसांची अनुपस्थिती असते. तसेच ड्रोनसारख्या यंत्रणेतून उंचावरून छायाचित्रण होत असल्याने शॉकसारखे दुष्कृत्य दिसत नाही. त्यामुळे स्थानिक महसूल प्रशासनाची संयोजकांशी हातमिळवणी झाली आहे का? असा प्रश्न उपस्थित होतो.
शर्यतीमध्ये नियमांचे उल्लंघन केल्यास ५० हजार रुपयांची अनामत जप्त केली जाते. पश्चिम महाराष्ट्र बैलगाडी रेसिंग असोसिएशन चे सचिव बाळासाहेब पाटील यांनी बैलगाड्या शर्यतीमध्ये होत असलेल्या दुष्कृत्यांबद्दल बोलताना म्हणाले की,आतापर्यंत सांगली व कोल्हापूर जिल्ह्यांमध्ये वीस अधिकृत शर्यती संपन्न झाल्या आहेत. याच्या व्यतिरिक्त जेवढ्या शर्यती झाल्या त्या सर्व बेकायदेशीर व विनापरवाना आहेत.
यावर निर्बंध आणण्यासाठी संघटनास्तरावर प्रयत्न चालू आहेत. तसेच पोलिसांनीही बेकायदेशीर शर्यती थांबवण्यासाठी तातडीने कारवाई केली पाहिजे. श्री छत्रपती शाहू पश्चिम महाराष्ट्र बैलगाडी रेसिंग असोसिएशनचे अध्यक्ष नारायण गाडगीळ यांनी याबद्दल आपले मत व्यक्त करताना म्हणाले, नियमानुसारच शर्यती घ्याव्यात असं सर्व संयोजकांना वेळोवेळी आवाहनआम्ही आवाहन करत असतो. पण तरीही गैरप्रकार हे सुरूच आहेत.
त्यातल्या त्यात सांगली जिल्ह्यात याचे प्रमाण सर्वाधिक आहे. बैलांचा छळ वाढतच आहे. त्यामुळे शर्यतींवर पुन्हा निर्बंध लागू होतील याचे भान संयोजकांनी राखायला पाहिजे. मिरज प्रांताधिकारी समीर शिंगटे यांनी मात्र परवानगीनिशी घेतलेल्या शर्यतीत नियम उल्लंघनाच्या तक्रारी नसल्याचे स्प्ष्ट केले आहे. तसेच नियमांचे झाल्यास गुन्हे दाखल करू असेही ते म्हणाले. शिवाय शर्यतीत तहसीलदार व सक्षम पोलीस अधिकाऱ्याची नियुक्ती करण्यात येते व व्हिडिओ छायाचित्रणही होत असल्याचे त्यांनी सांगितले.
महत्वाच्या बातम्या:
बेसावधपणा येणार अंगलट; देशात सापडले दोन महिन्यातील सर्वाधिक रुग्ण
5 वर्षांपूर्वी लोकांची शेती करणारा पठ्ठ्या आज बनला 16 एकराचा मालक,वाचा नेमकं केलं तरी काय
Share your comments