सन 2018-19 पासून राज्यात भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजना नव्याने सुरु करण्यात आली आहे. या योजनेमध्ये केंद्र शासनाच्या महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेतर्गत जे लाभार्थी फळबाग लागवड बाबीचा लाभ घेऊ शकत नाही, त्यांना लाभ देण्यात येणार आहे. सदर योजना शासनाच्या कृषी विभागामार्फत राबविली जात आहे.
या योजनेमध्ये खालील फळबागांच्या लागवडीसाठी अनुदान देण्यात येणार आहे.
अ.क्र. |
फळपिक |
अंतर (मी) |
हेक्टरी झाडे संख्या |
प्रति हेक्टरी कमाल अनुदान मर्यादा (रु.) |
१ |
आंबा कलमे |
१० x १० |
१०० |
५३,५६१/- |
२ |
आंबा कलमे (सधन लागवड) |
५ x ५ |
४०० |
१,०१,९७२/- |
३ |
काजू कलमे |
७ x ७ |
२०० |
५५,५७८/- |
४ |
पेरू कलमे (सधन लागवड) |
३ x २ |
१६६६ |
२०,२०९०/- |
५ |
पेरू कलमे |
६ x ६ |
२७७ |
६२,२५३/- |
६ |
डाळिंब कलमे |
४.५ x ३ |
७४० |
१,०९,४८७/- |
७ |
संत्रा, मोसंबी, कागदी लिंबू कलमे |
६ x ६ |
२७७ |
६२,५७८/- |
८ |
संत्रा कलमे |
६ x ३ |
५५५ |
९९,७१६/- |
९ |
नारळ रोपे वानावली |
८ x ८ |
१५० |
५९,६२२/- |
१० |
नारळ रोपे टी/डी |
८ x ८ |
१५० |
६५,०२२/- |
११ |
सीताफळ कलमे |
५ x ५ |
४०० |
७२,५३१/- |
१२ |
आवळा कलमे |
७ x ७ |
२०० |
४९,७३५/- |
१३ |
चिंच कलमे |
१० x १० |
१०० |
४७,३२१/- |
१४ |
जांभूळ कलमे |
१० x १० |
१०० |
४७,३२१/- |
१५ |
कोकम कलमे |
७ x ७ |
२०० |
४७,२६०/- |
१६ |
फणस कलमे |
१० x १० |
१०० |
४३,५९६/- |
१७ |
अंजीर कलमे |
४.५ x ३ |
७४० |
९७,४०६/- |
१८ |
चिकू कलमे |
१० x १० |
१०० |
५२,०६१/- |
हेही वाचा:‘या’ कारणांमुळे आंबा उत्पादन कमी होण्याची शक्यता
योजनेची ठळक वैशिष्ट्ये :
- योजनेत भाग घेऊन झाडे लागवडीचा( Cultivation) कालावधी मे ते नोव्हेंबर असा राहणार आहे.
- योजनेत भाग घेणाऱ्या शेतकऱ्यांना मंजूर अनुदान पहिल्या वर्षी ५०%, दुसऱ्या वर्षी ३०% आणि तिसऱ्या वर्षी २०% अश्या तीन वर्षात देण्यात येणार असून लाभार्थी शेतकऱ्याने दुसऱ्या व तिसऱ्या वर्षीच्या अनुदानाचा लाभ घेण्यासाठी लागवड केलेल्या झाडांचे जीविताचे प्रमाण बागायती झाडांसाठी ९०% तर कोरडवाहू झाडांसाठी ८०% ठेवणे आवश्यक आहे. हे प्रमाण कमी झाल्यास शेतकऱ्याने स्वखर्चाने झाडे आणून पुन्हा जिवंत झाडांचे प्रमाण विहित केल्याप्रमाणे राखणे आवश्यक आहे.
- या योजनेत भाग घेण्यासाठी शेतकरी कोंकण विभागात कमीत कमी १० गुंठे तर जास्तीच जास्त १० हे. आणि इतर विभागात कमीत कमी २० गुंठे तर जास्तीच जास्त ६ हे. क्षेत्र मर्यादेत लाभ घेऊ शकतो.
- महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेतर्गत पात्र लाभार्थांना प्रथम त्या योजनेतील निकषाप्रमाणे लाभ घेणे आवश्यक आहे, उर्वरित क्षेत्रासाठी (वरील क्षेत्र मर्यादेच्या अधीन राहून) लाभार्थी या योजनेतून लाभ घेऊ शकतात.
- अल्प, अत्यल्प भूधारक, महिला आणि दिव्यांग शेतकऱ्यांना या योजनेत प्राधान्य आहे.
- या योजनेत लाभ घेण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध झाल्यापासून २१ दिवसाचे आत शेतकऱ्याने विहित नमुन्यात संबधित कृषी विभागाकडे अर्ज करावा. तद नंतर संबंधित तालुक्याला दिलेल्या लक्षांकापेक्षा जास्त अर्ज आल्यास जाहीर सोडतीद्वारे (Lottery) पद्धतीने लाभार्थी निवड करून, निवड झालेल्या लाभार्थींना पूर्व संमती पत्र दिले जाईल. पूर्व संमती मिळाल्यानंतर ७५ दिवसांचे आत लाभार्थाने लागवड पूर्ण करणे आवश्यक आहे. अन्यथा त्याची पूर्व संमत्ती रद्द समजून पुढील शेतकऱ्यास पूर्व संमती दिली जाईल.
या योजनेत शेतकऱ्याने स्वतः करावयाच्या आणि शासन अनुदानीत बाबी पुढीलप्रमाणे आहेत
शासन योजनेत अनुदानीत बाबी (१००% शासन अनुदान) |
लाभार्थी शेतकऱ्याने स्व: खर्चाने करावयाच्या बाबी (यास शासनाचे अनुदान नाही) |
झाडे लागवडीसाठी खड्डे खोदणे |
लागवडीसाठी जमीन तयार करणे |
कलमे/रोपे लागवड करणे |
सुपीक माती, शेणखत मिश्रणाने खड्डे भरणे |
पिक संरक्षण औषधे |
रासायनिक खत टाकणे |
नांग्या भरणे |
आंतर मशागत करणे |
ठिबक सिंचन बसविणे |
काटेरी झाडांचे कुंपण करणे (ऐच्छिक) |
लाभार्थी पात्रता इतर निकष :
- सर्व प्रवर्गाअंतर्गत ज्या शेतकऱ्यांच्या कुटुंबाची उपजीविका केवळ शेतीवर अवलंबून आहे त्यांना प्रथम प्राधान्य देण्यात येईल व त्यानंतर अन्य शेतकऱ्यांचा विचार करण्यात येईल. (कुटुंबाची व्याख्या: पती, पत्नी, व अज्ञात मुले)
- लाभ वैयक्तिक शेतकऱ्यांना देय आहे. संस्थात्मक लाभार्थांना देय नाही.
- शेतकऱ्यास स्वतःच्या नावावर ७/१२ असणे आवश्यक आहे. संयुक्त मालकी असल्यास इतर खातेदारांच्या संमतीने शेतकऱ्यास स्वतःच्या हिश्याच्या मर्यादेत लाभ घेता येईल.
- ७/१२ वर कुळाचे नाव असल्यास कुळाची संमती आवश्यक आहे.
- परंपरागत वन निवासी (वन अधिकार मान्यता) अधिनियम २००६ नुसार वनपट्टे धारक शेतकरी लाभ घेण्यास पात्र आहेत.
- इतर शासकीय योजनेतून फळबाग लागवड केली असल्यास ते क्षेत्र वगळून वरील विभागानुसारच्या क्षेत्र मर्यादेत शेतकऱ्यास लाभ घेता येईल.
योजनेत सहभागी होण्यासाठीचा अर्ज महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागाचे पुढील संकेतस्थळावर www.krishi.maharashtra.gov.in योजनेच्या सविस्तर माहितीसाठी व योजनेत सहभागी होण्यासाठी संबंधित तालुका कृषी अधिकारी कार्यालयाशी संपर्क साधावा.
श्री. विनयकुमार आवटे
अधिक्षक कृषी अधिकारी (महाग्ररोहयो), पुणे
९४०४९६३८७०
Share your comments