ज्या शेतकऱ्यांकडे किसान क्रेडिट कार्ड नाही अशा शेतकऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. जर आपण पीएम किसान सम्मान निधि योजनाचे लाभार्थी असाल आणि आतापर्यंत आपल्याकडे किसान क्रेडिट कार्ड नाही. तर आपल्याला किसान क्रेडिट कार्ड बनवणे फारच सोपं झालं आहे. आपण pmkisaan.gov.in या संकेतस्थळावर क्रेडिट कार्डसाठी फॉर्म डाऊनलोड करू शकतात. त्यासाठी आपल्याला एक पानाचा फॉर्म भरणे आवश्यक असते आणि आधार कार्डची एक झेरॉक्स कॉपी द्यायला लागते. सरकार पीएम किसान योजनेच्या लाभार्थ्यांच्या डाटाचा वापर किसान क्रेडिट कार्ड तयार करण्यासाठी करत आहे. त्यामुळे नवीन कागदपत्र देण्याची गरज नाही.
या अर्जात आपले नाव, बँकेचे खाते नंबर देणे आवश्यक असते. या फार्ममध्ये ही प्रधानमंत्री सुरक्षा बीमा योजना आणि प्रधानमंत्री जीवन ज्योति बीमा योजनाचे पर्याय दिलेले आहेत. आपल्याला फॉर्ममध्ये या दोन्ही योजनांच्या कॉलम पुढे फक्त हो या पर्यायावर क्लिक करायचे असते. त्यानंतर या विमा योजनांचा प्रीमियमची रक्कम आपल्या खात्यामधून ऑटोमॅटिक डेबिट केले जाते. प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजनेचा प्रीमियम हा फक्त बारा रुपये आहे. आणि जीवन ज्योति बीमा योजनाचा प्रीमियम हा वर्षाला ३३० रुपयांचा आहे. याशिवाय जर आपल्या वर अगोदरच कुठल्याही प्रकारचे कर्ज असेल तर त्याची माहिती द्यावी लागते.
हेही वाचा : पीएम किसान योजनेच्या लाभासाठी ३१ ऑक्टोबरपर्यंत आहे संधी
अर्जदाराला आपले स्वतःचे गाव, शेतासंबंधी तपशीलवार माहिती हे नमूद करावी लागते. माहिती दिल्यानंतर अर्जदार तो फॉर्म बँकेत दिल्यानंतर बँक अधिकारी त्या फॉर्मची पोच पावती स्लीप देत असते. काही दिवसानंतर आपले स्वतःचे किसान क्रेडिट कार्ड तयार होते व त्याबद्दलची माहिती आपल्या बँकेला रजिस्टर मोबाईल नंबरवर केली जाते. जर काही कारणास्तव कार्ड बनण्यासाठी वेळ होत असेल तर मिळालेल्या पावतीवरून आपण आपल्या कार्डची स्थिती जाणून घेऊ शकतो.
वार्षिक चार टक्क्याने मिळेल कर्ज
या कार्डद्वारे शेतकरी केवळ वार्षिक ४ टक्के दराने कर्ज घेऊ शकतात. या कार्डची विशेष गोष्ट म्हणजे विना गॅरंटी ही कर्ज आपल्याला मिळू शकते. जवळजवळ सरकार या योजनेद्वारे १ लाख ६० हजार रुपयांचे कर्ज विनागॅरंटी देऊ शकते.
Share your comments