1. इतर बातम्या

किसान क्रेडिट कार्ड द्वारे कसे मिळवावे क्रेडिट,एसबीआय मध्ये केसीसी साठी कसा करावा अर्ज

किसान क्रेडिट कार्ड केंद्र सरकारची अशी एक योजना आहे ज्याद्वारे शेतकऱ्यांना वेळेवर कर्ज उपलब्ध होते.किसान क्रेडिट कार्ड योजना ही 1998 मध्ये सुरु करण्यात आली होती. या योजनेचेउद्दिष्ट आहे की शेतकऱ्यांनाआपत्कालीन परिस्थितीत वेळेवर कर्ज उपलब्ध व्हावे.

पाटील रत्नाकर अशोक
पाटील रत्नाकर अशोक
kisaan credit card

kisaan credit card

किसान क्रेडिट कार्ड केंद्र सरकारची अशी एक योजना आहे ज्याद्वारे शेतकऱ्यांना वेळेवर कर्ज उपलब्ध होते.किसान क्रेडिट कार्ड योजना ही 1998 मध्ये सुरु करण्यात आली होती.  या योजनेचेउद्दिष्ट आहे की शेतकऱ्यांनाआपत्कालीन परिस्थितीत वेळेवर कर्ज उपलब्ध व्हावे.

.याची सुरुवात नॅशनल बँक फोर अग्रिकल्चर अँड डेव्हलपमेंट म्हणजेच नाबार्डने केली होती. किसान क्रेडिट कार्ड ला आता प्रधानमंत्री किसान सम्मान निधि योजनेला जोडण्यात आले आहे. या कार्डद्वारे शेतकऱ्यांना चार टक्के व्याज दराने तीन लाख पर्यंत कर्ज मिळते तसेच पीएम किसान सम्मान निधि योजना याचा लाभार्थ्यांना किसान क्रेडिट कार्ड साठी अर्ज करणे आता सोपे झाले आहे.

पी आय बी च्या रिपोर्टनुसार कोरोना काळामध्ये दोन कोटी पेक्षा जास्त किसान क्रेडिट कार्ड लागू करण्यात आले आहेत. यामध्ये जास्तीत जास्त कार्ड शेतकऱ्यांना देण्यात आले आहेत.किसान क्रेडिट कार्ड योजना शेती,मत्स्यपालन आणि पशुपालन करणाऱ्या शेतकऱ्यां च्या  आवश्यक गरजा पूर्ण करण्यासाठी सुरू करण्यात आली आहे. तसेच या कार्ड द्वारे मिळणाऱ्या कर्जावर यासंदर्भात दोन टक्के ते चार टक्क्यांपर्यंत आहे.

 एसबीआय बँकेद्वारे कार्ड घेण्यासाठी अर्ज कसा करावा?

 शेतकरी भारतीय स्टेट बँकेच्या माध्यमातून किसान क्रेडिट कार्ड  साठी अर्ज करू शकतात. यासाठी एसबीआयने ऑनलाईन सर्व्हिस सुरू केले आहे. एसबीआय यासंबंधी ट्विट केले होते की, योनो कृषी मंच वर केसीसी साठी ची सुविधा देऊन शेतकऱ्यांना सशक्त बनवणे.भारतीय स्टेट बँकेचेशेतकरी ग्राहकएसबीआय चा ब्रांच मध्ये न येता किसान क्रेडिट कार्डसाठी अर्ज करू शकतात. यासाठी शेतकऱ्यांना एसबीआय योनो ॲप डाऊनलोड करावे लागेल.

  किसान क्रेडिट कार्ड साठी ऑनलाइन अर्ज कसा करावा?

  • सगळ्यात अगोदर एसबीआय योनो ॲप डाऊनलोड करावे.
  • https://www.sbiyono.sbi/index.htmlया संकेतस्थळावर लॉग इन करावे.
  • त्यानंतर योनो व्हिजिट एग्रीकल्चर वर जावे.
  • नंतर अकाउंट मध्ये जावे
  • त्यानंतर केसीसी रिव्यू सेक्शन मध्ये जावे.
  • त्यानंतर अप्लाय या बटनावर क्लिक करावे.
English Summary: apply for the kcc card in sbi bank Published on: 09 September 2021, 10:15 IST

Like this article?

Hey! I am पाटील रत्नाकर अशोक. Did you liked this article and have suggestions to improve this article? Mail me your suggestions and feedback.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters