1. इतर बातम्या

डीएपी बफर स्टॉक वाटपास मिळाली परवानगी; स्वाभिमानीच्या प्रयत्नाला यश

स्वाभिमानीचे विनायक सरनाईक व तालुका कृषी अधिकारी यांच्या समक्ष शेतकर्‍यांना खत वाटप.

गोपाल नरसिंग उगले
गोपाल नरसिंग उगले
डीएपी बफर स्टॉक वाटपास मिळाली परवानगी; स्वाभिमानीच्या प्रयत्नाला यश

डीएपी बफर स्टॉक वाटपास मिळाली परवानगी; स्वाभिमानीच्या प्रयत्नाला यश

स्वाभिमानीचे विनायक सरनाईक व तालुका कृषी अधिकारी यांच्या समक्ष शेतकर्‍यांना खत वाटप.चिखली तालुक्यातील काही भागांमधे चांगला पाऊस झाल्याने पेरणीस सुरुवात देखील झाली. परंतु विविध अडचणींमुळे शेतकर्‍यांना रासायनिक खत असुनही मिळत नसल्याची ओरड होत असल्याने शेतकर्‍यांसह स्वाभिमानीचे विनायक सरनाईक यांनी आक्रमक भुमिका घेतल्याने बफर स्टॉक ला परवानगी मिळाली. त्यामुळे तालुक्यातील शेतकर्‍यांना १५ जून रोजी डीएपी खत मिळाल्याने दिलासा मिळाला आहे.तालुक्यातील डीएपी खताचा बफर स्टॉक पडुन असुनही ते मिळत नसल्याने बफर स्टॉक साठ्यास विक्रीची परवानगी देण्यात यावी, मुबालक प्रमाणात रासायनिक खते उपलब्ध करुन देण्यात यावेत अशी मागणी स्वाभिमानीचे विनायक सरनाईक यांनी कृषी विभागाकडे केली होती. दरम्यान चिखली

तालुक्यातील शेतकर्‍यांची ओरड बघता जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी यांनी आढावा बैठक घेतल्यावर दि.१४ जुन रोजी चिखली तालुक्यासाठी अतिरिक्त सुमारे १०० मे.टन डीएपी खत कृषी केंद्रावर आले.परंतु १ दिवस उलटुन सुद्धा ते कंपनीकडुन कृषी विक्रेत्यांच्या पॉस मशीनला आले नसल्याने समोर खत दिसत असतांनाही मिळत नव्हते.शेतकर्‍यांनी याबाबत स्वाभिमानी चे विनायक सरनाईक यांना माहिती दिल्याने सरनाईक यांनी कृषी केंद्र गाठुन माहिती जाणून घेतली. तात्काळ जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी नरेंद्र नाईक यांना याबाबत भ्रमणध्वनीव्दारे माहिती दिली तर दोन दिवसापासुन पॉस मशीनला खत येत नसेल तर खत मिळणार कधी? शेतकर्‍यांनी शेती मशागत सोडून कृषी केंद्रावरच बसुन रहावे काय?

असा सवाल सरनाईक यांनी उपस्थीत करत जोपर्यंत खत मिळणार नाही तो पर्यंत कृषी केंद्रावरील शेतकरी घरी जाणार नाही अशी भुमिका घेतल्याने नरेंद्र नाईक यांनी चिखली येथे येऊन समस्या निकाली काढण्याचे आश्वासन दिले.दरम्यान स्वाभिमानी चे विनायक सरनाईक तालुका कृषी अधिकारी संदिप सोनुने यांच्या उपस्थीतीत बफर स्टॉक चे ४५ मे.टन व इतर रासायनिक खत अशे १०० मे. टन खत शेतकर्‍यांना वाटप करण्यात आले आहे.यावेळी भारत वाघमारे,रविराज टाले,अनिल चव्हाण,तेजराव साळवे,मंगल आंभोरे,गजानन ठेंग,रमेश पवार,पंडीत झगरे,सुदर्शन वाघमारे यांच्यासह मोठ्या संख्येने शेतकरी व पत्रकार उपस्थीत होते.

आढावा बैठकीत शेतकर्‍यांचा राडा.चिखली पंचायत समिती येथे शेतकर्‍यांची हेळसांड होत असल्याने आ.सौ.श्‍वेताताई महाले यांनी कृषी विभाग व कृषी विक्रेते यांची आढावा बैठक आयोजीत केली होती. बैठकीत हजर असलेले जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी श्री नाईक हे दहा मिनटात कृषी केंद्रावर पोहचतो असे सांगुनही न आल्याने स्वाभिमानीचे सरनाईक यांच्यासह शेतकरी बांधवांनी पंचायत समिती कार्यालय गाठुन शेतकरी समस्यांचा पाढा वाचत खताची मागणी लावुन धरल्याने जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी नाईक यांनी डीएपीचा बफर स्टॉक रीलीज करत असल्याचे सांगीतले व कृषी केंद्रावर उपलब्ध असलेला रासायनिक खतांचा साठा विक्री करण्याच्या कृषी अधिकारी यांना सुचना दिल्या.

English Summary: Allowed DAP buffer stock allotment; Success to self-esteem efforts Published on: 16 June 2022, 08:41 IST

Like this article?

Hey! I am गोपाल नरसिंग उगले. Did you liked this article and have suggestions to improve this article? Mail me your suggestions and feedback.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters