1. इतर बातम्या

Aadhar Card : धक्कादायक! आधार कार्ड डुप्लिकेट पण असतं! तुमचं तर नाही ना, असं करा चेक, डिटेल्स वाचा

Aadhar Card : मित्रांनो भारतात आधार कार्ड आणि पॅन कार्ड हे दोन डॉक्युमेंट खूपच महत्त्वाची आहेत. मित्रांनो आपल्या देशात आधार कार्ड शिवाय साध एक सिम देखील खरेदी केला जाऊ शकत नाही. यावरून आधार कार्ड चे महत्व तुमच्या लक्षात आलेच असेल. मित्रांनो आधार कार्डचा वापर सीमकार्ड खरेदी करण्यापासून ते वेगवेगळ्या सरकारी योजनांचा लाभ घेण्यापर्यंत सर्वत्र केला जातो.

अजय वसंत शिंदे
अजय वसंत शिंदे
aadhar card

aadhar card

Aadhar Card : मित्रांनो भारतात आधार कार्ड आणि पॅन कार्ड हे दोन डॉक्युमेंट खूपच महत्त्वाची आहेत. मित्रांनो आपल्या देशात आधार कार्ड शिवाय साध एक सिम देखील खरेदी केला जाऊ शकत नाही. यावरून आधार कार्ड चे महत्व तुमच्या लक्षात आलेच असेल. मित्रांनो आधार कार्डचा वापर सीमकार्ड खरेदी करण्यापासून ते वेगवेगळ्या सरकारी योजनांचा लाभ घेण्यापर्यंत सर्वत्र केला जातो.

आधार कार्ड हे ओळखीचा पुरावा म्हणून देखील उपयोगात आणले जाते. केवळ सरकारी कामातच नाही तर खाजगी कामात देखील आधार कार्ड महत्त्वाचे आहे. आता दिवसेंदिवस आधार कार्डचे महत्व वाढतचं आहे. मात्र या महत्त्वाच्या कागदपत्राचा वापर करून मोठया प्रमाणात ठगी देखील आपल्या देशात केली जात आहे. अलीकडे आपल्या देशात मोठ्या प्रमाणात डुप्लिकेट आधार कार्ड वापरून फसवणूक केली जात आहे.

अशा परिस्थितीत आधार कार्ड धारकांना आपले आधार कार्ड ओरिजिनल आहे की डुबलीकेट असा प्रश्न निश्चितच पडला असेल. या परिस्थितीत आज आपण तुम्ही वापरत असलेले आधार कार्ड ओरिजनल आहे की बनावटी हे कसं चेक करायचं याविषयी बहुमूल्य माहिती घेऊन हजर झालो आहोत. चला तर मग वेळ न दवडता जाणून घेऊया या बहुमूल्य माहिती विषयी सविस्तर.

आधार कार्ड ओरिजनल आहे का डुप्लिकेट कसं करणार चेक

मित्रांनो जर आपणास आपल्या आधार कार्ड ची सत्यता तपासायची असेल तर आपणास सर्वप्रथम आधार कार्डच्या ऑफिशिअल वेबसाईट ला भेट द्यावी लागेल. मित्रांनो आपण सर्वप्रथम आपल्या मोबाईलच्या ब्राउझर मध्ये जाऊन uidai.gov.in या आधार कार्ड च्या ऑफिशियल वेबसाईट ला भेट द्या. वेबसाईटला भेट दिल्यानंतर आपणास वेब साईटच्या मुख्य पेज वर माय आधार (My Aadhar) असा पर्याय दिसेल त्यावर क्लिक करा.

माय आधार या पर्यायावर क्लिक केल्यानंतर आपल्या समोर एक पेज ओपन होईल त्यात आधार कार्डशी निगडीत सर्व प्रकारच्या सेवा बघायला मिळतील. यापैकी व्हेरिफाय आधार नंबर (Verify Aadhar Number) या पर्यायावर क्लिक करा, क्लिक केल्यानंतर आपला बारा अंकी आधार कार्ड क्रमांक तिथे प्रविष्ट करा त्यानंतर खाली कॅप्टचा कोड भरावा लागेल एवढे केल्यानंतर प्रोसीड टू व्हेरिफाय (Proceed To Verify) या बटन वर क्लिक करा.

जर आपण प्रविष्ट केलेली माहिती बरोबर असेल तर एवढ केल्यानंतर आपल्या समोर एक नवीन पेज ओपन होईल. त्या नवीन पेज वरती आधार कार्ड क्रमांकासोबत वय, लिंग आणि राज्य अशी माहिती असेल. येथे आधार कार्ड केव्हा जारी केले होते याविषयी नमूद केलेले असेल. जर कार्ड कधीही जारी केले गेले नसेल. तर यासंदर्भात तेथे काहीच नमूद केलेले नसेल.

English Summary: aadhar card duplicate how to lock aadhar Published on: 26 September 2022, 10:50 IST

Like this article?

Hey! I am अजय वसंत शिंदे. Did you liked this article and have suggestions to improve this article? Mail me your suggestions and feedback.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters