1. इतर बातम्या

कॅलिफोर्नियाचा युवकाचे पुण्याच्या तरुणीशी लग्न आणि ‘पुढे’...

अमेरिकेतील कॅलिफोर्निया या प्रगत राज्यातून आलेला लुकास मार्टिन कोकणच्या निसर्गाच्या एवढ्या प्रेमात पडला आहे की त्याने इथेच स्थायिक होण्याचा निर्णय घेतला आहे.

A young man from California marries a young woman from Pune and 'next' ...

A young man from California marries a young woman from Pune and 'next' ...

अमेरिकेतील कॅलिफोर्निया या प्रगत राज्यातून आलेला लुकास मार्टिन कोकणच्या निसर्गाच्या एवढ्या प्रेमात पडला आहे की त्याने इथेच स्थायिक होण्याचा निर्णय घेतला आहे. पुण्यातील मुक्ता पाटील या मराठी तरुणीशी लग्न करून त्याने सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वाफोली गावात आधुनिक पद्धतीने शेतीही सुरू केली आहे.

कोकणातील नैसर्गिक साधनसंपत्तीला सेंद्रीय शेतीची जोड दिल्यास येथील अर्थकारणात निश्चितच बदल घडेल. येथील निसर्गसौंदर्याचे संवर्धन करून कृषी पर्यटनाच्या माध्यमातून विदेशी पर्यटकांना येथे वळविण्याचा निर्धार लुकस मार्टिन याने ‘सकाळ’शी बोलताना व्यक्त केला आहे. याकामी त्याला त्याची पत्नी मुक्ताही खंबीरपणे साथ देत आहे.

लुकास मार्टिन २०१५  मध्ये वयाच्या २१ व्या वर्षी त्याच्या मित्रांसह भारतात आला. दिल्ली, वाराणसी, हैदराबाद, हम्पी, गोवा. भारतातील विविधता आणि संस्कृती पाहून ते भारावून गेले. गोव्यात फिरत असताना त्यांची पुण्यातील पत्रकार मुक्ता पाटील यांच्याशी भेट झाली. मुक्ता मुंबईत एका ऑनलाइन मासिकासाठी पत्रकार म्हणून काम करत होती. दोघांची चांगली मैत्री झाली. मार्टिनला मुक्ताकडून वैविध्यपूर्ण संस्कृतीची माहिती मिळाली. मैत्रीचे रुपांतर प्रेमात झाल्यानंतर त्यांनी २०७  मध्ये भारतीय संस्कृतीनुसार पुण्यात लग्न केले.

लग्नानंतर दोघेही अमेरिकेला परतले. तो तेथे तीन वर्षे राहिला भारतात स्थायिक होण्याचा निर्णय घेतल्याचे त्याने पत्नीला सांगितले. त्यासाठी या दाम्पत्याने कोकण विशेषत: सिंधुदुर्ग जिल्ह्याची निवड केली. महिनाभर शोध घेतल्यानंतर बांदा शहराजवळील वाफोली या निसर्गरम्य गावात साडेपाच एकर शेतजमीन घेतली. मार्टिन हा उच्च शिक्षित आहे. त्याने बॅचरल ऑफ कम्युनिकेशनमध्ये डिग्री घेतली आहे. तसेच इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगमध्ये देखील डिप्लोमा केला आहे. वाफोली येथे सेंद्रिय पद्धतीने शेती, बागायती करण्याचा त्यांचा मानस आहे.

कोकणी संस्कृती, मालवणी, मराठी बोलीभाषा, येथील राहणीमान आत्मसात करण्याचा त्याचा प्रयत्न आहे. त्याला भविष्यात येथे प्रक्रिया उद्योग उभारायचा आहे. येथे सेंद्रिय शेती करून फळे आणि भाजीपाला पिकवला जाणार. मुक्ता पाटील यांनी परिसरातील तरुणांना रोजगार मिळावा आणि सेंद्रिय शेतीतून प्रगती करून गाव जगाच्या नकाशावर आणण्यासाठी पतीसोबत शेती केली आहे. त्यांच्या धाडसाचे कौतुक होत आहे.

महत्वाच्या बातम्या
खतासंबंधी महत्वाची बातमी! DAP ला मिळाला PROM चा पर्याय, वाचा सविस्तर माहिती

 

English Summary: A young man from California marries a young woman from Pune and 'next' ... Published on: 11 May 2022, 05:28 IST

Like this article?

Hey! I am शैलेश म्हातारदेव डमाळे. Did you liked this article and have suggestions to improve this article? Mail me your suggestions and feedback.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters