1. इतर बातम्या

भाजीपाला रोपवाटिकेसाठी मिळणार दोन लाख रुपयांचे अनुदान

शेतकऱ्यांचे आर्थिक उत्पन्न दुप्पट व्हावे यासाठी केंद्र सरकार आणि राज्य सरकार अनेक योजना राबवत असते. महाराष्ट्र राज्यातील सरकार आता विकेल ते पिकेल अभियान चालवत आहे, जेणेकरुन शेतकऱ्यांना अधिक लाभ मिळेल. दरम्यान कोल्हापूर जिल्ह्यात सरकारने एक नवीन योजना राबवली आहे.

भरत भास्कर जाधव
भरत भास्कर जाधव


शेतकऱ्यांचे आर्थिक उत्पन्न दुप्पट व्हावे यासाठी केंद्र सरकार आणि राज्य सरकार अनेक योजना राबवत असते. महाराष्ट्र राज्यातील सरकार आता विकेल ते पिकेल अभियान चालवत आहे, जेणेकरुन शेतकऱ्यांना अधिक लाभ मिळेल. दरम्यान कोल्हापूर जिल्ह्यात सरकारने एक नवीन योजना राबवली आहे. राष्ट्रीय कृषी विकास योजनेंतर्गत भाजीपाला रोपवाटिका स्थापन करण्यासाठी अनुदान दिले जात आहे. ही योजना पुर्ण राज्यासाठी लागू आहे.

दरम्यान कोल्हापुरात पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर भाजीपाला रोपवाटिका योजनेंतर्गत टोमॅटो, वांगी, कोबी, फुलकोबी, मिरची, कांदा व इतर भाजीपाला पिकांसाठी रोपवाटिका उभारणी करण्यासाठी अनुदान दिले जात आहे. दरम्यान या योजनेसाठी इच्छुक असलेल्या शेतकऱ्यांना याचा लाभ घ्यायचा असेल तर https://mahadbtmahait.gov.in/  या संकेतस्थळावर ऑनलाईन किंवा तालुका कृषी अधिकारी यांच्याकडे सादर करावेत, असे आवाहन  कोल्हापूर जिल्हा अधिक्षक कृषी अधिक्षक ज्ञानदेव वाकुरे यांनी केले आहे.

हेही वाचा : कांदा चाळ उभारणीसाठी राज्य सरकारने मंजूर केला ६० कोटींचा निधी 

कसे असेल अनुदान

रोपवाटिकेसाठी १० गुंठे क्षेत्रावरील ३.२५ मी. उंचीच्या  शेडनेटगृह उभारणीसाठी  येणाऱ्या खर्चाच्या ५० टक्के किंवा जास्तीत जास्त रक्कम १ लाख ९० हजार रुपये मिळेल. प्लॉस्टिक टनेलकरिता येणाऱ्या खर्चाच्या ५० टक्के किंवा जास्तीत जास्त रक्कम ३० हजार रुपये मिळतील.  पॉवर नॅकसॅक स्प्रेअर करिता येणाऱ्या खर्चाच्या ५० टक्के किंवा जास्तीत- जास्त रक्कम  ३ हजार ८०० रुपये मिळतील. तर प्लास्टिक क्रेट्स करिता ५० टक्के किंवा जास्तीत जास्त रक्कम ६ हजार २०० रुपये मिळती, असे एकूण २ लाख ३० हजार रुपयांपर्यंत अनुदान मिळणार आहे. 

दरम्यान या योजनेच्या लाभ घेण्यासाठी  स्वत:च्या मालकीची किमान ०.४० हे (७/१२ वरील नोंदीनुसारय़) जमीन व पाण्याची कायमची सोय असलेले शेतकरी यास पात्र असतील. यासह यात महिला कृषी पदवीधर यांना प्रथम , महिला गट/ महिला शेतकरी यांना द्वितीय तसेच भाजीपाला  उत्पादक अल्प व अत्यल्प  भूधारक शेतकरी / शेतकरी गट यांना तृतीय  या प्रमाणे  प्राधान्य क्रम दिला जाईल.  या योजनेच्या मार्गदर्शक सुचना  या http://www.krishi.maharashtra.gov.in  वेवपोर्टलवर उपलब्ध आहे.

English Summary: A grant of Rs 2 lakh will be given for vegetable nursery Published on: 09 October 2020, 05:47 IST

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters