नवी दिल्ली: 7th pay commission: 18 महिन्यांच्या प्रलंबित महागाई भत्त्याच्या (DA) थकबाकीच्या भरणाबाबतची अपडेट मीडियामध्ये पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. ताज्या अहवालांनुसार, केंद्र सरकारच्या कर्मचार्यांना एकाच वेळी त्यांच्या खात्यात 2 लाख रुपये मिळणार अशी चर्चा सुरु आहे.
जानेवारी २०२० ते जून २०२१ पर्यंतच्या १८ महिन्यांच्या डीए थकबाकी बाबतचा मुद्दा पुढील मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेतला जाऊ शकतो, असे एका वित्तीय वेबसाइटवरील अहवालात म्हटले आहे.
जेसीएमच्या राष्ट्रीय परिषदेचे सचिव (स्टाफ साइड) शिव गोपाल मिश्रा म्हणालेहोते की, परिषदेने आपली मागणी सरकारसमोर ठेवली आहे. परंतु दोन्ही बाजू अद्याप कोणत्याही निष्कर्षावर पोहोचल्या नाहीत. महागाई भत्त्याची थकबाकी एकरकमी सोडवावी, अशी मागणी कामगार संघटना सातत्याने करत आहेत.
7th Pay Commission: कर्मचाऱ्यांना पगाराव्यतिरिक्त 30 हजार मिळणार, 'ही' अट पूर्ण करावी लागणार
मिश्रा यांच्या म्हणण्यानुसार, कार्मिक आणि प्रशिक्षण विभाग (DoPT) आणि वित्त मंत्रालय, खर्च विभाग यांच्या अधिकाऱ्यांसोबत JCM ची संयुक्त बैठक लवकरच होणार आहे. या बैठकीत 18 महिन्यांच्या DA थकबाकीचा एकरकमी तोडगा निघेल अशी अपेक्षा आहे.
ऑक्टोबर 2021 पासून केंद्र सरकारी कर्मचारी आणि पेन्शनधारकांचा महागाई भत्ता आणि महागाई सवलत 17% वरून 31% वर पुनर्संचयित करण्यात आली, परंतु अद्याप थकबाकी जमा करण्यात आलेली नाही. देशात एकूण 48 लाख केंद्रीय कर्मचारी आणि सुमारे 60 लाख पेन्शनधारक आहेत यांना याचा लाभ मिळणार आहे.
7th Pay Commission: 7व्या वेतन आयोगानंतर 8वा वेतन आयोग येणार की नाही? जाणून घ्या अपडेट
Share your comments