1. इतर बातम्या

7th Pay Commission: कर्मचाऱ्यांना पगाराव्यतिरिक्त 30 हजार मिळणार, 'ही' अट पूर्ण करावी लागणार

7th Pay Commission Update: केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या पगारात अनेक प्रकारचे फायदे उपलब्ध आहेत. दरवर्षी त्यांचा पगारही महागाई भत्त्याच्या रूपाने वाढतो. याशिवाय पदोन्नती आणि इतर भत्त्यांचाही लाभ मिळतो. परंतु, या व्यतिरिक्त जर एखाद्या कर्मचाऱ्याने नोकरी करत असताना उच्च पदवी मिळवली तर त्याला वेगळा लाभ मिळतो.

7th Pay Commission Update

7th Pay Commission Update

7th Pay Commission Update: केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या पगारात अनेक प्रकारचे फायदे उपलब्ध आहेत. दरवर्षी त्यांचा पगारही महागाई भत्त्याच्या रूपाने वाढतो. याशिवाय पदोन्नती आणि इतर भत्त्यांचाही लाभ मिळतो. परंतु, या व्यतिरिक्त जर एखाद्या कर्मचाऱ्याने नोकरी करत असताना उच्च पदवी मिळवली तर त्याला वेगळा लाभ मिळतो.

केंद्र सरकारने उच्च पदव्या प्राप्त करणार्‍या कर्मचार्‍यांसाठी प्रोत्साहन रकमेत 5 पट वाढ केली आहे. पीएच.डी.सारखी उच्च पदवी संपादन केलेल्या कर्मचाऱ्यांसाठी प्रोत्साहन रक्कम रु.10,000 वरून रु.30,000 करण्यात आली आहे.

7th Pay Commission: केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या DA मध्ये होणार मोठी वाढ; जाणून घ्या जुलैपासून किती पगार वाढणार?

नवीन उच्च शिक्षणासाठी प्रोत्साहन 5 पट वाढले

कार्मिक मंत्रालयाने 20 वर्षे जुन्या नियमांमध्ये सुधारणा करून कर्मचाऱ्यांना उच्च पदव्या प्राप्त करण्यासाठी प्रोत्साहन रक्कम वाढवली आहे. जुन्या नियमांनुसार, आतापर्यंत, नोकरीदरम्यान उच्च पदव्या प्राप्त करणार्‍या कर्मचार्‍यांना 2000 ते 10,000 रुपये एकरकमी प्रोत्साहन दिले जात होते. परंतु, 2019 पासून ही प्रोत्साहन रक्कम किमान 2000 रुपयांवरून 10,000 रुपये करण्यात आली.

7th Pay Commission: केंद्र सरकार मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत ! कर्मचाऱ्यांच्या पगारात होणार 'इतकी' वाढ

30 हजार रुपये यांना मिळणार

1 वर्ष किंवा त्यापेक्षा कमी कालावधीची पदव्युत्तर पदवी/डिप्लोमा प्राप्त करण्यासाठी 20,000 दिले जातील. त्याचबरोबर पदव्युत्तर पदवी/पदविका 1 वर्षापेक्षा जास्त काळ घेतलेल्या कर्मचाऱ्यांना 25,000 रुपये मिळतील. ज्यांनी पीएचडी किंवा त्याच्या समकक्ष पात्रता संपादन केली आहे त्यांना 30,000 रुपये दिले जातील.

7th Pay Commission: कर्मचाऱ्यांसाठी मोठी बातमी! लवकरच वाढणार पगार, जाणून घ्या का?

English Summary: 7th Pay Commission: Employees will get Rs 30,000 in addition to salary Published on: 07 June 2022, 04:35 IST

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters