1. इतर बातम्या

7th Pay Commission: सरकारी कर्मचाऱ्यांचा पगार अडीच पटीने वाढणार!

नवी दिल्ली : कर्मचाऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. (7th Pay Commission) एकीकडे, लाखो केंद्रीय कर्मचारी आणि पेन्शनधारकांचा महागाई भत्ता (DA) आणि महागाई सुटका (DR) लवकरच वाढण्याची अपेक्षा असताना, त्यांच्या फिटमेंट फॅक्टरबद्दलही (Fitment factor) मोठी बातमी येत आहे.

7th Pay Commission

7th Pay Commission

नवी दिल्ली: कर्मचाऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. (7th Pay Commission) एकीकडे, लाखो केंद्रीय कर्मचारी आणि पेन्शनधारकांचा महागाई भत्ता (DA) आणि महागाई सुटका (DR) लवकरच वाढण्याची अपेक्षा असताना, त्यांच्या फिटमेंट फॅक्टरबद्दलही (Fitment factor) मोठी बातमी येत आहे.

जर सरकारने फिटमेंट फॅक्टर वाढवण्याची घोषणा केली तर त्याचा थेट फायदा केंद्रातील 52 लाखांहून अधिक कर्मचाऱ्यांना (Government employees) होईल आणि त्यांच्या किमान मूळ वेतनात वाढ होईल. त्यामुळे केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या पगारात अडीच पटीने वाढ होणार आहे.

सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, फिटमेंट फॅक्टर 2.57 टक्क्यांवरून 3.68 टक्क्यांपर्यंत वाढवला जाऊ शकतो. 1 सप्टेंबर 2022 पासून त्याची अंमलबजावणी करणे अपेक्षित आहे. यामुळे मूळ वेतनात 8,000 रुपयांची वाढ होणार आहे.

तो 18,000 रुपयांवरून 26,000 रुपयांपर्यंत वाढेल. त्याच्या अंमलबजावणीमुळे, केंद्रीय कर्मचार्‍यांचे किमान वेतन स्तर मॅट्रिक्स 1,26,000 रुपयांपासून सुरू होईल. मात्र, सरकारकडून अद्याप कोणताही दुजोरा मिळालेला नाही.

7th Pay Commission: कर्मचारी होणार लखपती! खात्यात येणार 2.18 लाख रुपये

7 व्या वेतन आयोगाअंतर्गत केंद्रीय कर्मचाऱ्यांचे वेतन फिटमेंट फॅक्टरच्या आधारे ठरवले जाते. सध्या कर्मचाऱ्यांचे फिटमेंट फॅक्टर २.५७ पट आहे. या आधारावर किमान मूळ वेतन 18000 रुपये आणि कमाल मूळ वेतन 56900 रुपये आहे.

शेवटच्या वेळी 2016 मध्ये फिटमेंट फॅक्टर वाढविण्यात आला होता. त्याच वर्षी सातवा वेतन आयोग लागू करण्यात आला. त्यावेळी कर्मचाऱ्यांचे किमान वेतन ६ हजारांवरून थेट १८ हजारांवर गेले होते.

तर सर्वोच्च पातळी 90,000 रुपयांवरून 2.5 लाख रुपये करण्यात आली. आता सरकार या वर्षी पुन्हा केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या पगारात वाढ करू शकते.

EPFO: PF खातेदारांसाठी खुशखबर! व्याजाचे पैसे मोदी सरकार 'या' दिवशी खात्यात पाठवणार...

English Summary: 7th Pay Commission: salary government employees will increase Published on: 23 August 2022, 11:42 IST

Like this article?

Hey! I am पाराजी आबासाहेब शिंदे. Did you liked this article and have suggestions to improve this article? Mail me your suggestions and feedback.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters