1. इतर बातम्या

EPFO: PF खातेदारांसाठी खुशखबर! व्याजाचे पैसे मोदी सरकार 'या' दिवशी खात्यात पाठवणार...

नवी दिल्ली : कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेच्या (EPFO) 7 कोटींहून अधिक खातेदारांसाठी आनंदाची बातमी आहे. पीएफ खातेदारांच्या बँक खात्यात लवकरच व्याजाचे पैसे ट्रान्सफर (Money transfer) केले जाऊ शकतात.

PF account holders

PF account holders

नवी दिल्ली: कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेच्या (EPFO) 7 कोटींहून अधिक खातेदारांसाठी आनंदाची बातमी आहे. पीएफ खातेदारांच्या बँक खात्यात लवकरच व्याजाचे पैसे ट्रान्सफर (Money transfer) केले जाऊ शकतात.

मिळालेल्या माहितीनुसार, पीएफची गणना करण्यात आली आहे. यावेळी पीएफचे व्याज (PF interest) खात्यात ८.१ टक्के दराने येणार असल्याचे सांगण्यात येत आहे. रिपोर्ट्सनुसार, तुमच्या पीएफ खात्यातील व्याजाचे पैसे सप्टेंबरच्या अखेरीस ट्रान्सफर केले जाऊ शकतात.

EPFO ​​ने व्याजाचे पैसे हस्तांतरित करण्याची तारीख जाहीर केलेली नाही, परंतु काही मीडिया रिपोर्ट्स असा दावा करत आहेत की, पुढील महिन्याच्या अखेरीस तुमच्या खात्यात पैसे येऊ शकतात.

हे ही वाचा: EPFO: सरकारकडून PF खातेधारकांना मोफत 7 लाख रुपये; असा घ्या लाभ...

EPFO खात्यातील शिल्लक कशी तपासायची

याआधी तुम्ही तुमच्या पीएफ खात्याची स्थिती सहज तपासू शकता. जर तुम्हाला तुमच्या पीएफ खात्याची शिल्लक तपासायची असेल, तर तुम्ही खाली दिलेल्या स्टेप्स फॉलो करून तुमची शिल्लक सहज तपासू शकता.

तुम्ही PF खात्याशी लिंक असलेल्या रजिस्टर नंबरवरून 011-22901406 वर मिस्ड-कॉल करून हे करू शकता. यानंतर लवकरच तुम्हाला तुमच्या नोंदणीकृत नंबरवर एक संदेश येईल, ज्यामध्ये पीएफ शिल्लक माहिती दिली जाईल.

हे ही वाचा: Best Saving Plans: 'येथे धोका नाही येथे गुंतवणूक करा'; 10 सर्वोत्तम गुंतवणूक योजनांची सविस्तर माहिती...

पीएफ खात्यात जमा केलेली रक्कम एसएमएसद्वारे जाणून घ्या

तुम्ही तुमच्या पीएफ खात्यातील शिल्लक एसएमएसद्वारे देखील तपासू शकता, परंतु यासाठी तुमचा मोबाइल नंबर ईपीएफओमध्ये नोंदणीकृत असावा. तुम्हाला ईपीएफओकडे नोंदणीकृत तुमच्या मोबाइल नंबरवरून 7738299899 वर EPFO ​​UAN LAN पाठवावा लागेल.

LAN म्हणजे तुमची भाषा. इंग्रजीत माहिती हवी असल्यास LAN ऐवजी ENG लिहावे लागेल. त्याचप्रमाणे हिंदीसाठी HIN आणि तमिळसाठी TAM. हिंदीमध्ये माहिती मिळवण्यासाठी EPFOHO UAN HIN लिहून संदेश द्यावा लागेल.

हे ही वाचा: Post Office Scheme: पोस्टाची 'ही' योजना ठरतेय अत्यंत फायदेशीर; 5 वर्षात मिळणार 14 लाख रुपये

English Summary: EPFO Good news PF account holders! Modi government send interest money Published on: 20 August 2022, 01:44 IST

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters