1. इतर बातम्या

7th Pay Commission: केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या DA मध्ये होणार मोठी वाढ; जाणून घ्या जुलैपासून किती पगार वाढणार?

7th Pay Commission Update: केंद्र सरकारच्या लाखो कर्मचारी आणि पेन्शनधारकांसाठी एक आनंदाची बातमी आहे. त्यांना देशातील वाढत्या महागाईपासून दिलासा मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, सरकार १ जुलैपासून महागाई भत्त्यात वाढ करू शकते.

7th Pay Commission

7th Pay Commission

7th Pay Commission Update: केंद्र सरकारच्या लाखो कर्मचारी आणि पेन्शनधारकांसाठी एक आनंदाची बातमी आहे. त्यांना देशातील वाढत्या महागाईपासून दिलासा मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, सरकार १ जुलैपासून महागाई भत्त्यात वाढ करू शकते.

डीए ३४ टक्क्यांवरून ३९ टक्क्यांपर्यंत वाढू शकतो

वास्तविक, मार्च 2022 मध्ये AICPI निर्देशांकात वाढ झाली होती. त्यानंतर सरकार महागाई भत्ता (DA) मध्ये 3 नव्हे तर 5 टक्क्यांनी वाढ करेल अशी अपेक्षा आहे. असे झाल्यास कर्मचाऱ्यांचा डीए ३४ टक्क्यांवरून ३९ टक्के होईल. असे झाल्यास केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या पगारात २७ हजारांहून अधिक वाढ होऊ शकते.

7th Pay Commission: केंद्र सरकार मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत ! कर्मचाऱ्यांच्या पगारात होणार 'इतकी' वाढ

AICPI निर्देशांक आला

या वर्षी जानेवारी आणि फेब्रुवारी महिन्यात AICPI निर्देशांकात घसरण झाली. जानेवारीमध्ये 125.1, फेब्रुवारीमध्ये 125 आणि मार्चमध्ये एक पॉइंट वाढून 126 झाला. एप्रिलच्या आकडेवारीनुसार, AICPI निर्देशांक 127.7 वर आला आहे. यामध्ये 1.35 टक्क्यांनी वाढ झाली आहे. म्हणजेच आता मे आणि जूनची आकडेवारी 127 च्या पुढे गेल्यास 5 टक्क्यांपर्यंत वाढू शकते.

39% डीएमुळे पगार वाढेल

कर्मचार्‍यांचे मूळ वेतन 56,900 रुपये असल्यास, त्यांना 39% डीए मिळाल्यावर 22191 रुपये DA मिळेल. सध्या 34 टक्के दराने 19, 346 रुपये मिळत आहेत. 5% डीए वाढल्याने पगारात 2,845 रुपयांनी वाढ होणार आहे. अशा प्रकारे, सुमारे 34,140 रुपयांची वार्षिक वाढ होईल. यानंतर कर्मचाऱ्यांच्या पगारात मोठी वाढ होणार आहे.

7th Pay Commission: कर्मचाऱ्यांसाठी मोठी बातमी! लवकरच वाढणार पगार, जाणून घ्या का?

50 लाख कर्मचाऱ्यांना फायदा

सरकार वर्षातून दोनदा डीए वाढवते. या वर्षाच्या सुरुवातीला सरकारने डीएमध्ये वाढ केली आहे. आता डीए 5 टक्क्यांनी वाढवण्याच्या निर्णयाचा फायदा 50 लाखांहून अधिक कर्मचारी आणि 65 लाख पेन्शनधारकांना होणार आहे.

7th Pay Commission: 7व्या वेतन आयोगानंतर 8वा वेतन आयोग येणार की नाही? जाणून घ्या अपडेट

English Summary: 7th Pay Commission: Big increase in DA of central employees Published on: 05 June 2022, 09:51 IST

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters