7th Pay Commission: गेल्या काही दिवसांपासून केंद्रीय कर्मचारी (Central employees) महागाई भत्त्याची वाट पाहत आहेत. मात्र अजूनही केंद्र सरकारने (Central Govt) कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात (DA) वाढ केलेली नाही. मात्र आता सणासुदीच्या दिवसांत केंद्रीय कर्मचाऱ्यांना गोड बातमी मिळू शकते. लवकरच कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात वाढ केली जाण्याची घोषणा सरकारकडून होऊ शकते.
सणासुदीच्या हंगामात महागाई भत्ता आणि महागाई सुटण्याच्या प्रतीक्षेत असलेल्या 47 लाखांहून अधिक केंद्रीय कर्मचारी आणि 68 लाख पेन्शनधारकांसाठी (pensioner) एक आनंदाची बातमी आहे.
डीए आणि डीआरच्या (DR) वाढीची त्यांची प्रतीक्षा या महिन्याच्या अखेरीस संपू शकते. नवरात्रीच्या निमित्ताने केंद्र सरकार या लोकांना महागाई भत्त्यात वाढीची भेट देऊ शकते. खरं तर, 28 सप्टेंबर 2022 रोजी पंतप्रधान मोदींच्या अध्यक्षतेखाली मंत्रिमंडळाची बैठक होणार आहे.
या बैठकीत केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात वाढ करण्यास सरकार ग्रीन सिग्नल देऊ शकते. यानंतर, वाढीव महागाई भत्ता जुलै 2022 पासून लागू होईल. त्याच वेळी, या लोकांना ऑक्टोबरमध्ये जुलै आणि ऑगस्ट या दोन महिन्यांची थकबाकी देखील मिळू शकते. यावेळी महागाई भत्ता आणि महागाई सवलतीत ४ टक्क्यांनी वाढ होण्याची शक्यता आहे. असे झाल्यास महागाई भत्ता ३४ वरून ३८ टक्के होईल.
शेतकऱ्यांना १२ वा हफ्ता मिळायला का होतोय उशीर? या दिवशी मिळणार पैसे
महत्त्वाची बाब म्हणजे, महागाई भत्त्यात होणारी वाढ थेट AICPI निर्देशांकाशी संबंधित आहे. फेब्रुवारीनंतर एआयसीपीआय निर्देशांकात सातत्याने उसळी सुरू आहे. AICPI निर्देशांकाचा आकडा जानेवारी 2022 मध्ये 125.1 होता, जो फेब्रुवारीमध्ये 125 वर आला.
तर मार्चमध्ये तो १२६ अंकांवर पोहोचला. यानंतर एप्रिलमध्ये ते 127.7 च्या पातळीवर पोहोचले. मे महिन्यात तो १२९ अंकांवर पोहोचला, तर जूनमध्ये १२९.२ अंकांवर पोहोचला. यामुळे केंद्रीय कर्मचाऱ्यांचा डीए ४ टक्क्यांपर्यंत वाढण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
आनंदाची बातमी! सरकार PF वरील व्याजदर वाढवणार; केंद्रीय मंत्र्यांनी दिली मोठी माहिती
7 व्या वेतन आयोगात किमान मूळ वेतन 18,000 रुपये आणि कॅबिनेट सचिव स्तरावर 56,900 रुपये आहे. 38 टक्क्यांनुसार 18000 रुपयांच्या मूळ पगारावर वार्षिक डीएमध्ये एकूण 6840 रुपयांची वाढ मिळणार आहे. एकूण डीए दरमहा 720 रुपयांनी वाढेल.
56,900 रुपयांच्या कमाल मूळ वेतनाच्या ब्रॅकेटमध्ये, वार्षिक महागाई भत्त्यात एकूण वाढ 27,312 रुपये असेल. या पगाराच्या ब्रॅकेटमध्ये असलेल्यांना 34 टक्क्यांच्या तुलनेत 2276 रुपये अधिक मिळतील.
महत्वाच्या बातम्या:
नवरात्रीच्या शुभमुहूर्तावर सोन्याच्या दरात मोठी घसरण! जाणून घ्या 14 ते 24 कॅरेटची नवीनतम किंमत
यंदा खरीप हंगामातील पिकांच्या उत्पादनात होणार घट! मात्र कापूस, सोयाबीन आणि मका पिकात तेजी...
Share your comments