मागील कोरोना काळापासून राज्यासह देशात सगळ्यात प्रकारच्या नोकरी भरती प्रक्रिया थांबविण्यात आले होते.
एवढेच काय तर यापरिस्थितीमध्ये ज्याच्या नोकऱ्या होत्या त्या हाताच्या चालल्या गेल्याने बऱ्याच लोकांवर बेरोजगारीची कुऱ्हाड कोसळली. याच कालावधीमध्ये याचा फटका पोलिस भरती प्रक्रियेला देखील बसला होता. राज्यामध्ये पोलिस कर्मचाऱ्यांच्या जागा रिक्त असताना देखील भरती करता आली नव्हती. कारण पोलीस दलामध्ये बऱ्याच प्रमाणात जागा रिक्त आहेत.
परंतु आता राज्य सरकार याबाबतीत ऍक्टिव्ह झाले असून पोलीस भरतीचा मार्ग मोकळाहोण्याची चिन्हे आहेत. या पार्श्वभूमीवर आता राज्यातील पोलीस भरतीची तयारी करणारे जे तरुण आहेत अशा तरुणांसाठीएक आनंदाची बातमी समोर आली आहे.ती म्हणजे आता राज्यांमध्ये जवळजवळ सात हजार पदांसाठी पोलीस भरती होणार आहे.
पोलीस कॉन्स्टेबल या पदासाठी एकाच वेळी ही भरती प्रक्रिया पार पाडली जाणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली असून लवकरच ही प्रक्रिया राबवण्यात येणार असल्याचे देखीलसांगण्यात आले आहे. अगोदर पहिल्या टप्प्यात सात हजार पदांची भरती प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर लवकरच एक मोठी भरती प्रक्रिया त्यानंतर पार पडणार आहे.
यामध्ये दहा हजार पदांसाठी ही भरती प्रक्रिया राबवली जाणार आहे. विशेष म्हणजे यावेळी ही भरती प्रक्रिया गृह खाते स्वतः राबवणार आहे. राज्यामध्ये पोलिसांची संख्या कमी असून त्यासंबंधी मंत्रिमंडळासमोर पन्नास हजार पदांची भरती करण्यास संदर्भात माहिती दिली जाईल व त्या संदर्भात निर्णय घेऊ असं दिलीप वळसे-पाटील यांनी म्हटले होते.
त्यामुळे आता पोलीस बळाची गरज लक्षात घेता आता राज्य सरकारने पोलीस भरतीचा निर्णय घेतला आहे.त्यामुळे दिवस रात्र मेहनत करून सैनिक भरती असो की पोलीस भरती यासाठी ग्रामीण भागातील तरुणमोठ्या प्रमाणात कष्ट आणि मेहनत करताना दिसतात
.या सगळ्या भरती प्रक्रिया थांबविण्यात आल्याने कधी भरत्या लागतील याकडे तरुणांचे लक्ष होते. अशा तरुणांसाठी ही दिलासादायक बातमी आहे.
महत्वाच्या बातम्या
नक्की वाचा:21 हजाराला विकला जातोय फक्त एक आंबा, या आंब्याची राज्यात चर्चा…
नक्की वाचा:LPG Price Hike : आता सर्वसामान्यांनी जगायचे कसे..! गॅस सिलेंडर झाला हजाराच्या पार
Share your comments