1. इतर बातम्या

Good News: भारतीय रेल्वेमध्ये नोकरीची संधी,नोकरीच्या शोधात असणाऱ्यांनी करावे संधीचे सोने

कोरोणा कालावधी मधून सगळे व्यवस्था सावरत असताना खाजगी आणि सरकारी क्षेत्रांमध्ये नोकरीच्या विविध संधीउपलब्ध होत आहेत.कारण कोरोना मध्ये बर्याच जणांच्या नोकऱ्या गेल्या. असंख्य लोकांवर बेरोजगारीची कुऱ्हाड कोसळली.

पाटील रत्नाकर अशोक
पाटील रत्नाकर अशोक
recruitment for various post for apprantice in indian railway so take chance

recruitment for various post for apprantice in indian railway so take chance

 कोरोणा कालावधी मधून सगळे व्यवस्था सावरत असताना खाजगी आणि सरकारी क्षेत्रांमध्ये नोकरीच्या विविध संधीउपलब्ध होत आहेत.कारण कोरोना मध्ये बर्‍याच जणांच्या नोकऱ्या गेल्या. असंख्य लोकांवर बेरोजगारीची कुऱ्हाड कोसळली.

 परंतु आता नोकरीच्या संधी चालून येत असल्याने या संधीचे सोने करणे खूप महत्वाचेआहे. आता नोकरीच्या शोधात असणार्‍या तरुणांना साठीभारतीय रेल्वेच्या माध्यमातून एक चांगली बातमी समोर येत आहे.ती म्हणजे भारतीय रेल्वेच्या दक्षिण पूर्व मध्य रेल्वेनागपूर येथे भरती प्रक्रिया सुरू करण्यात आली असून अप्रेंटिस पदासाठी ही भरतीप्रक्रिया राबविली जाणारआहे. या लेखामध्ये आपण या भरती विषयी माहिती घेऊ.

 दक्षिण पूर्व मध्य रेल्वे नागपूर मध्ये भरती

 दक्षिण पूर्व मध्य रेल्वे नागपूर येथे तब्बल 1044 पदांसाठी ही भरती प्रक्रिया सुरू करण्यात आली असूनयामध्ये नोकरीच्या ठिकाणी नागपूर असणार आहे. ज्या उमेदवारांना या पदासाठी अर्ज करायचा असेल अशा इच्छुक उमेदवाराचे वय हे 18 ते 24 वर्ष दरम्यान असणे आवश्यक आहे. या भरती प्रक्रियेची अर्ज करण्याची शेवटची तारीख 13 जून 2022 आहे. या भरती विषयी अधिक माहिती साठी रेल्वेच्या अधिकृत संकेतस्थळाला इच्छुकांनी भेट द्यावी.

 या पदांसाठी होत आहे भरती( अप्रेंटिस)

फिटर,वेल्डर, इलेक्ट्रिशियन, स्टेनोग्राफर, प्लंबर, पेंटर, वायरमन, इलेक्ट्रॉनिक्स मेकॅनिक, मेकॅनिक मशीन टूल मेंटेनन्स, डिझेल मेकॅनिक, ट्रिमर, ड्रायव्हर कम मेकॅनिक, मेकॅनिस्ट, डिजिटल फोटो ग्राफर, टर्नर, डेंटल लॅब टेक्निशिअन,हेल्थ सॅनिटरी इन्स्पेक्टर,गॅस कटर,केबल जॉइंटर, मेसन पदांसाठी ही भरती घेण्यात येणार आहे.

 रिक्त पदे

 जवळजवळ तब्बल 1044 पदांसाठी( अप्रेंटिस) ही भरती प्रक्रिया राबवण्यात येणार आहे.यामध्ये नागपूर विभागासाठी 980 पदे भरली जाणार असूनमोतीबाग वर्कशॉप साठी64 पदे भरली जाणार आहेत.

 या पदासाठी आवश्यक शैक्षणिक पात्रता

 या पदांसाठी अर्ज करणारे उमेदवार हे दहावी परीक्षा उत्तीर्ण किंवा समतुल्य (10+2 परीक्षा प्रणालीअंतर्गत) 50 टक्के गुणासह उत्तीर्ण होणे आवश्यक आहे.

 वयोमर्यादा

 या पदांसाठी अर्ज करणाऱ्या इच्छुक उमेदवारांचे वय कमीत कमी 18 ते 24 वर्ष असणे आवश्यक आहे.

 

 नोकरीचे ठिकाण

 निवड झालेले उमेदवारांसाठी नोकरीच्या ठिकाणी नागपूर असणार आहे.

 अर्ज करण्याची पद्धत

 इच्छुक उमेदवारांना अर्ज करायचा असेल तर ते ऑनलाईन पद्धतीने अर्जकरू शकता.

 अर्ज करण्याची शेवटची तारीख

 या पदांसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 3 जून 2022 आहे.

नक्की वाचा:लग्नावरचा खर्च कमी करा आणि शेतीत गुंतवणूक करा: शरद पवार यांचा मोलाचा सल्ला

नक्की वाचा:राकेश टिकैत यांचे भारतीय किसान युनियनमधून हकालपट्टीचे खरे कारण आले समोर..

नक्की वाचा:किसान क्रेडिट कार्डवरील व्याज सरकार माफ करणार? व्हायरल मेसेजमुळे शेतकऱ्यांची पळापळ

English Summary: recruitment for various post for apprantice in indian railway so take chance Published on: 16 May 2022, 01:00 IST

Like this article?

Hey! I am पाटील रत्नाकर अशोक. Did you liked this article and have suggestions to improve this article? Mail me your suggestions and feedback.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters