1. इतर बातम्या

'या' ५ राशींचा ठरणार वरदान काळ, धनलाभाची मोठी शक्यता; जाणून घ्या तुमचे राशीभविष्य

ऑक्टोबर महिना ज्योतिषीय दृष्टिकोनातून महत्त्वाचा मानला जात आहे. या महिन्यात ५ ग्रहांचे स्थानबदल, चलनबदल होणार आहेत. काही ग्रह एका राशीतून दुसऱ्या राशीत जाणार असून, नवग्रहांचा न्यायाधीश मानला गेलेला शनीदेव आपलेच स्वामित्व असलेल्या मकर राशीत मार्गी होणार आहे.

रूपाली उत्तम कदम
रूपाली उत्तम कदम
horoscope

horoscope

ऑक्टोबर महिना ज्योतिषीय दृष्टिकोनातून महत्त्वाचा मानला जात आहे. या महिन्यात ५ ग्रहांचे स्थानबदल, चलनबदल होणार आहेत. काही ग्रह एका राशीतून दुसऱ्या राशीत जाणार असून, नवग्रहांचा न्यायाधीश मानला गेलेला शनीदेव आपलेच स्वामित्व असलेल्या मकर राशीत मार्गी होणार आहे.

विशेष म्हणजे २३ ऑक्टोबरला धनत्रयोदशी आहे. त्यामुळे शनीचे मार्गी होणारे काही राशींना अतिशय शुभ मानले गेले असून, ऐन दिवाळीत काही राशींना हा काळ अपार यश, धनलाभाचा ठरू शकतो, असे सांगितले जात आहे. त्या लकी राशी कोणत्या? जाणून घेऊया...

मेष

मेष राशीच्या लोकांसाठी शनीचे मार्गी होणे खूप खास मानले जाते. शनीच्या शुभ प्रभावामुळे धनत्रयोदशीला धनलाभ होण्याची शक्यता आहे. व्यवसायात प्रगती होऊ शकेल. धातूचा व्यवसाय करणाऱ्यांसाठी हा काळ चांगल्या कमाईचा ठरू शकतो. जे लोक इलेक्ट्रिकल उपकरणे आणि वाहनांच्या व्यवसायात आहेत त्यांच्यासाठीही हा काळ चांगला ठरू शकतो. कपड्यांच्या व्यवसायातही फायदा होऊ शकेल.

सरकारकडून तेलबियांच्या लागवडीला प्रोत्साहन; 8 लाख बियाणांचे मिनीकिट्सचे शेतकऱ्यांना मोफत वाटप

सिंह

सिंह राशीच्या व्यक्तींवर शनीचा ढिय्या प्रभाव असला, तरी शनीचे मार्गी होणे फायदेशीर ठरू शकते. तुम्हाला पैशाच्या बाबतीत फायदा होईल. तुमची रखडलेली सर्व कामे पूर्ण होऊ शकतील. उत्पन्नात वाढ होऊ शकेल. मात्र, दिवाळी असल्याने तुमच्या हातून होणारा खर्चही जास्त असेल. तुम्हाला करिअरच्या दृष्टीने सुवर्ण संधी मिळू शकतात. चांगल्या नोकरीची ऑफर मिळू शकते.

तूळ

तूळ राशीच्या व्यक्तींना शनी मार्गी होणे लाभदायक ठरू शकेल. दिवाळीच्या कालावधीत विशेष लाभ होऊ शकतो. उत्पन्नात अचानक वाढ होऊ शकते.तुम्हाला अचानक कुठून तरी पैसे मिळू शकतात. धनत्रयोदशीला सोने खरेदी करणे खूप शुभ मानले जाते. मुलांच्या प्रगतीचे नवे मार्ग खुले झाल्याने कौटुंबिक वातावरण आनंद द्विगुणित करणारे ठरू शकेल.

पोस्ट ऑफिसच्या ग्राहकांसाठी आनंदाची बातमी; दरवर्षी मिळणार 1 लाख 11 हजार रुपये

वृश्चिक

वृश्चिक राशीच्या व्यक्तींना शनी मार्गी होणे भाग्यकारक ठरू शकेल. या काळात वाहन सुख मिळू शकते. त्याचबरोबर जमीन आणि मालमत्तेच्या बाबतीत तुम्हाला अपेक्षेपेक्षा जास्त फायदा होऊ शकेल. तुमचे उत्पन्न वाढेल आणि तुम्हाला आनंद मिळेल. भावंडांकडून सर्व प्रकारचे सहकार्य मिळेल. या काळात प्रवासही फायदेशीर ठरू शकतो. व्यवसायात कठोर परिश्रम करावे लागतील, परंतु योजना यशस्वी झाल्यास मेहनतीचे फायदे मिळतील.

मीन

मीन राशीच्या व्यक्तींना शनी मार्गी होणे तुम्हाला तुमच्या करिअरमध्ये अनेक सुवर्ण संधी मिळू शकतात. तुम्ही तीर्थयात्रेला जाण्याची योजना आखू शकता. ज्या लोकांना व्यवसायात आतापर्यंत नुकसान होत होते, अशा लोकांसाठी शनीच्या शुभ प्रभावाने चांगला काळ सुरू होणार आहे. तुम्हाला तणावातून आराम मिळेल आणि घरातील समस्याही संपतील. नोकरी आणि व्यवसायात यश मिळेल.

महत्वाच्या बातम्या 
लाल कंधारी गाय शेतकऱ्यांच्या उत्पन्नाचा आधार बनेल; दूध उत्पादनातून मिळतो लाखोंचा नफा
शेतकरी मित्रांनो तंत्रशुध्द पध्दतीने ज्वारीची लागवड करा; मिळेल अधिक उत्पन्न
आता CIBIL स्कोअरशिवाय कर्ज मिळणार; एलआयसीची 'ही' योजना शेतकऱ्यांना देतेय मोठी संधी

English Summary: 5 zodiac signs blessed period great possibility financial gain horoscope Published on: 23 September 2022, 05:43 IST

Like this article?

Hey! I am रूपाली उत्तम कदम. Did you liked this article and have suggestions to improve this article? Mail me your suggestions and feedback.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters