जागतिक जलसंपत्ती दिनाच्या च्या निमित्ताने; संपूर्ण विश्वातील सर्व मानवांना आणि त्यातही प्रामुख्याने सर्व भारतवासियांना 'थेंबे-थेंबे पाणी वाचवा आणि संपूर्ण सजीव सृष्टी वाचवा!' ही जबाबदारी पूर्ण करण्यासाठी मनःपुर्वक हार्दिक शुभेच्छांसह, अत्यंत विनम्र आवाहन आहे की;
आपण सर्व मानवांनी मिळून 'पाणी अडवा; पाणी जिरवा; पाणी वाचवा' या त्रिसूत्री ची न चुकता अत्यंत काटेकोरपणे तंतोतंत परिपूर्ण अंमलबजावणी करण्यासाठी प्रतिज्ञाबध्द होऊन आपल्या पृथ्वी मातेला संपूर्णतः सुजलाम सुफलाम, निसर्ग-संपन्न बनवूया !
जल प्रतिज्ञा-
आम्ही या विश्वातील सर्व मानव प्रतिज्ञा करतो की, पाणी हे आमचे सर्वांचे तसेच संपूर्ण सजीव सृष्टी चे जीवन असून,त्या पाण्याच्या प्रत्येक थेंबाचा वापर आम्ही निव्वळ गरजेपुरता व काटकसरीने करू. तसेच कोणत्याही परिस्थितीत आम्ही पाण्याचा कोणत्याही स्वरूपाचा अपव्यय व गैरवापर करणार नाही अगर होऊ देणार नाही.
नैसर्गिक जल-प्रवाह, जल-स्रोत; जलाशय, कालवे व पाणी पुरवठ्याच्या तत्सम पायाभूत
सुविधांचे आम्ही सर्व मिळून न चुकता काळजीपूर्वक जतन संरक्षण करू. पाण्याविषयीचे कायदे व सर्व नियमांचे आम्ही न चुकता अतिशय काटेकोरपणे पालन करू. पाण्याचे संवर्धन व जतन करण्याचा आम्ही अतिशय कसोशीने प्रयत्न करू.
पाण्याची स्वच्छता व पावित्र्य जपणे ही आमची सामाजिक बांधिलकी मानून त्याचे सदैव काटेकोर पालन न चुकता करण्याची आम्ही सर्व मानव प्रतिज्ञा करीत आहोत.
संपूर्ण सजीव सृष्टी वाचवा!' ही जबाबदारी पूर्ण करण्यासाठी मनःपुर्वक हार्दिक शुभेच्छांसह, अत्यंत विनम्र आवाहन आहे की;
आपण सर्व मानवांनी मिळून 'पाणी अडवा; पाणी जिरवा; पाणी वाचवा' या त्रिसूत्री ची न चुकता अत्यंत काटेकोरपणे तंतोतंत परिपूर्ण अंमलबजावणी करण्यासाठी प्रतिज्ञाबध्द होऊयात
जल संजीवन हेच आमचे जीवन सर्वस्व आहे !
जय हिंद ! जय महाराष्ट्र ! जय विश्वबंधुत्व !
पाणी बचत म्हणजे पाणी निर्मिर्ती !
धनंजय रघुनाथ धोपावकर
वरिष्ठ पोलीस निरीक्षक, ठाणे-महाराष्ट्र
संकलन : मिलिंद पंडित, कल्याण
Share your comments