शेअर बाजार विचार केला तर लोक आधी नुकसानीचा विचार करतात. पण फायदा झाला तर अमाप पैसा येतो. शेअर बाजारातील (Share Market) गुंतवणूक ही अत्यंत जोखमीची असते, हे लक्षात धरून आपण अनेक कंपन्यांमध्ये गुंतवणूक करू शकतो.भारत डिजिटल होण्यासोबतच मार्केटमध्ये नव्या कंपन्यांचे हळूहळू आयपीओ लॉंच झाले. जोखीम घेऊन शेअर बाजारात गुंतवणूक करणारे देखील वाढले आहेत. बहुतांश कंपन्यांचे शेअर्स चांगला परतावा देत आहेत, म्हणून गुंतवणूकदारांचा फायदा होत आहे. यंदा गुंतवणूकदारांना आठवड्यातही एका नॉन बँकिंग फायनान्स कंपनीने
(Non-Banking Finance Company) जबरदस्त रिटर्न्स दिले असल्याचं कळतंय.माहीतीनुसार, अरमान फायनॅन्शियल सर्व्हिसेस लिमिटेडच्या (Armaan Financial Services Limited) एक शेअरची किंमत 48 पैशांवरून 1300 रुपयांपर्यंत वाढली आहे. हे शक्य झालं मागील फक्त काही वर्षांतच. जर तुमच्याकडेही अरमान फायनान्शियल सर्व्हिसेस लिमिटेडच्या शेअर्स असतील तर हे शेअर्सनी तुमच्यासह अनेक गुंतवणूकदारांना 200000 टक्क्यांहून जास्त रिटर्न दिला आहे.अरमान फायनॅन्शियल सर्व्हिसेसची मार्केट कॅप 1147 कोटी रुपये आहे.
अरमान फायनॅन्शियल सर्व्हिसेस लिमिटेडच्या शेअर्सची मागील 52 आठवड्यांमध्ये हाय लेव्हल म्हणजेच जास्तीत जास्त 1387.75 रुपये या पातळीवर पोहोचला होता. तर कंपनीच्या शेअर्सची 52 आठवड्यांतील लो लेव्हल 603.95 रुपये आहे, अशी माहीती आहे.देशातील अनेक NBFC कंपन्यांपैकी एक अशी कंपनी अरमान फायनॅन्शियल सर्व्हिसेस लिमिटेडचे शेअर्स 11 मार्च 2004 रोजी बॉम्बे स्टॉक एक्सचेंजवर (BSE) 48 पैशांच्या पातळीवर होते ते शेअर्स जर तुम्ही होल्ड करून ठेवले असते तर जुलै 2022 रोजी बीएसईवर या कंपनीचा शेअर 1350.75 रुपयांच्या पातळीवर बंद झाला.
जर एखाद्या गुंतवणुकदाराने 11 मार्च 2004 रोजी अरमान फायनॅन्शिअल सर्व्हिसेसच्या शेअर्समध्ये 1 लाख रुपये गुंतवले असते आणि ती गुंतवणूक आजपर्यंत ठेवली असती, तर आज त्याचे एक लाख रुपये तब्बल 28.14 कोटी रुपये झाले असते. जर एखाद्या गुंतवणूकदाराने 10 वर्षांपूर्वी कंपनीच्या शेअर्समध्ये 1 लाख रुपये गुंतवले असते आणि आपली गुंतवणूक तशीच ठेवली असती, तर आता ही रक्कम 52.55 लाख रुपये झाली असती. अरमान फायनॅन्शिअलच्या शेअर्सनी मागील एका महिन्यामध्ये गुंतवणूकदारांना 36% पेक्षा जास्त परतावा दिला आहे, तर कंपनीच्या शेअर्सनी मागील 6 महिन्यांमध्ये 71% रिटर्न दिले आहेत.
Share your comments