1. बातम्या

हृदय पिळवटून टाकणारी घटना! युवा शेतकऱ्याने २३ व्या वर्षी 'या' कारणामुळे संपवले जीवन

शेती हेच शेतकऱ्यांचे जगण्याचे साधन आहे. मात्र शेती व्यवसाय करताना शेतकरी बंधूना अनेक अडचणींचा डोंगर पार करावा लागतो. राज्यात शेतकऱ्यांसमोर अनेक आव्हाने आहेत.

ऋतुजा संतोष शिंदे
ऋतुजा संतोष शिंदे
२३ व्या वर्षी संपवले जीवन

२३ व्या वर्षी संपवले जीवन

शेती हेच शेतकऱ्यांचे जगण्याचे साधन आहे. मात्र शेती व्यवसाय करताना शेतकरी बंधूना अनेक अडचणींचा डोंगर पार करावा लागतो. राज्यात शेतकऱ्यांसमोर अनेक आव्हाने आहेत. मात्र शेतकऱ्यांचे एक ना अनेक प्रश्न दुर्लक्षित केले जात आहेत. अवकाळी पावसाने तर सर्वसामान्य माणसांबरोबर शेतकऱ्यांचे अमाप नुकसान केले आहे. यात शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. त्यातून शेतकऱ्यांना बराच आर्थिक फटका बसला आहे.

अवकाळी पाऊस, पाण्याच्या पाठपुरवठ्याची कमतरता,पीकाला भाव नाही, या ना त्या कारणाने पीक उद्ध्वस्त होत असल्याने शेतकऱ्यांचं आत्महत्यांचं सत्र चालूच आहे. अशीच एक महाराष्ट्राला हादरून सोडणारी घटना घडली आहे. अवघ्या २३व्या वर्षीच तरुण शेतकऱ्याने टोकाचे पाऊल उचलले आहे. परभणी येथील जिंतूर तालुक्यातील बोरी इथे ही घटना घडली आहे. आर्थिक समस्येतून बाहेर पडण्यासाठी श्रीकांत अनिल चौधरी या तरुण शेतकऱ्याने लिंबाच्या झाडाला गळफास लावून आत्महत्या केली.

श्रीकांत यांच्यावर बँकेचे १ लाख ४० हजार रुपयांचे कर्ज होते. मात्र सतत येणाऱ्या नापिकीने हे कर्ज फेडायचे तरी कसे ? या प्रश्नाने अखेर त्यांचा जीवच घेतला. सध्या पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यू झाल्याची नोंद करण्यात आली आहे. श्रीकांत अनिल चौधरी हे जिंतूर तालुक्यातील बोरी येथे शेती व्यवसाय करत होते. मात्र अमाप मेहनत घेऊनही त्यांना हवा तसा नफा मिळत नव्हता.

बाप रे! बैलाने तोंडात डबा पकडला आणि नंतर आख्ये शहर घेतले डोक्यावर, जाणून घ्या 'अजब गजब' प्रकार...

सततची नापिकी आणि अतिवृष्टीमुळे ते हतबल झाले होते. यातून त्यांचे खच्चीकरण होऊ लागले. श्रीकांत यांच्यावर बोरी गावातील स्टेट बँक ऑफ इंडिया या शाखेचे १ लाख ४० हजार रुपयांचे कर्ज झाले होते. मात्र हे कर्ज कसे फेडावे या चिंतेने त्यांनी शेतातील लिंबाच्या झाडाला गळफास लावून आत्महत्या केली. देवाशीष चौधरी यांच्या फिर्यादीवरून बोरी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे. या तरुणाचे शवविच्छेदन तेथील ग्रामीण रुग्णालयात करण्यात आले आहे. या घटनेनंतर मात्र गावात हळहळ व्यक्त केली जात आहे.

महत्वाच्या बातम्या:
आनंदाची बातमी: आता उच्च तापमानातही मिळणार दर्जेदार उत्पादन; गव्हाची नवीन जात विकसित
शेतकऱ्यांनो 'शेळी आणि कोंबडी'च्या आहाराची अशी घ्या काळजी; होईल बक्कळ नफा

English Summary: Young farmer dies at 23 Published on: 13 June 2022, 06:05 IST

Like this article?

Hey! I am ऋतुजा संतोष शिंदे. Did you liked this article and have suggestions to improve this article? Mail me your suggestions and feedback.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters