आजच्या युगात पैश्यापेक्षा निरोगी आरोग्याला जास्त किंमत आहे ते तर तुम्हाला कोरोना च्या काळात समजलेच असेल. हजारो लाखो रुपये घालवून सुद्धा काही उपयोग होत नव्हता. आजच्या काळात निरोगी आरोग्य हाच खरा दागिना बनला आहे. निरोगी आरोग्य आणि तंदुरुस्त शरीरासाठी पोषक आहार, व्यायाम खूप गरजेचा असतो. तसेच पोषक आहरामधून आपल्याला मोठ्या प्रमाणात जीवनसत्व मिळाली पाहिजेत याचे सुद्धा ध्यान केले पाहिजे.
मुगामध्ये मोठ्या प्रमाणात जीवनसत्वे तसेच वेगवेगळी व्हिटॅमिन आढळतात. मुगा मद्ये व्हिटॅमिन ए, बी, सी आणि ई चं प्रमाण अधिक असतं. शिवाय पोटॅशिअम, आयर्न, कॅल्शिअमही मूगात आढळतात. याचे सेवन केल्यास शरीरात कॅलरीज मोठ्या प्रमाणात वाढत नाहीत. जर मोड आलेल्या मुगाचे सेवन केल्यास शरीरात केवळ 30 कॅलरी आणि 1 ग्रॅम फॅट पोहोचतात. हे आपल्या शरीरासाठी खूप आवश्यक आणि फायदेशीर असतात.
रक्तातील साखर कमी होण्यास मदत होते:-
साखरेचा त्रास असणाऱ्या व्यक्तींनी दररोज मोड आलेल्या मुगाचे सेवन करणे आरोग्यासाठी फायदेशीर असते.मुगाचे सेवन केल्यामुळे शरीरात इन्सुलीन लेव्हल वाढण्यात मदत मिळते. यासोबतच रक्तातील साखर सुद्धा नियंत्रणात राहते.
रोगपरतिकारशक्ती वाढण्यास मदत होते:-
दररोज मोड आलेल्या मुगाचे सेवन केल्यामुळे शरीरातील रोग प्रतिकारक शक्ती वाढण्यास मदत होते शिवाय वेगवेगळ्या आजारापासून आपला बचाव होत असतो.
त्वचेवर येतो ग्लो:-
मूगामध्ये सायट्रोजन असतात जे शरीरात कोलेजन आणि एलास्टिन कायम ठेवतात. याने चेहऱ्यावर वय दिसून येत नाही. त्यामुळे चेहऱ्यावर ग्लो येऊन आपला चेहरा चमकदार बनतो.
हेही वाचा:-राज्यात लम्पी च्या प्रादुर्भावाने 22 जनावरांचा मृत्यू, नेमकी उपाययोजना काय?
पोटदुखी ला कायमचा रामराम:-
मोड आलेल्या मूगात फायबरचं प्रमाण अधिक असतं. याने पोटाने विकार, पोटदुखणे या समस्या होत नाहीत. त्यामुळे दैनंदिन आहारात मुगाचे सेवन करावे.
पचनक्रिया सुधारते:-
मोड अलेल्या मूगामध्ये शरीरातील टॉक्सिक बाहेर काढण्यास मदत होते. त्यामुळे मोड आलेल्या मुगाचे सेवन केल्यामुळे शरीरातील विषारी पदार्थ-द्रव्य बाहेर टाकले जातात. यासोबतच पचनक्रिया नेहमी चांगली राहते. तसेच पोटासंबंधी आजारही कमी होतात.
Share your comments