1. बातम्या

फक्त काश्मीर मध्येच नाही तर तुम्ही इतर ठिकाणी सुद्धा सफरचंदची शेती करू शकता

जर तुमच्या मध्ये ईच्छा शक्ती असेल किंवा त्या वाटेने जर तुम्ही आपले ध्येय घेऊन जात असाल तर कोणतीही गोष्ट तुमच्यासाठी अशक्य नाही आणि हे प्रत्यक्ष करून दाखवलंय इंदापूर तालुक्यातील सणसर गावातील प्रभाकर खरात या प्रगतशील शेतकऱ्याने.प्रभाकर खरात या प्रगतशील शेतकऱ्याने त्याच्या शेतीमध्ये सफरचंद या फळ पिकाची शेती करून त्याच्या शेतीमधून चांगल्या प्रकारे आणि मोठ्या प्रमाणात उत्पादन घेतले आहे.

किरण भेकणे
किरण भेकणे
apple

apple

जर तुमच्या मध्ये ईच्छा शक्ती असेल किंवा त्या वाटेने जर तुम्ही आपले ध्येय घेऊन जात असाल तर कोणतीही गोष्ट तुमच्यासाठी अशक्य नाही आणि हे प्रत्यक्ष करून दाखवलंय इंदापूर तालुक्यातील सणसर गावातील प्रभाकर खरात या प्रगतशील शेतकऱ्याने.प्रभाकर खरात या प्रगतशील  शेतकऱ्याने  त्याच्या  शेतीमध्ये सफरचंद(apple) या फळ पिकाची शेती करून त्याच्या शेतीमधून चांगल्या प्रकारे आणि मोठ्या प्रमाणात उत्पादन घेतले आहे.

फक्त १५ ते १९ महिन्यात त्यांच्या शेतीमधून सफरचंदाचे पाहिले उत्पादन:

जम्मू काश्मीर व्यतिरिक्त इतर ठिकाणी सुद्धा आपण सफरचंद फळ पिकाची  शेती  करू शकतो  याचे उत्तम उदाहरण आणि एक  शेतकऱ्यांसमोर  आदर्श ठेवणारे कुटुंब म्हणजे प्रभाकर खरात यांचे कुटुंब.प्रभाकर खरात हे पेशाने पाहायला गेले तर एक शिक्षक होते मात्र जेव्हा खरात सेवा  निवृत्त झाले  तेव्हापासून त्यांन शेती कडे आपले लक्ष वेधले. शेती करताना एक वेगळा प्रयोग काहीतरी केला पाहिजे म्हणून त्यांनी त्यांच्या शेतीमध्ये सफरचंद या फळ पिकाची लागवड करायचे योजले.सफरचंद या रोपांची लागवड त्यांनी केली आणि फक्त १५ ते १९ महिन्यात त्यांच्या शेतीमधून सफरचंदाचे पाहिले उत्पादन यशस्वी रित्या निघाले आणि यामुळेच त्यांच्या परिसरात सफरचंद ची शेती अगदी चर्चेत आलेली आहे.

हेही वाचा:फक्त ५० हजारात सुरू करा शेती आणि वर्षाला लाखो रुपये कमवा

एकूण 20 ते 25 प्रकारची वेगवेगळी उत्पादने यशस्वीपणे घेतली:-

प्रभाकर खरात या प्रगतशील शेतकऱ्याचा  धाकटा  मुलगा  त्यांना  त्यांच्या  शेतीमध्ये  मदत  करतो.  त्यांच्या १० गुंठा सफरचंद शेतीमधील  चांगल्या  प्रकारे यशस्वीरित्या उत्पादन काढल्या नंतर खायचा बदाम, सिडलेस लिंबू तसेच मसालेदार पदार्थ धरून एकूण २० ते २५ प्रकारची वेगवेगळ्या पिकांची त्यांनी उत्पादने घेतली आणि ती यशस्वीपणे पार पाडली.जी नेहमी ची पिके आहेत जसे की ऊस व इतर पिकांपेक्षा सफरचंद, सिडलेस लिंबू, खायचा बदाम या पिकांधून खरात याना खूप नफा मिळतो अशी माहिती कालिदास खरात यांनी दिली.

योग्य प्रकारे नियोजन करून चांगल्या प्रकारे नफा...

तुम्ही जर योग्य नियोजन केले तसेच चांगल्या प्रकारे व्यवस्थापन केले तर शेतीमधून कसा नफा होतो याचे उत्तम उदाहरण म्हणजे खरात कुटुंब. सफरचंद तसेच अजून पिकाचे त्यांनी यशस्वीरित्या प्रयोग करून उत्पादन घेतल्यामुळे तेथील  शेतकऱ्यांना सुध्दा  खरात  मार्गदर्शन करत  आहेत. जम्मू काश्मीर मध्ये  फक्त सफरचंद ची शेती नाही तर आपण इतर ठिकाणी सुद्धा शेती करू शकतो अस प्रभाकर खरात गुरुजी यांनी दाखवले आहे.  

English Summary: You can cultivate apples not only in Kashmir but also in other places Published on: 18 August 2021, 07:01 IST

Like this article?

Hey! I am किरण भेकणे. Did you liked this article and have suggestions to improve this article? Mail me your suggestions and feedback.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters