सफरचंद व्हिनेगरचे आरोग्यदायी फायदे; वजन कमी करण्यास करते मदत

08 October 2020 01:13 PM By: भरत भास्कर जाधव


आरोग्याच्या अनेक समस्या दूर करण्यासाठी  शरीरात उच्च युरिक अॅसिड कमी करणे किंवा वजन कमी करण्यासाठी सफरचंद व्हिनेगर खूप फायदेशीर आहे. सफरचंद व्हिनेगर त्वचेसाठी, उच्च रक्त असलेल्या रुग्णांसाठी तसेच मेटाबॉलिज्म वाढविण्यात खूप फायदेशीर आहे.  सफरचंद सायडर व्हिनेगर मध्ये  एसिटिक अॅसिड व्यतिरिक्त  पाणी आणि इतर प्रमाणात आम्ल, जीवनसत्वे आणि खनिजे असतात. सफरचंद व्हिनेगर वजन कमी करण्यास देखील मदत करु शकते. या व्हिनेगरमुळे उच्च रक्तदाब देखील नियंत्रणात असतो.

काय आहेत सफरचंद व्हिनेगरचे फायदे

सफरचंद साइडर व्हिनेगर यकृत निरोगी ठेवण्यासाठी  खूप फायदेशीर मानले जाते. यकृत  आपल्या शरीरात अनेक कार्य करत असते. सफरचंदाचे व्हिनेगर यकृतासाठी  निरोगी आहार म्हणून कार्य करते.  सफरचंद व्हिनेगरच दररोज सेवन करू नये, अती सेवन हानिकारक देखील असू शकते.

प्रतिकारकशक्ती मजबूत करते - 

सफरचंद सायडर  व्हिनेगरमध्ये  व्हिटॅमिन सी असल्याने रोगप्रतिकारशक्ती  वाढविण्यासाठी खूप फायदेशीर मानली जाते. 

मधुमेहाच्या रुग्णांसाठी आहे फायदेशीर

सफरचंद व्हिनेगर रक्तातील  साखरेची पातळी नियंत्रित करण्यास मदत करते. सफरचंद व्हिनेगर सेवन केल्याने  मधुमेह, कर्करोग, हृदयाशी संबंधित आजारही टाळता येतात. बऱ्याच  संशोधनात असेही समोर आले आहे की सफरचंद व्हिनेगर हृदय आणि मधुमेहाच्या रुग्णांसाठी फायदेशीर आहे.

कोलेस्टेरॉल करते कमी

कोलेस्टेरॉल कमी करण्यास प्रभावी ठरु शकतो. सफरचंद  व्हिनेगरचे योग्य प्रमाणात  सेवन केलेस्ट्रॉलपासून संरक्षण करण्यासाठी  उपयुक्त मानले जाते. त्यामध्ये  उपस्थित एसिटिक अॅसिड शरीराची खराब कोलेस्ट्रॉलची पातळी कमी करण्यास मदत करते. हृदयाशी संबंधित आजारांपासून संरक्षण करू शकते.

उच्च रक्तदाब कमी करेल

सफरचंद व्हिनेगरचा वापर उच्च रक्तदाब नियंत्रणात राहण्यास मदत होते. उच्च रक्तदाबासाठी  फायदेशीर मानला जातो. शरीरातील पीएच पातळी सामान्य ठेवण्यास मदत करु शकते.

health benefits apple cider vinegar apple cider vinegar benefits apple benefits सफरचंद व्हिनेगर आरोग्यदायी सफरचंद व्हिनेगरचे फायदे सफरचंद apple
English Summary: The health benefits of apple cider vinegar, helps to lose weight

कृषी पत्रकारितेसाठी आपला पाठिंबा दर्शवा

प्रिय वाचक, आमच्यात सामील झाल्याबद्दल धन्यवाद. आपल्यासारखे वाचक आमच्यासाठी कृषी पत्रकारितेसाठी प्रेरणा आहेत. कृषी पत्रकारितेला अधिक बळकट करण्यासाठी आणि ग्रामीण भारतातील कानाकोप in्यात शेतकरी आणि लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी आम्हाला तुमचे समर्थन किंवा सहकार्य आवश्यक आहे. आपले प्रत्येक सहकार्य आमच्या भविष्यासाठी मोलाचे आहे.

आपण आम्हाला समर्थन करणे आवश्यक आहे (Contribute Now)

Share your comments

Krishi Jagran Marathi Magazine Subscription ऑनलाईन अंक मागणीसाठी

शासन निर्णय

CopyRight - 2021 Krishi Jagran Media Group. All Rights Reserved.