1. बातम्या

हो बर माती वाचली तरच तुम्ही वाचाल वाचा म्हणजे समजेल

तुमच्या मातीची हाक कधी ऐकलीत का? तुम्ही तर तिला भूमाता, काळी आई, अशा कित्येक नावाने हाक मारता ना?

गोपाल नरसिंग उगले
गोपाल नरसिंग उगले
हो बर माती वाचली तरच तुम्ही वाचाल वाचा म्हणजे समजेल

हो बर माती वाचली तरच तुम्ही वाचाल वाचा म्हणजे समजेल

ती साद घालते तुम्हाला अरे वाचवा मला म्हणून. अजून तुम्हाला तिचा आवाज ऐकू आला नाही वाटतंघरातील माणसांसारखीच जशी तुम्ही गोठ्यातील जनावरांची काळजी करता ना?तिला वेळेच्या वेळी वैरण पाणी देता.. बरोबर ना? कारण तर ती जनावरं पण तुमच्या कुटुंबाला आर्थिक हातभार लावतात म्हणून... अरे हजारो वर्षांपासून या मातीने तुमच्या हजारो पिढ्यांची सेवा केली. आणि कसदार माती ची दर्जेदार जमीन मागील पिढ्यांनी तुमच्या हवाली केली.

मागील फक्त ६० वर्षांच्या काळातच आपण आपल्या जमिनीचा कस सेंद्रिय कर्ब ८ % पासून फक्त ०.४ पर्यंत आणून ठेवला आहे. आता तुम्ही म्हणाल हे सेंद्रिय कर्ब काय भानगड आहे? तर तंदुरुस्त माणसाच्या शरीरात जसं रक्त (हिमोग्लोबिन ) १३ च्या वर असावं लागतं आणि जर हेच रक्ताचे प्रमाण फक्त ३ वर आलं तर माणुस श्वास देखील घेऊ शकत नाही.तसच आपला जमीन चा सेंद्रिय कर्ब आपण ८ % पासून फक्त ०.४ पर्यंत आणुन ठेवला आहे. याचाच सोपा अर्थ असा आहे की आपली जमीन ही शेवटच्या घटका मोजत आहे. ज्या शेतकऱ्यांनी जमिनीची हाक ऐकून सेंद्रिय व जैविक औषध वापरून शेती करत आहेत त्याच जमीनी अजून अतिशय चांगल्या पद्धतीने कसदार आहे.पण ज्यांना अजून ही जाग आली नाही ते पुढच्या पिढीला फक्त कसदार जमिनी ऐवजी फक्त रेतीच ताब्यात देतील.

जागतिक तज्ज्ञांचा मते याच पद्धतीने रासायनिक शेती होत गेली तर फक्त ८० ते १०० पिकेच म्हणजेच अंदाजे फक्त ५० ते ६० वर्षांत जगातील 80% जमिनी नापीक होतील. आज देखील दररोज हजारो एकर जमिनी क्षारपड व नापीक होत आहेत. ज्याच्या जमीनी डोळ्यासमोर नापीक झाल्या त्याचे दुःख आपणस जोपर्यंत आपल्यावर वेळ येईल त्याच वेळी कळेल. लवकर जागे व्हा...रासायनिक खत हे जमीनीचे अन्न नव्हे ते...कसदार जमिनीला पाहिजे...गांडुळ खत जमिनीत मुबलक गांडूळ, सेंद्रिय खत, पिकाला अन्नपुरवठा करणारे सर्व जीवाणू, पण नेमके आपण हेच मारून आपल्या पायावर धोंडा मारला आहे...

भरघोस उत्पन्न च्या हव्यासापोटी आपण मातीचे अन्न नसणारे रासायनिक खत, कीटकनाशके, बुरशीनाशक गेल्या ६० वर्षांपासून या जमिनीत देत गेलो आणि गांडूळ, जिवाणू, असे आपले मित्र आपण संपवून टाकले.कसदार जमिन हेच अनमोल रत्न आहे आणि भविष्यात जो शेतकरी आपली जमीन वाचवेल तोच आपल्या भावी पिढीला उज्वल भवितव्य देऊ शकेल.माती ही जशी तुमची संपत्ती आहे तशीच पर्यायने देशाची संपती आहे. कारण ज्या देशाची माती कसदार तोच देश भविष्यात जगावर राज्य करू शकतो. कारण जगाची भूक फक्त कसदार मातीच भागवू शकते.तर चला आज पासून आपण जरा मातीची हाक ऐकून तिला कसदार बनवूया..

 

जैविक शेतकरी

शरद केशवराव बोडे.

९४०४०७५६२८

ध्येय मातीला वाचवणं

Save the soil all together

English Summary: Yes, only if you read the soil, you will read and understand Published on: 11 May 2022, 10:28 IST

Like this article?

Hey! I am गोपाल नरसिंग उगले. Did you liked this article and have suggestions to improve this article? Mail me your suggestions and feedback.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters