सध्यपरिस्थितीला प्राण्यांच्या हल्ल्यात बऱ्याच जणांनी आपला जीव गमावल्याच्या अनेक घटना आपण ऐकल्या. कधी शेतात काम करताना तर कधी शेतात काम करण्यासाठी जाताना प्राण्याच्या हल्ल्यात नागरिकांनी आपला जीव गमावला आहे. विशेषतः शेतकरी बंधूना शेतात काम करत असताना साप व इतर अनेक गोष्टींपासून जीवाला धोका असतो. बऱ्याचदा शेतकरी रात्रीच्या वेळी शेत कामासाठी जात असताना त्यांच्यावर वन्यप्राण्यांचादेखील हल्ला होतो.
काही भागात तर वन्यप्राणांच्या वाढत्या हालचालीमुळे तेथील नागरिकांना धोक्याची घंटा आधीच दिली जाते. मात्र बीड जिल्ह्यात एका हल्ल्याची बरीच चर्चा होताना दिसत आहे. सध्या वन्य प्राण्यांचे लोकवस्तीकडे येण्याचे प्रमाण वाढले आहे. शेत शिवारात पीक नसल्याने प्राणी लोकवस्तीकडे येत असल्याचे सांगितले जात आहे. मौजवाडी परिसरात एक रानटी डुक्कर गावात शिरले आणि त्याने एका 62 वर्षीय शेतकऱ्यावर हल्ला चढवला.
अचानक हल्ला झाला तर साहजिकच आपण गांगरून जाऊ. आपल्याला काय करावे तेच सुचणार नाही. मात्र रानडुकराने केलेल्या हल्ल्यात 62 वर्षीय शेतकऱ्याने टक्कर ची लढाई दिली आहे. माघार न घेता शेतकऱ्याने डुकराला आवळले. आणि त्याला अक्षरश: लोळवले. स्वतःचा जीव वाचवण्यासाठी न डगमगता रानडुकराशी दोन हात केले. ही कडवी झुंज तब्बल पाऊन तास चालली होती. स्थानिक लोकांना याची माहिती होताच ते घटनास्थळी आले व त्यांनी रानडुकराला ठार मारुन शेतकरी लक्ष्मण ढेंबरे यांची त्यातून सुटका केली. या हल्ल्यात लक्ष्मण ढेंबरे हे गंभीर जखमी झाले आहेत.
नेमकं काय झालं?
रानटी डुकरे पाण्याच्या तसेच चाऱ्याच्या शोधात थेट लोकवस्तीमध्ये घुसत आहे. शिवाय बीड जिल्ह्यातील मौजवाडी शिवारात रानडुकरांचा दिवसेंदिवस वावर वाढला आहे. शेतकरी लक्ष्मण ढेंबरे हे नेहमीप्रमाणेच सकाळच्या वेळी दूध घेऊन निघाले होते. गाव जवळ येताच त्यांच्यावर रान डुकराने हल्ला केला. मात्र 62 वर्षीय लक्ष्मण ढेंबरे यांनीही डुकराला चांगलाच हिसका दाखवला.स्वतःचा जीव वाचवण्यासाठी त्यांनी आपली सर्व ताकद एकजूट करून लढाई लढली.
ही लढाई काही थोड्या वेळाची नव्हती तर तब्बल पाऊन तासांची होती. पाऊन तास रानडुक्कर लक्ष्मण यांच्यावर हल्ला करत होते तर शेतकरी लक्ष्मण स्वतःचा बजाव करीत होते. मात्र रानडुक्कर काही माघार घेण्यास तयार नव्हते अखेर ग्रामस्थांनी त्या रानडुकराला ठार केले. आणि शेतकरी लक्ष्मण ढेंबरे यांचा जीव वाचविला. अखेर पाऊन तासानंतर ही कडवी झुंज संपली. या हल्ल्यात लक्ष्मण हे गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर उपचार चालू आहेत.
महत्वाच्या बातम्या:
शेतकऱ्यांनो ट्रॅक्टर खरेदीवर मोदी सरकार देतंय 50 टक्के अनुदान; आजच घ्या लाभ
शेतकऱ्यांना फसवणे पडले महागात; पोलिसांनी जप्त केला लाखोंचा मुद्देमाल
Share your comments