1. पशुसंवर्धन

Pig Farming : 'ह्या' पद्धतीने करा "वराह पालन" आणि बना लखपती

अजय वसंत शिंदे
अजय वसंत शिंदे
pig farming

pig farming

भारतात शेती हा प्रमुख व्यवसाय आहे आणि जवळपास निम्म्याहून अधिक जनसंख्या शेतीशी संबंधित कामात गुंतलेली आहे. ग्रामीण भागात हा आकडा अजूनच वाढतो, ग्रामीण 70 टक्के लोक फक्त शेती आणि शेतमजुरी ह्या कामाशी निगडित आहे. जगात तसेच देशातही फार पूर्वीपासून पशुपालन केले जात आहे, पूर्वी शेतकरी शेतीचे काम करण्यासाठी एक दोन गाय अथवा बैल पाळत असे. आता पशुपालनला व्यापारी वळण लाभले आहे आणि ह्यातून आता शेतकरी चांगले उत्पन्न प्राप्त करत आहेत.

पशुपालन करून शेतकरी अतिरिक्त उत्पन्न प्राप्त करू शकतो त्यासाठी आज आपण आपल्या वाचक शेतकरी मित्रांसाठी पशुपालनाविषयी माहिती घेऊन आलो आहोत. आज आपण जाणुन घेणार आहोत डुक्कर पालन अर्थात वराह पालन विषयी. मित्रांनो संपूर्ण जगात वराहपालन केले जाते. वराह पालन मुख्यता मांससाठी केले जाते. आणि ह्याची मागणी ही वर्षभर बनलेली असते. त्यामुळे वराहपालन करून तुम्हीही चांगली कमाई करू शकता. चला तर मग जाणुन घेऊया वारहपालनवषयी.

 वराह पालन करताना 'ह्या' गोष्टींची काळजी घ्या

»वराह म्हणजे डुक्कर पालन आपण ज्या ठिकाणी करणार आहात त्या ठिकाणी काँक्रेट किंवा सिमेंटचा कोबा किंवा फरची बसवू नये म्हणजे जागा मातीचीच असावी.

कारण की डुक्कर हे मातीत आपली सोंड टाकत असतात.

»ज्या ठिकाणी डुक्कर ठेवणार आहात त्या शेडला चांगली उंची हवी जवळपास 10 ते 12 फूट उंच असावे.कारण डुक्करला ऊन जास्त लागत.

»ज्या ठिकाणी डुक्कर ठेवली जाणार आहेत त्या ठिकाणी पाण्याची पुरेशी व्यवस्था असावी. तसेच त्यांना फिरायला शेड मध्ये विस्तृत जागा असावी.

»वराहपालनात डुकरांची हानी एवढी होत नाही, सहसा डुकरांना रोगांची लागण होत नाही पण तरी देखील डुकरांना प्रामुख्याने चार आजार होतात. यामध्ये Hemorrhagic Septicemia, तोंड आणि त्वचेशी संबंधित रोग, स्वाइन फ्लू यांचा समावेश आहे.

 

जनावरांना ह्या रोगापासून वाचवण्यासाठी त्यांचे वेळेवर लसीकरण झाले पाहिजे. त्यामुळे वारहपालन करताना लसीकरण करणे गरजेचे ठरते.

»डुकरांना खाण्यासाठी भाज्या, फळांची साले, सडलेले फळे आणि भाज्या, हॉटेलमधील उरलेले अन्न, घरातील शिळ अन्न दिले जाऊ शकते. परंतु लक्षात ठेवा कांद्याची साल, आणि लसणाची साल ही डुकरान्ना खायला देऊ नये.

Like this article?

Hey! I am अजय वसंत शिंदे. Did you liked this article and have suggestions to improve this article? Mail me your suggestions and feedback.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters