Malegaon :सध्या राज्यात कांद्याला कवडीमोल भाव मिळत असल्याने कांदा उत्पादक शेतकरी हवालदिल झाला आहे. कांदा उत्पादक शेतकऱ्यांवर ओढवलेल्या संकंटांचा दिवसाकाठी अनुभव येतंच आहे. शिवाय व्यापाऱ्यांकडूनही शेतकऱ्याची चेष्टा लावली जात आहे. अनेक बाजार समित्यांमध्ये कांद्याला मागणी नसल्याने लिलाव देखील रद्द झाले. अशावेळी शेतकऱ्यांनी बाजारपेठेची वाट धरली.
शेतकरी कांदा घेऊन बाजारपेठेत दाखल झाले असता व्यापारी पाठ फिरवत असत. असाच काहीसा प्रकार घडला आहे मनमाड येथे. गोल्टी कांद्याला व्यापारांनी कवडीमोल भाव दिला होता. तसेच तुमच्यावर एक प्रकारे उपकारच केले आहेत अशा आविर्भावात हा माल खरेदी केला होता. पण म्हणतात ना,एकीचे बळ असेल तर कोणतीही गोष्ट साध्य होते.
शेतकऱ्यांनी दाखवलेल्या एकीच्या बळामुळे त्यांना चांगले यश मिळाले आहे. कांदा दराबाबत दुःखी असलेल्या शेतकऱ्यांनी एकत्रित येऊन कांद्याला मार्केट मिळवून देण्याचा निश्चय केला. मनमाड तालुक्यातील शेतकऱ्यांनी चांगल्या प्रतीचा पण गोल्टीच्या कांद्याची थेट व्हिएतनामलाच निर्यात केली. शेतकऱ्यांचा हा प्रयोग फसेल असं कित्येकांना वाटू लागले. यासाठी त्यांना सर्वांनी हिणवलेदेखील.
मात्र शेतकऱ्यांचे समर्पण आणि एकजुटीमुळे हा प्रयोग यशस्वी झाला. आता शेतकऱ्यांच्या या यशस्वी प्रयोगामुळे त्याच मार्केटमध्ये कांद्याला 20 किलो असा दर मिळाला आहे शिवाय कोणाच्याही मध्यस्तीविना.मार्केट शेतकऱ्यांच्या हातात गेले तर काय होऊ शकत याच हे उत्तम उदाहरण आहे. शेतात अमाप कष्ट घेऊनही पिकाला कवडीमोल दर मिळाला नाही. यातून शेतकऱ्यांचे आर्थिक गणित बिघडले.
कितीतरी शेतकऱ्यांनी कांद्याचे फुकट वाटप केले, तर काहींनी आत्महत्येसारखे पाऊल उचलले. मनमाडमध्येही कांद्याला भाव नव्हता. व्यापाऱ्यांनी गोल्टी कांद्याकडे पाठच फिरविली होती. तरुण व्यापारी फजल कच्छी व त्यांचे सहकारी नदीम शेख यांनी शेतकऱ्यांना एकत्र करून आपल्या योजनेची माहिती देत त्यांच्याकडील कांदा गोळा केला.
नंतर दोन कंटेनर भरून व्हिएतनामला कांदा रवाना केला. व्हिएतनामसह इतर देशांतदेखील कांद्याला चांगला भाव मिळाला असल्याने अजून 8 ते 10 कंटेनर पाठविण्यात येणार असल्याचे तरुण व्यापारी फजल कच्छी यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले.शेतकऱ्यांशी संपर्क साधून फजल कच्छी व नदीम शेख यांनी कांदा गोळा केला.
नंतर मुंबई पोर्टवरून कंटेनरद्वारे व्हिएतनाम व इतर देशांत त्याची निर्यात केली. जिथे गोल्टी कांदा अवघ्या 1 ते 2 रुपये किलोने व्यापारी विकत घेत होते. आज त्याच कांद्याला व्हिएतनामध्ये 20 रुपये असा भाव आहे. बघायला गेलं तर शेतकऱ्याला सर्व खर्च वजा करता 6 ते 8 रुपये किलोमागे पदरात पडत आहेत.
महत्वाच्या बातम्या:
women farmer's success: महिला शेतकऱ्याची कमाल! चक्क गायीच्या शेणापासून तयार केला नैसर्गिक कलर
धरण मोबदल्यात कोट्यावधींचा घोटाळा! शेतकऱ्यांच्या जागी बोगस व्यक्ती; तहसिलदारही अटकेत
Share your comments