बँक म्हटले की, साहजिकच आपल्या डोळ्यासमोर एचडीएफसी (HDFC) , आय.डी. एफ. सी (IDFC), एसबीआय (SBI) यांसारख्या अनेक बँका आपल्याला आठवतात. जिथे आपण आपले पैसे सुरक्षित ठेऊ शकतो शिवाय गरज पडेल तेंव्हा आपण आपल्या खात्यातून पैसेदेखील काढू शकतो. किंवा कर्जासाठी अर्ज करु शकतो. मात्र अशी एक बँक आहे जिथे पैशांचा कोणताच व्यवहार होत नाही. मात्र तरीही ही बँक शेतकऱ्यांसाठी फायद्याची आहे.
तुम्हाला ऐकायला नवल वाटेल पण 'गोट बँक' म्हणून एक संकल्पना आहे. नावावरूनच समजले असेल की ही बकर्यांची बँक आहे. बकर्यांची बँक ही
नवखी संकल्पना नागपूर जिल्ह्यात सुरु करण्यात येणार आहे. ज्यामुळे रोजगाराची संधी देखील मिळेल. सध्या नागपूर जिल्ह्यात पुण्यश्लोक अहिल्यादेवी महाराष्ट्र मेंढी व शेळी महामंडळाच्या प्रक्षेत्र बोंद्री येथे गोट बँकेची स्थापना करण्यात येणार आहे. तिथे शेळ्यांची देवाण-घेवाण केली जाईल.
यात जवळजवळ ५०० महिलांना सहभागी करण्यात येणार आहे. या योजनेच्या अंतर्गत महामंडळाच्या निधीद्वारे ५०० महिलांना शेळ्यांचे वितरण करण्यात येणार असल्याची माहिती पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय मंत्री सुनील केदार यांनी दिली. यासंदर्भात मंत्रालयात पुण्यश्लोक अहिल्यादेवी महाराष्ट्र मेंढी व शेळी विकास महामंडळाची आढावा बैठक पार पडली.
शेतकऱ्याचा नादच खुळा..! शेतीतला नाविन्यपूर्ण प्रयोग झाला यशस्वी; आता पठ्ठ्याची ३० लाखांची कमाई
पुण्यश्लोक अहिल्यादेवी महाराष्ट्र मेंढी व शेळी विकास महामंडळाच्या प्रक्षेत्रावरचे बळकटीकरण व आधुनिकीकरण करण्यासाठी ९४ कोटी प्रस्तावित करण्यात आले आहे. अशी माहिती मंत्री सुनील केदार यांनी दिली. तसेच शेळी-मेंढी खाद्य कारखाना, पशूधन खरेदी करणे, नवीन वाडे बांधकाम, कृत्रिम रेतन कार्यक्रम राबवणे, मुरघास निर्मिती यंत्रसामुग्री,
जमीन विकास,शेळी मेंढी पालन प्रशिक्षण केंद्र इमारत बांधकाम, सिंचन सुविधा विहीर, पाईपलाईन, इलेक्ट्रीक मोटर, ट्रॅक्टर ट्रॉली, कृषी अवजारे व चारा कापणी यंत्र, वैरण साठवणूक गोडाऊन,कार्यालय इमारत बांधकाम, सुरक्षा भिंत,प्रशिक्षणार्थी निवासी इमारत बांधकाम व शेतकरी निवासस्थान,अधिकारी कर्मचारी निवास बांधकाम, प्रक्षेत्रावरील आवश्यक साधनसामुग्री,
आता नोकरीच्या मागे न धावता तरुणांच्या मनात बसणार शेती; ठाकरे सरकारची नवी योजना
सिल्वी -पाश्चर विकसित करणे, अंतर्गत रस्ते, अल्ट्रासोनोग्राफी युनिट, फिरते शेळी-मेंढी चिकित्सालय वाहन खरेदी, फाँडर ब्लॉक मेकिंग युनिट, शिवाय सीसीटीव्ही कॅमेरेदेखील बसविण्यात येणार असल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली.
महत्वाच्या बातम्या:
योगी सरकारचा मोठा निर्णय! घरातील एका सदस्याला मिळणार नोकरी, जाणून घ्या योजना
Share your comments