बाप आणि मुलीचे नाते हे अद्वितीय असते. याची प्रचिती देणारे अनेक उदाहरणे वेळोवेळी आपल्याला बघायला देखील मिळतं असतात. आज आपण अशाच एका शेतकरी बापाचे आणि शेतकरी मुलाचे नाते अधोरेखित करणारी एक हृदयस्पर्शी उदाहरणं जाणुन घेणार आहोत.
शेतकरी बाप आपल्या संपूर्ण आयुष्यभर धरणी आईची सेवा करत असतो. धरणी आईची सेवा करण्यासोबतच शेतकरी बाप आपल्या मुला-मुलींना लहानाचे मोठे करतो. याचीच कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी धुळे जिल्ह्यातील एका लेकीने आपल्या शेतकरी बापाचा आपल्या शेतात पुतळा उभारला आहे. शेतकरी बापाला दिलेली ही कृतज्ञता पाहून धुळे जिल्ह्यासमवेतच संपूर्ण राज्यातून या मुलीवर कौतुकाचा वर्षाव होत आहे.
महत्वाची बातमी :
Desi Jugad : पिकाच्या संरक्षणासाठी लातूरच्या शेतकऱ्याचा भन्नाट जुगाड! राज्यात सर्वत्र याचीच चर्चा
महत्वाची बातमी! मोदी सरकार शेतकऱ्यांना म्हातारपणात देणार पेन्शन; वाचा या योजनेविषयी
धुळे जिल्ह्यातील मोराने या गावाची रहिवासी सोनाली पाटील या शेतकरी कन्येने आपल्या बापाच्या म्हणजेच आबा नवल पाटील यांच्या कष्टाची जान ठेऊन एक कृतज्ञता म्हणून आपल्या शेतात शेतकरी बापाचा पुतळा उभारला.
या लेकीने केलेल्या कार्याचे समाजातील सर्व स्तरावरून तोंड भरून कौतुक केले जात आहे. नुकतेच या पुतळ्याचे अनावरण धुळे मतदार संघाचे खासदार डॉक्टर सुभाष बाबा भामरे यांच्या हस्ते करण्यात आले. खासदार सुभाष बाबा यांनी यावेळी या लेकीचे कौतुक केले असून आबा पाटील यांच्या स्मृतीस अभिवादन करून आबा यांच्या आठवणी देखील ताज्या केल्या.
खासदार सुभाष बाबा यांनी सांगितले की, आबा पाटिल यांनी मुलाला देशसेवेसाठी संरक्षण दलात पाठविले यामुळे आबांनी शेती समवेतच देशसेवा देखील केली आहे. आबांनी शेतीमध्ये फार मोठे योगदान दिले आहे यामुळे त्यांचे भरीव असे कर्म निश्चितच अधोरेखित करण्यासारखे आहे.
आबांना शेतीची मोठी आवड होती, असे प्रतिपादन खासदार डॉ. सुभाष भामरे यांनी यावेळी केले. आबा नवल पाटील यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण प्रसंगी खासदार डॉ. भामरे बोलत होते. निश्चितच मोराणे गावातील या शेतकरी कन्येने दिलेली ही कृतज्ञता अद्वितीय असून यामुळे शेतकरी बापाचे आणि आपल्या मुलीचे असणारे एक अद्भुत नाते समाजासमोर उभे राहिले आहे.
Share your comments