1. बातम्या

Desi Jugad : पिकाच्या संरक्षणासाठी लातूरच्या शेतकऱ्याचा भन्नाट जुगाड! राज्यात सर्वत्र याचीच चर्चा

शेतकरी केव्हा काय करेल याचा नेम नसतो आणि जेव्हा विषय येतो शेतकऱ्याच्या (Farmer) पिकांच्या संरक्षणाचा मग तो कोणत्याही थराला जाऊ शकतो आणि वेळेप्रसंगी जुगाड (Jugad) करूनही आपल्या पिकांचे संरक्षण शेतकरी बांधव करत असतो.

अजय वसंत शिंदे
अजय वसंत शिंदे
Farmers Desi Jugad

Farmers Desi Jugad

शेतकरी केव्हा काय करेल याचा नेम नसतो आणि जेव्हा विषय येतो शेतकऱ्याच्या (Farmer) पिकांच्या संरक्षणाचा मग तो कोणत्याही थराला जाऊ शकतो आणि वेळेप्रसंगी जुगाड (Jugad) करूनही आपल्या पिकांचे संरक्षण शेतकरी बांधव करत असतो.

लातूर जिल्ह्यातील (Latur District) एका शेतकऱ्याने देखील असा एक अजब जुगाड केला आहे की त्याची सर्व राज्यात चर्चा होत आहे. मित्रांनो आम्ही आपणास सांगू इच्छितो की लातूर जिल्ह्यातील खारपाण पट्ट्यात गेल्या अनेक वर्षांपासून वन्य प्राण्यांमुळे (Wild Animal) शेतकरी बांधवांचे मोठे नुकसान होते.

वन्य प्राण्यांमुळे येथील शेत पिकांचे (Agriculture Crop) मोठे नुकसान होते. यामुळे शेतकरी बांधवांना शेताला कुंपण करण्याशिवाय काहीच पर्याय नसतो. मात्र प्रत्येक शेतकऱ्याला लोखंडी तारेचे कुंपण करणे शक्य नसते कारण की यासाठी खूप मोठा पैसा उभा करावा लागतो याशिवाय विद्युत प्रवाह कुंपणमध्ये सोडल्यास वन्यप्राण्यांचा मृत्यू देखील होऊ शकतो. यामुळे खापरवाडी येथील शेतकरी जगन प्रल्हाद बगाडे यांनी अशी काही आयडियाची कल्पना केली की आज संपूर्ण राज्यात या शेतकऱ्याची चर्चा रंगली आहे.

महत्वाच्या बातम्या

Farmers Income : भारतीय शेतकरी शेतीतुन किती कमवतो? नाही माहिती; मग वाचा याविषयी सविस्तर

खांदेशात अक्षय तृतीयाच्या दिवशी नेमला जातो नवीन सालगडी; मात्र कठीण परीक्षा करावी लागते पास; वाचा याविषयी

Organic Farming : पद्मश्री भारत भूषण यांनी सांगितला सेंद्रिय शेतीचा बेस्ट फॉर्मुला; उत्पन्न दुपटीने वाढणार

या शेतकऱ्याने कुंपण म्हणुन निवडुंग वनस्पतीचे जैविक कुंपण केले आहे. जे की विनाखर्च करण्यात आले आहे. बगाडे यांनी कॅक्ट्स प्रजातीचे निवडुंग वनस्पतीच्या साहाय्याने जवळपास 22 एकर शेतजमीनीला कुंपण केले आहे. हे कुंपण जवळपास 12 फूट उंच आणि 3 फूट रुंदीचे असल्याने वन्य प्राणी सहजासहजी शेतात शिरणे अशक्य आहे. शिवाय यासाठी एक रुपया देखील खर्च करावा लागत नसल्याने आता या जैविक कुंपणाची सर्व राज्यात चर्चा रंगली असून अनेक शेतकरी या प्रकारच्या कुंपणाकडे वळले आहेत.

खरं पाहता, खारपाणपट्ट्यात पावसाच्या पाण्यावर आधारित शेती आहे. मात्र जगन यांनी पाण्याचा मुबलक साठा उपलब्ध करून बारामाही बागायती शेती फुलवली आहे. शिवाय पिकांचे रक्षण करण्यासाठी जैविक कुंपण तयार करून वन्य प्राण्यांपासून होणारे नुकसान कमी केले आहे. निश्चितच बगाडे यांचा हा प्रयोग कौतुकास्पद आहे आणि इतर शेतकऱ्यांनी देखील जगन यांच्या या प्रयोगाचे अनुकरण करून आपले पीक संरक्षित केले पाहिजे अशा प्रतिक्रिया आता जाणकार लोक व्यक्त करत आहेत.

English Summary: Desi Jugad: Abandoned Jugaad of Latur farmers for crop protection! This is the talk of the town Published on: 03 May 2022, 07:42 IST

Like this article?

Hey! I am अजय वसंत शिंदे. Did you liked this article and have suggestions to improve this article? Mail me your suggestions and feedback.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters