शेतकऱ्याची शेती जमीन किती आहे हे शेतकऱ्यांना त्यांच्या असलेल्या सातबारा यावरून कळते. परंतु बऱ्याचदा भावाभावांमधील वाटण्या झाल्यानंतर ज्या जमिनी प्रत्येकाच्या वाट्याला दिल्या जातात या एक प्रकारे अंदाजे दिल्या जातात. कालांतराने या वाटण यावरून वाद उद्भवू शकतात. एखाद्यावेळेस सातबारावर असलेल्या नमूद असलेल्या जमिनीपैकी प्रत्यक्षात कमी जमीन आढळते.
त्यावेळेस शेतजमीनीची मोजणी करणे फायद्याचे असते. परंतु बऱ्याच शेतकऱ्यांना अजूनही शेत जमिनीच्या मोजणी विषयीचा अर्ज कुठे आणि कसा करायचा याबाबत पुरेशी माहिती नसते. या लेखात आपण शेत जमिनीविषयीचा अर्ज कुठे आणि कसा करावा याबद्दल सविस्तर माहिती घेणार आहोत.
शेतजमीन मोजणीसाठी आवश्यक अर्ज आणि लागणारी कागदपत्रे
शेतकऱ्यांनी आपल्या जमिनीविषयी काय शंका निर्माण झाल्यास किंवा काही वाद निर्माण झाल्यास तालुकास्तरावरील भूमी अभिलेख कार्यालय किंवा उपाध्यक्ष भुमी अभिलेख किंवा नगर भूमापन अधिकारी यांच्या कार्यालयात अर्ज करावा लागतो. शेतजमीनीची मोजणीसाठी लागणारा अर्जचा नमुना हा भुमी अभिलेख विभागाच्या अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध आहे.
शेतातील दगड गोट्याचे टेंशन विसरा; आली 'ही' मशीन, दोन तासात बाजूला करता येणार दगड गोटे
शेतजमीन मोजणीसाठी अर्ज कसा करावा
सर्वप्रथम भूमी अभिलेख कार्यालयात जाऊन मोजणीसाठी असलेला अर्ज घेऊन तो तालुक्यातील कार्यालयात जमा करावा. त्यानंतर अर्ज भरताना पहिल्यांदा तालुका आणि आपल्या जिल्ह्याचे नाव नमूद करावे. त्याच्यानंतर पर्याय पुढे अर्जदाराचे संपूर्ण नाव आणि पत्ता याविषयी माहिती भरावी. या अर्जामध्ये आपले स्वतःचे नाव, गाव, तालुका आणि जिल्हाविषयी संपूर्ण माहिती भरावी.
त्यानंतर पुढचा तपशील येतो. मोजणी करण्यासंबंधीची माहिती व मुलगी प्रकाराचा तपशील या पर्यायांमध्ये मोजणी किती कालावधीत करायचे. त्या मोजणी मागचा उद्देश काय आहे हे नमूद करावे लागते. यामध्ये आपल्या तालुक्याचे गावाचे नाव व्यवस्थितरित्या नमूद करावे. आपल्या शेतजमिनीचा जो गट नंबर आहे त्याचा तपशील भरावा.
पावसासंबंधी निसर्गाचे संकेत कसे ओळखायचे? या विषयी पंजाबराव डख यांनी सांगितली महत्त्वाची माहिती...
जमीन मोजण्याचा प्रकार
जमीन मोजणीच्या प्रकारांमध्ये साधारणतः कालावधीनुसार तीन प्रकार पडतात.
- 1 साधारणत सहा महिने कालावधी असलेली साधी मोजणी
- 2 तीन महिने कालावधी असलेली तातडीची मोजणी
- 3 दोन महिने कालावधी असलेली अति तातडीची मोजणी. हे तीन प्रकारे शेतजमीन मोजली जाते.
- गाडी घेणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी; भारतीय Tata Nexon कार आता CNG मध्ये उपलब्ध, जाणून घ्या किंमत
कालावधीनुसार एक हेक्टर जमीन मोजणीसाठी लागणारे शुल्क
साध्या मोजणीसाठी एक हजार रुपये लागतात. तातडीची मोजणीसाठी २ हजार रुपये आणि अति तातडीची मोजणी ३ हजार रुपये अशाप्रकारे जमीन मोजण्याचे दर आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांना अर्ज भरताना कालावधी कॉलममध्ये किती कालावधीत नोंदणी करायची आहे ते लिहावे. कोणत्या कारणासाठी जमीन मोजणी करायची आहे तो उद्देशही लिहावा लागतो.
या अर्जामध्ये तिसरा पर्याय येतो तो, म्हणजे सरकारी खजिन्यात भरलेली मोजणी फी या पर्यायांमध्ये मोजणीसाठी लागणारे शुल्क रक्कम त्यासाठी लागणारे चलन किंवा पावती क्रमांक अथवा दिनांक लिहावा. या जाती चौथा पर्याय म्हणजे सातबारा उताऱ्यावर जेवढे जमिनीचेसह धारक असतात, तुमच्या सातबारामध्ये इतरांची नावे असल्यास त्यांचा तपशील आणि या सगळ्यांचे संमती असल्याच्या सह्या आवश्यक असतात.
पुढच्या पाच या पर्यायांमध्ये लगतचे जमीनधारक त्यांची नावे व पत्ता लिहिणे गरजेचे आहे. आपल्या जमिनीच्या चहूबाजूंनी म्हणजे चतुर सीमेला कोणकोणत्या शेतकऱ्यांची जमीन आहेत, त्यांची नावे नोंद करावी.
साखर निर्यातीत महाराष्ट्र पहिल्या क्रमांकावर : शरद पवार
10 रुपयांची नोट 2 लाख रुपयांना विकते; जाणून घ्या विकण्याची सोपी पद्धत
सहाव्या पर्यायांमध्ये आपण अर्जासोबत कोणकोणते कागदपत्रे जोडली आहेत. त्यांचे व्यवस्थित वर्णन लिहावे लागते. त्यामध्ये मोजणी अर्ज, मोजणीची फी, चलन किंवा पावती, अलीकडील काळात काढलेला सातबारा यांचा तपशील भरावा. अशाप्रकारे अर्ज भरून झाल्यानंतर संबंधित कार्यालयात जमा करावा. त्यानंतर सादर केलेल्या अर्जाची तपासणी करून मोजणीसाठी जी काही शुल्क लागत असेल त्यानुसार त्याचे चलन बनवून दिले जाते.
हे चलन घेऊन शेतकऱ्याची बँकेचे चलनाचे रक्कम भरावी लागते. ही पावती दिल्यानंतर मोजणीचा रजिस्ट्रेशन नंबर हा तयार होतो. आपण सादर केलेल्या अर्जाची पोच आपल्याला दिली जाते. या पोचपावतीमध्ये आपल्या मोजणीचा दिनांक कोणता आहे. मोजणीस कोणता कर्मचारी येणार आहे,त्यांचा मोबाईल क्रमांक, कार्यालय प्रमुख यांचा मोबाईल क्रमांक असा तपशील दिला जातो.
Share your comments