1. बातम्या

बीज प्रमाणीकरण यंत्रणेकडे विविध पिकांची क्षेत्र नोंदणी सुरु

नांदेड: रब्बी हंगाम सन 2018-19 मधील बीजोत्पादनाकरीता बीज प्रमाणीकरण यंत्रणेकडे विविध पिकांची क्षेत्र नोंदणी सुरु आहे. बीजोत्पादक संस्थांनी प्रस्ताव सादर करावे, असे आवाहन विभागीय बीज प्रमाणीकरण अधिकारी परभणी यांनी केले आहे. विविध रब्बी पिकांच्या बीजोत्पादनासाठी बीज प्रमाणीकरण यंत्रणेकडे जिल्हा बीज प्रमाणीकरण अधिकारी नांदेड, परभणी, हिंगोली, लातूर, उस्मानाबाद कार्यालयात क्षेत्र नोंदणी सुरु आहे.

KJ Staff
KJ Staff


नांदेड:
रब्बी हंगाम सन 2018-19 मधील बीजोत्पादनाकरीता बीज प्रमाणीकरण यंत्रणेकडे विविध पिकांची क्षेत्र नोंदणी सुरु आहे. बीजोत्पादक संस्थांनी प्रस्ताव सादर करावे, असे आवाहन विभागीय बीज प्रमाणीकरण अधिकारी परभणी यांनी केले आहे. विविध रब्बी पिकांच्या बीजोत्पादनासाठी बीज प्रमाणीकरण यंत्रणेकडे जिल्हा बीज प्रमाणीकरण अधिकारी नांदेड, परभणी, हिंगोली, लातूर, उस्मानाबाद कार्यालयात क्षेत्र नोंदणी सुरु आहे.

बीजोत्पादक संस्थांनी बीजोत्पादक शेतकऱ्यांच्या शेतावर घेण्यात येणाऱ्या या बीजोत्पादन कार्याक्रमाचे क्षेत्र नोंदणी प्रस्ताव बीज प्रमाणीकरण यंत्रणेकडे सादर करण्याच्या पिकनिहाय अंतिम तारखा पुढील प्रमाणे आहेत. करडई व रब्बी ज्वारी 31 ऑक्टोंबर 2018, हरभरा 20 नोव्हेंबर तथा गहू व इतर पिकांसाठी 15 डिसेंबर आहे. या तारखा क्षेत्र नोंदणीच्या अंतिम तारखा असून क्षेत्र नोंदणी अंतिम तारखेपूर्वी पिकाची पेरणी झाल्यानंतर 15 दिवसात करता येईल. त्यासाठी अंतिम तारखेची वाट पाहण्याची आवश्यकता नाही.

संबंधित बातमी वाचण्यासाठी: बियाणे उत्पादक शेतकऱ्यांना प्रोत्साहन

क्षेत्र नोंदणीकरीता बीजोत्पादक संस्थांनी प्रस्तावासोबत बीजोत्पादक संस्थेचा परवाना, बीजोत्पादक संस्था प्रतिनिधीचे अधिकारपत्र, जिल्हा बीज प्रमाणीकरण अधिकारी यांचेसह करण्यात येणार 500 रुपयाच्या बंधपत्रावरील करारनामा, स्त्रोत बियाणे खरेदी बिल, स्त्रोत बियाण्याचे मुळ मुक्तता अहवाल, स्त्रोत बियाणे पडताळणी अहवाल, बीजोत्पादक शेतकऱ्याच्या स्वाक्षरीत व परिपूर्ण माहिती भरलेला विहित नमुन्यातील अर्ज, बीजोत्पादकाचे महसूल दस्तावेज (सात / बारा व आठ-अ), बीजोत्पादकांचे आधार क्रमांक व बँक खाते क्रमांक, संस्था आणि बिजोत्पादकांमधील करारनामाची प्रत, स्त्रोत बियाणे वाटप अहवाल, गाव / पिक व दर्जा निहाय बीजोत्पादकांच्या विहित प्रपत्रातील याद्या 4 प्रतीत इत्यादी कागदपत्रांसह क्षेत्र नोंदणीचे प्रस्ताव सादर करावे.

क्षेत्र नोंदणी शुल्क 50 रुपये प्रती बीजोत्पादक असून क्षेत्र तपासणी शुल्क पायाभूत बीजोत्पादनासाठी 200 रुपये प्रती एक व प्रमाणीत बीजोत्पादनासाठी 150 रुपये प्रती एकर याप्रमाणे आहे. यासंदर्भात अधिक माहितीसाठी जिल्हास्तरीय बीज प्रमाणीकरण अधिकारी नांदेड, परभणी, हिंगोली, लातूर, उस्मानाबाद या कार्यालयात संपर्क साधावा, असेही आवाहन विभागीय बीज प्रमाणीकरण अधिकारी परभणी यांनी केले आहे.

English Summary: various crops started registering area to Seed certification system Published on: 11 October 2018, 08:30 IST

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters