सोमवारी केंद्रीय लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात आलेल्या नागरी सेवा परीक्षा-2021 चा अंतिम निकाल जाहीर करण्यात आला. हा निकाल केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या अधिकृत संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आला आहे. यावर्षीही या परीक्षेत पुन्हा एकदा मुलींनी बाजी मारली आहे. श्रुती शर्मा ही देशातून पहिली आली आहे. यूपीएससी परीक्षेत राज्यातील जवळजवळ 80 हुन अधिक विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत.
या सगळ्यांमध्ये ओंकार पवार ने अनेकांचे लक्ष वेधले. शेतकऱ्याच्या मुलाने कमावलेल्या या यशाबद्दल त्याचे अनेक स्तरावरून कौतुक होत आहे. सुरुवातीला ओंकार या परीक्षेची पुण्यात तयारी करत होता व नंतर लॉकडाऊनमुळे त्याने गावातच तयारी करायला सुरुवात केली. आणि त्याच्या या कष्टाला त्याला चांगलेच फळ मिळाले आहे.
ओंकार पवार हा साताऱ्यातील जावळी तालुक्यातील सनपाने गावात राहणार मुलगा आहे. याचे प्राथमिक शिक्षण हे सनपानेच्या जिल्हापरिषदेच्या शाळेत पूर्ण झाले. माध्यमिक शिक्षण हे रयत शिक्षण संस्थेच्या शाळेत झाले असून पुढील शिक्षणासाठी तो पुण्यात आला होता. ओंकार पवार याने मागील वर्षी यूपीएससीच्या परीक्षेत 455 नंबरने यश मिळवले होते. सध्या ओंकार पवार हे आयपीएस पदावर रुजू आहेत.
गेली दोन वर्षे या परीक्षेत उत्तीर्ण होण्यासाठी ओंकार प्रचंड मेहनत घेत होता. गावातच राहून त्याने आपली तयारी पूर्ण केली. ओंकारचे आई-वडील शेती करतात. अतिशय सामान्य कुटुंबातील ओंकारने आपल्या प्रचंड मेहनतीच्या जोरावर आपल्या शेतकरी आई वडिलांचे नाव मोठं केलं. त्यामुळे त्याचा सर्वांनाच अभिमान वाटत आहे.
पीक कर्जाबाबत ठाकरे सरकारची मोठी घोषणा; बँकांना दिले 'हे' आदेश
शिवाय घरातील पहिला अधिकारी झाल्यामुळे संपूर्ण घरात तसेच गावातदेखील सध्या उत्साहाचे वातावरण तयार झालं आहे. आजची तरुणाई स्पर्धा परीक्षेत पास झाली नाही तर नैराश्येत जाऊ लागली आहे. एमपीएससी किंवा युपएससी हे आयुष्य नसून हा एक करीअरचा ऑप्शन आहे. त्यामुळे परीक्षेत पास झालो तरी आपण आयुष्यात फेल होत नाही, हे आजच्या तरुण पिढीने लक्षात ठेवावे, असा सल्ला ओंकार पवार यांनी दिला आहे.
महत्वाच्या बातम्या:
लॉकडाऊनबाबत अजित पवारांचे मोठे वक्तव्य, कोरोना रुग्णसंख्या वाढली
कृषी केंद्रांवर कृषी विभागाची करडी नजर; आता 9 भरारी पथक करणार 'हे' काम
Share your comments