मधमाशा या निसर्गाचा समतोल राखण्यासाठी खूप महत्वाच्या आहेत. यामुळे आपल्या शेतात फिरणे देखील खूप महत्वाचे आणि फायद्याचे असते. असे असताना बुलडाणा जिल्ह्याच्या मेहकर तालुक्यातील देऊळगाव माळी या गावातील पांडुरंग मगर या युवा शेतकऱ्यावर वेगळचं संकट आले आहे.
त्याने केलेल्या शेतात घुसून काही अज्ञातांनी मधमाश्या मारल्याची घटना समोर आली आहे. मधमाशांच्या १२५ पेट्यांमधील अडीच कोटी मधमाशांना किटक नाशक घातल्याने मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. यामुळे त्यांना मोठा आर्थिक फटका बसणार आहे.
या शेतकऱ्याच्या आर्थिक संकटाबरोबर पर्यावरणाचीही मोठी हाणी झाली आहे. यामुळे याचा रखोल तपास केला जावा अशी मागणी केली जात आहे. या व्यवसायातून त्यांना वर्षाला जवळपास २ टन मध मिळायचा. यातून ते वर्षाला साधारण दहा लाख रुपयांचे उत्पन्न मिळवायचे.
पुढील 4 दिवस राज्यात मुसळधार पाऊस होणार, IMD चा 'या' ठिकाणी ऑरेंज अलर्ट जारी
असे असताना मात्र काही लोकांनी किटक नाशके टाकून माशांना मारल्याने त्यांचे मोठे नुकसान झाले आहे. या प्रकरणी पांडुरंग मगर यांनी पोलिसात तक्रार दिली आहे. याबाबत पोलीस तपास करत आहेत.
मगर यांच्या शेतात जवळपास १२५ पेट्यांमध्ये मधमाशा पाळल्या होत्या. त्यांची संख्या जवळपास अडीच कोटी एवढी होती. याबाबत ते म्हणाले, आम्ही आमचा मध चेतक फार्म्स या नावाने विदेशात पाठवण्याच्या तयारीत आहे.
शेतकऱ्यांसाठी बाजार समितीने सुरू केली बक्षीस योजना, जाणून घ्या...
मधविक्रीसाठी आवश्यक सर्व लायसन्स आम्ही काढले आहेत. प्रशासनाने याची चौकशी करून आम्हाला शक्य तेवढी मदत करावी. तसेच ज्यांनी हे कृत्य केले आहे त्यांच्यावर कारवाईची मागणी मगर यांनी केली.
टोमॅटोसाठी दुकानदाराने तैनात केले बाउन्सर, सांगितले धक्कादायक कारण
शेतकरीच नवरा पाहिजे! उच्चशिक्षित नोकरी करणाऱ्या तरूणीचा हट्ट, वडिलांनी अखेर तिची इच्छा केली पूर्ण..
कृषी जागरणचे राष्ट्रीय व्यासपीठ देशातील शेतकऱ्यांचा करणार सन्मान..
Share your comments