सांगोल्याचे आमदार शहाजीबापू पाटील हे सध्या चांगलेच चर्चेत आहेत. गुवाहाटीला गेल्यानंतर त्यांचा एक कॉल व्हायरल झाला होता. 'काय झाडी, काय डोंगार’ या डायलॉगमुळे एकनाथ शिंदे यांच्या सोबत ते चर्चेत आले होते. यानंतर आता शिवसेनेचे ( Shivsena ) माजी जिल्हाप्रमुख साईनाथ अभंगराव यांनी शहाजीबापू पाटील यांच्यावर जोरदार टीका केली आहे.
ते म्हणाले, दररोज संध्याकाळी ज्या आमदाराला दोन क्वार्टर दारु लागते आणि चार किलो मटण लागतं, असा आमदार शिवसेनेवर टीका करतो आहे. अभंगराव यांनी आणखीही गंभीर आरोप केले आहेत. शहाजीबापू पाटील यांच्यामुळे त्यांच्या भावावर गळफास लावून आत्महत्या करण्याची वेळ आली, असा गंभीर आरोपही अभंगराव यांनी केला आहे.
या आरोपांमुळे खळबळ उडाली आहे, शिंदे यांच्या बंडानंतर शहाजीबापूंची मोठी चर्चा झाली. सध्या शहाजीबापू भाषणात शिवसेनेवर सडकून टीका करतात. संजय राऊत यांच्यावर देखील त्यांनी जोरदार टीका केली. त्यामुळे आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीर शहाजीबापूंवरही शिवसेनेकडून टीका करण्यात येते आहे.
'खाऊन 50 खोके माजलेत बोके, ईडी ज्याच्या दारी तो भाजपच्या दारी'
तसेच त्यांनी अजून जोरदार टीका केली आहे. शहाजीबापू यांनी मतदारसंघासाठी निधी आणला आणि त्यानंतर बंगला बांधण्यास सुरुवात केली. शहाजीबापू यांनी आमदारकीची निवडणूक लढवण्यासाठी 20 लाख रुपये आपल्याकडून घेतले होते, मात्र ते अद्यापही परत केले नाहीत, असे गंभीर आरोप केले आहेत, आता या टीकेला शहाजीबापू काय उत्तर देणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
'खाऊन 50 खोके माजलेत बोके, ईडी ज्याच्या दारी तो भाजपच्या दारी'
एकनाथ शिंदे यांच्यासोबत बंडखोरांच्या गटात गेल्यानंतर 50 कोटी मिळवले, असा आरोपही अभंगराव यांनी केला आहे. सोलापुरात विनायक राऊत यांच्या उपस्थितीत उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचा मेळावा पार पडला. या मेळाल्यात शिवसेनेचे माजी जिल्हाप्रमुख साईनाथ अभंगराव यांनी ही जोरदार टीका केली आहे.
महत्वाच्या बातम्या;
ऊसाच्या एफआरपीची रक्कम न दिल्याने हर्षवर्धन पाटलांच्या साखर कारखान्याच्या कार्यालयाची तोडफोड
विनायक मेटेंच्या अपघाताबाबत अजित पवारांचे मोठे वक्तव्य, म्हणाले, ड्रायव्हर..
Mohit kamboj: बारामती ॲग्रोचा अभ्यास सुरु, आता रोहित पवार अडचणीत येणार?
Share your comments