1. बातम्या

अजितदादांचा वाढदिवस, आणि शहाजी बापू पाटलांच्या पत्नीला पाठवली साडी, वाचा नेमकं काय झालं..

गेल्या काही दिवसांपासून शिवसेनेचे आमदार शहाजीबापू पाटील चांगलेच चर्चेत आहेत. दरम्यान, आज आज विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवारांचा (Ajit Pawar Birthday) आज वाढदिवस आहे. यामुळे अजित पवारांवर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. तसेच राज्यात अनेक ठिकाणी कार्यक्रमांचे आयोजन केले आहे. याठिकाणी अनेक नेते उपस्थित राहत आहेत.

Ajitdad's birthday saree sent to shahaji bapu Patals wife

Ajitdad's birthday saree sent to shahaji bapu Patals wife

गेल्या काही दिवसांपासून शिवसेनेचे आमदार शहाजीबापू पाटील चांगलेच चर्चेत आहेत. दरम्यान, आज आज विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवारांचा (Ajit Pawar Birthday) आज वाढदिवस आहे. यामुळे अजित पवारांवर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. तसेच राज्यात अनेक ठिकाणी कार्यक्रमांचे आयोजन केले आहे. याठिकाणी अनेक नेते उपस्थित राहत आहेत.

असे असताना आता सोलापुरात राष्ट्रवादीचे कार्यकर्ते जमले आणि त्यांनी अजित पवारांचा वाढदिवस साजरा केला. पण यावेळी राष्ट्रवादीच्या महिला कार्यकर्त्यांनी असे काही केले की ज्याची सध्या चर्चा सुरु आहे. दादांच्या वाढदिवशी त्यांनी सांगोल्याचे आमदार शहाजी बापू पाटील (MLA Shahaji Bapu Patil) यांच्या पत्नीला साडी पाठवली. रेशमी इरकल साडी त्यांनी पाठवली आहे.

या साडीची किंमत आठ हजार आहे, काही दिवसांपूर्वी शहाजीबापू पाटलांची एक ऑडिओ क्लिप व्हायरल झाली होती. यात ते मला बायको साडीही घेणं जमलं नाही, असं म्हणत होते. त्यामुळे आम्ही ही साडी देत असल्याचे राष्ट्रवादीच्या महिला नेत्यांनी म्हटलं आहे. तसेच त्यांनी पवारांवर देखील टीका केली होती. तसेच ते त्यांच्या एका कार्यकर्त्यांशी बोलत होते. गुवाहाटीच्या निसर्गाचं वर्ण करताना त्यांनी काय झाडी, काय डोंगार, काय हाटील, सगळं ओकेमध्ये आहे, असे म्हटले होते.

मोठी बातमी! अनेक राजकीय घडामोडींनंतर दिनेश गुणवर्धने बनले श्रीलंकेचे पंतप्रधान

त्यांची ही ऑडिओ क्लिप चांगलीच व्हायरल झाली. तसेच ते राज्यभरात चांगलेच गाजले. त्यांनी शरद पवारांवर टीका केल्याने राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार चांगलेच आक्रमक झाले होते. तसेच त्यांना पर्यटनमंत्री करण्याची मागणी देखील सोशल मीडियावर केली जात आहे.

महत्वाच्या बातम्या;
पावसाअभावी शेती संकटात, कृषीमंत्र्यांची पीक मदत योजनेवर काम सुरू करण्याची घोषणा
पवारांचा बालेकिल्ला ताब्यात घेण्यासाठी भाजपचा मोठा डाव? पुण्याच्या पालकमंत्रीपदी लागणार या नेत्याची वर्णी
आता शरद पवारांची जागा घेणार भाजपचा नेता, कुस्तीगीर संघटनेच्या अध्यक्षपदासाठी भरणार अर्ज..

English Summary: Ajitdad's birthday saree sent to Shahaji Bapu Patal's wife, read what really happened.. Published on: 22 July 2022, 07:21 IST

Like this article?

Hey! I am निंबाळकर ओंकार रमेश. Did you liked this article and have suggestions to improve this article? Mail me your suggestions and feedback.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters